मी देशासाठी काय करतो ?
**
मी देशासाठी काय करतो ? खरं पाहता काहीच करत नाही. पण जे करतो ते सामान्य नागरिक म्हणून मला दुस-या देशातील नागरिकासमोर छाती फुगवून सागायला मदत होते की हा, मी भारतीय आहे.
सर्वसामान्य जे करतात तेच करतो मी पण सर्व टॅक्स भरतो, नियमीत लाईट बील / पाणी बील भरतो, फोन बिल भरतो, सरकारी / गैरसरकारी संस्थाच्या कार्यक्रमाना मदत करतो जे काही करता येईल ते करतो पण एका माझ्या गोलाकार वर्तुळामध्ये राहून, माझ्या वर्तुळाचा केंद्र बिंदू हा मी व माझे कुटुंब आहे.. त्यानंतर सर्व काही.. येस मी स्वार्थी आहे, स्वतःचाच फायदा बघतो, का बघू नये ? जेव्हा जेव्हा मला फायदा होईल / तोटा होईल तेव्हा देखील मी नियमीत कर भरत आहेच ना ? जर माझे भले झाले तर देशाचे भले होईल व माझे वाईट झाले तरी देशाचेच भले होईल.
कसे ? मी कसे काय देशाचे भले करत आहे ???
शेयर मार्केट मध्ये मी गुंतवणूक करतो व लोकांना देखील करायला लावतो हे माझे काम.
समजा मी आज एक लाखाची गुंतवणूक शेयर मार्केट मध्ये केली तर..मी संबधीत संस्थेला ब्रोकरेज (दलाली) देतो, सरकारला कर रुपाने काही हिस्सा देतो भले ही माझा फायदा होऊदे अथवा तोटा.. नियमीत गेली पाच वर्षे टॅक्स भरत आहे, हायवे वापरण्यासाठी टोल देतो, दिल्ली मध्ये खरेदी करताना मेट्रोकर / शिक्षण कर देतो, व सर्वात महत्वाचे मी जे हे करतो त्यामुळे देशात रोजगार उत्पन्न होतो असे माझे मत आहे, भले ही एक नोकरी तयार होत असेल तर त्याला मी कारण आहे हेच मला छाती फुगवायला / गर्व करायला काफी आहे... असे नाही कि मी कर चुकवत नाही अथवा पळवाटा शोधत नाही पण तरी ही आजच्या जगात कुठे ना कुठे तरी आपण कुणा ना कुणाच्या तरी नोकरी साठी / रोजगारासाठी जबाबदार आहोत हेच सुख.
***
तुम्ही काय करता आपल्या देशासाठी ??????
कधी तर तावातावाने तर कधी तर सामान्यत: हा प्रश्न कोणी ना कोणी कधी ना कधी कोणाला ना कोणाला तर नक्कीच विचारतो.
व हा प्रश्न तेव्हा समोर येतो जेव्हा अनिवासी भारतीयांना नावे ठेवली जातात ;)
जरा चर्चा करु या.
वाचने
26418
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
मी
In reply to मी by विनायक प्रभू
तुमच्या
In reply to मी by विनायक प्रभू
मी
मी
देशासाठी नक्की काय करायचे
मी
वर
In reply to वर by शलाका
शलाकाशी सहमत
काहीच असे सांगु शकत नाही.
In reply to काहीच असे सांगु शकत नाही. by वेताळ
आणि
In reply to आणि by Nile
अनिवासी भारतीय..
In reply to अनिवासी भारतीय.. by विकास
तो माणूस
In reply to आणि by Nile
नाही बॉ.....
परदेशातुन भारतीय अंतरजालावरील
कायपन करत न्हाय.
काय करत नाही - करतो...
कशाला काही
देशासाठी काही करणे?
In reply to देशासाठी काही करणे? by नीधप
+१ सहमत.
In reply to +१ सहमत. by दशानन
+२
नीधप
शलाका
मी
पुण्यात
In reply to पुण्यात by JAGOMOHANPYARE
मस्त
राजेसाहेब,
मी ...
- देशातील नागरिकांच्या करातुन उभारलेल्या शिक्षणसंस्थांमधुन उच्च शिक्षण घेतले असल्याने एक जबाबदारी म्हणुन देशाला उपयोगी पडेल अशा उद्योगात काम करतो, अर्थात त्यात वैयक्तिक स्वार्थ आहेच पण तरीही आमच्या कामामधला अगदी नगण्य का होईना पण काही तरी भाग देशासाठी उपयोगी पडतो असा आमचा विश्वास आहे.
- देशाच्या न्याय आणि इतर सरकारी व्यवस्थेबद्दल नेहमीच आदर ठेऊन वागतो, शक्य तितके त्यांना सहकार्य करायचे प्रयत्न करतो.
- ग्रास रुट लेव्हलवर काम करणार्या स्वयंसेवी संस्थांना शक्य तितकी मदत नेहमीच करत असतो.
- पुढची येणारी शिकलेली पिढीच देशाचे आधारस्तंभ असल्याचा आमचा विश्वास असल्याने त्यांना शक्य तितके मार्गदर्शन व मदत करत असतो.
- नोकरशाही अथवा राजकारण हे एक "गटार" न मानता जरी आज जमले नाही तरी भविष्यात त्यात सामील होईन देशासाठी मेनस्ट्रीममध्ये काहितरी भरिव काम करु अशी इच्छा बाळगतो.
- देशपातळीवर घडणार्या व दुरगामी परिणाम करणार्या विवीध घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यातुन दुसर्यांना काय समजवता येईल हे नेहमीच पहात असतो. इतर सामान्य व जास्त माहिती नसलेल्या लोकांना हे सोप्या भाषेत समजावुन देण्याचा प्रयत्न करतो.
- सर्वात महत्वाचे म्हणजे "माझा देश नक्की पुढे जाईल व त्याला आमच्यासारखे तरुनच नक्की हातभार लावतील " ह्या तत्वावर नितांत श्रद्धा ठेवतो ...
मला वाटते सध्या तरी एवढेच करतो ... ------ छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)विषेश उल्लेख करावे असे काहिच नाहि
पाहतो आहे..
देशाच्या