प्रिटी वूमन - भाग ८

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
4 Jul 2009 - 8:34 am

मागील भाग -
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७

"मी विचार करून एक-दोन दिवसात सांगते", मर्जिना म्हणाली.

"ठीक आहे पण जरा लवकर. फक्त बारा टेबलं आहेत, सांगितलय ना मी तुला? शेठ त्यापेक्षा जास्त मुलींना ठेवणार नाही", मायाने सूचक इशारा दिला.

"बरं. बघते आणि कळवते लवकरच", मर्जिना उत्तरली.

माया हीदेखिल मर्जिनाच्याच हॉटेलातील एक डान्सर. नृत्य काही फार चांगले करीत होती, असे नाही. दिसायलाही अशीतशीच. पण आवाज मात्र चांगला होता. बर्‍याच हॉटेलांनी, डान्स बंद झाल्यावर ऑर्केस्ट्रा बार सुरू केले आणि त्यातल्याच एका बारमध्ये माया लागली, गायिका म्हणून!

त्याच हॉटेलने पुढे पुरुष वेटर कमी करून मुलींना वेटर म्हणून ठेवायचा घाट घातला होता. त्यामुळेच डान्सबार बंद होऊन चार महिने झाले तरी घरीच बसणार्‍या मर्जिनासाठी मायाने हा प्रस्ताव आणला होता.

"लेकिन कोई गलत काम तो नही होता है ना वहां?", मर्जिनाने शंका काढली.

"अग, तसं असतं तर मी तुला सांगितलं असतं का? मला काय माहित नाही तुझ्याबद्दल?"

"बरं मी निघते आता आणि सांगते तुला लवकरच"

"उद्याच सांग. नाहीतर शेठ ठेवेल दुसरीला. एकच तर जागा रिकामी आहे"

"ठीक आहे"

मायाच्या घरून मर्जिना निघाली ती विचार करीतच.

प्रस्तावात काही वाईट दिसत नव्हतं. आणि खरोखरच माया म्हणते तसे गैरप्रकार होत नसतील तर काय हरकत आहे? संध्याकाळी सहाच्या सुमाराला जायचे ते दीड वाजता हॉटेल बंद होई पर्यंत. गिर्‍हाईकांना दारू आणून द्यायची आणि टेबलाजवळच उभे राहायचे. बील भरताना ते जी टीप ठेवतील ती आपली. रोजचे शंभर रुपये शेठला एन्ट्री फी म्हणून दिले की उरलेले आपलेच. डान्सबारमध्ये शेठ चाळीस टक्के कापून घेत असे, इथे तसे नाही.

विचारांच्या तंद्रीत ती जात होती.

"काजल, काजल"

हाक ऐकू आली तशी मर्जिना थांबली. पलिकडून स्वीटी हाक मारीत होती. रस्ता ओलांडून स्वीटी काजलकडे आली.

"कुठे निघालीस एवढ्या तंद्रीत", स्वीटीने विचारले.

"कुठे म्हणजे काय? घरी. आणि काय गं, आहेस कुठे? बरेच दिवसांनी दिसतेयस?"

"बरेच कुठले, परवाच नाही का तुला हात केला होता वर्तक नगरच्या नाक्यावर? हाच तर सूट घातला होतास तू. नाही का?", स्वीटी काहीशा छ्द्मीपणाने हसत म्हणाली.

"हं. बरं मी जरा घाईत आहे. निघते", असे म्हणून तिला टाळून मर्जिना घरी जाऊ लागली.

खरंच, चार महिन्यात एकही नवा कपडा घेतला नव्हता. ईदला घेतला होता तेव्हढाच. शौक करायला पैसे होतेच कुठे? साठवलेले केव्हाच संपले होते. मोठ्या हौसेने केलेले दागिनेही एक-एक करून मोडले जात होते. स्वीटीचं काय जातयं थट्टा करायला?

तिला गेल्या वर्षीची ३१ डिसेंबरची रात्र आठवली. मुलींची आणि पर्यायाने हॉटेलचीही सर्वात जास्त कमाई करून देणारी रात्र. हॉटेलमधे सर्वात जास्त कमाई - जवळजवळ एक लाख रुपये - मर्जिनाने कमवले होते. शेठनेही एक नेकलेस भेट म्हणून दिला होता तिला त्याबद्दल, जेमतेम पंचवीस हजार कलेक्शन केलेली स्वीटी काय जळफळली होती त्यावेळी.

"बरं बाबा, घाईत असशील तर जा. आणि ऐक तो प्रवीणशेठ विचारत असतो तुझ्याबद्दल", पुन्हा एकदा स्वीटी हसत हसत म्हणाली आणि रस्ता ओलांडून पलीकडे जाऊ लागली.

विचारांच्या तंद्रीतच मर्जिनादेखिल झपाझप पावले टाकीत घराकडे निघाली.

***

"मर्जिना, तुमि कामोन आछो?", धापा टाकत घरी आलेल्या मर्जिनाच्या चेहेर्‍याकडे पाहात नजमाने विचारले.

"भालो आछी", मर्जिना म्हणाली खरी, पण नजमा मावशीचा त्यावर विश्वास बसणे शक्यच नव्हते.

काहीतरी घडलं होतं खास. तिने पिच्छाच पुरवला तेव्हा मर्जिनाने तिला मायाने सुचवलेल्या कामाबद्दल सांगितले आणि त्याहूनही अधिक म्हणजे स्वीटीच्या छद्मी हसण्याबद्दलही.

"आमि की कोरबो?", शेवटी मर्जिनाने विचारले.

"काय हरकत आहे गं? हातपाय तर हलवायलाच पाहिजेत ना?"

"ठीक आहे मग. मायाला सांगते तसं".

*******

मोठा धीर एकवटून केलेल्या त्या फोनला आता दोन महिने होऊन गेले. तेव्हा तिने ईदचे कारण देत भेटायचे टाळले. तरी पुन्हा एकदा फोन करावा काय?

तो विचार करीत होता.

काय करीत असेल ती आता? का तेव्हा भेटायचं टाळलं तिने? खरेच टाळले का? कारण ईद तर होतीच. आपण ईदनंतर लगेचच फोन केला असता तर कदाचित भेटलीही असती.

पण भेटून करणार काय? काय बोलणार तिच्याशी? तिलाच काय पण आजवर असे कुठल्याच मुलीला भेटलो नाही आणि हिच्याशी तर आपण हॉटेलातदेखिल कधी बोललो नाही. मग आता काय बोलणार?

पण नाही. तिला बघावेसे वाटतेय. तिच्याशी बोलावेसे वाटतेय. हेही तितकेच खरे.

ठीक आहे तर. करून बघू पुन्हा एकदा फोन, असा विचार करून त्याने नंबर फिरवला.

*******

नव्या हॉटेलात येते असे सांगण्यासाठी तिने मायाला फोन केला. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत असताना तिला दुसरा एक फोन येत असल्याचा संकेत मिळाला. कुणाचा बरे फोन, असा विचार करीत तिने पाहिले, तर एक लॅन्डलाईन नंबर - अनोळखी.

वाजू दे, असे म्हणून ती पुन्हा मायाशी गप्पा मारू लागली. मधल्या काळात दोन-तीनदा त्या नंबरवरून फोन येऊन गेले.

मायाशी बोलणे झाले. आता परवापासून नवे हॉटेल आणि मुख्य म्हणजे नवे काम, जे पूर्वी कधीच केले नव्हते! कसे जमेल आपल्याला? जमेल ना नक्की? अगदी डान्सबार एवढे नाही तरी तीन-चारशे रुपये तरी मिळतातच रोजचे, असे माया म्हणत होती. तीन-चारशेही तशी काही कमी रक्कम नव्हतीच.

तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. तोच नंबर.

"हॅलो", मर्जिना फोन घेत म्हणाली.

"हॅलो, काजल?", पलीकडून आवाज आला.

"हां हां काजलही बोल रही हूं? आप कौन?"

"मैं...मैं..वो..तुमको फोन किया था ना ईद के पहिले...तुमने बोला बादमे करो..."

अच्छा! तर तो आहे तर, मर्जिना मनातल्या मनात म्हणाली.

"आप है किधर? कितने दिन के बाद फोन किया?"

"हां थोडं बिझी होतो कामात?"

"अच्छा? मग आता झालास का मोकळा कामातून?"

"हां. थोडं भेटायचं होतं"

"का? काही विशेष?"

"विशेष नाही...सहजच..."

"ठीक आहे", मर्जिना गालातल्या गालात हसत म्हणाली, "कधी भेटायचं मग? आत्ता?"

"आत्ता?" तो गडबडला.

"ठीक आहे, मग उद्या?", मर्जिनाने हसू दाबत विचारले.

"च..चालेल. पण कुठे?"

"मला काय? कुठेही चालेल. तलावपाळीवर?"

"काय? त..तलावपाळी?", तो उडालाच. त्याच्या ओळखीचे किमान पंचवीस लोक तिथे नक्कीच भेटले असते, "नको, तलावपाळी नको".

"ठीक आहे मग आमच्या एरीयात ये", मर्जिनाने सुचवले, "येशील?"

"पण म्हणजे कुठे?", त्याने विचारले.

"लोकमान्य नगर. माहित आहे?"

त्याला लोकमान्य नगर फक्त ऐकून ठाऊक होते!

"मग ठाकुर कॉलेजच्या इथे चालेल?", मर्जिनाने विचारले.

"ठाकुर कॉलेज?", आता हे ठाकुर कॉलेज कुठे आले ह्यच्या विचारात तो पडला.

"मग पासपोर्ट ऑफीस?", तिने सुचवले.

"हां, हां चालेल", त्याला हायसे वाटले. एक तर त्याला पासपोर्ट ऑफीस माहित होते आणि त्यातून रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याभागात त्याच्या ओळखीचे कोणी फिरकण्याची शक्यतादेखिल नव्हती!

"ठीक आहे मग. उद्या संध्याकाळी सहा वाजता"

"नक्की"

*******

"सगळे मिळून हे सात हजार झाले" लालवाणीने एक पाकिट चांदनीच्या हातात देत म्हटले.

"टॅक्सी येईलच आता तुला न्यायला", लालवाणी सांगत होता, "पुढे कधी प्रोग्राम असला तर कळवीनच"

"शुक्रीया साब", चांदनी म्हणाली.

"साब और एक बात कहनी थी...", बोलता बोलता चांदनी किंचित थांबली.

"बोलो क्या बात है?"

"साब. ते जरा माझ्या नवर्‍याच्या नोकरीचं तुम्ही बघणार होतात ना?"

"अरे हो हो, लक्षात आहे माझ्या. मी फोन करीन तुला बरं का?", तिला जवळ ओढीत लालवाणी म्हणाला.

त्याच्या केसाळ मिशा गालाला टोचल्या तशी ती शहारली. त्याचा तिच्या कमरेकडून नितंबाकडे जाणारा हात ती रोखणार तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला.

"साब टॅक्सी आली, मी जाते", त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली.

"ठीक है मेरी जान. तुझ्या नवर्‍याचं लक्षात आहे माझ्या. कळवीनच", टॅक्सीचा दरवाजा बंद करीत लालवाणी बोलला.

*******

त्याला पासपोर्ट ऑफिसजवळ येऊन जवळपास पंधरा मिनिटे होऊन गेली होती पण अजून काजलचा पत्ता नव्हता. आपण जे करतोय ते बरोबर की चूक हेही त्याला कळेनासे झाले होते. आजवर कुठल्याही मुलीला तो असा भेटला नव्हताच, त्यातून ही तर बारबाला!

ती आपल्याशी खेळ तर खेळत नाही ना? काय भरवसा असल्या मुलींचा? डान्स बार बंद झाल्यापासून पेपरात काय काय छापून येतय त्यांच्या बद्दल. खरंच असणार ते!

ती कुठेतरी दूर बसून आपली मजा पाहते आहे असे त्याला अनेकदा वाटून गेले! जाणार्‍या-येणार्‍या प्रत्येक बस आणि रिक्षातील प्रवासी आपल्याकडे माना वळवून बघत आहेत, असेही त्याला जाणवू लागले! नाक्यावरचा पाणीपूरीवाला तर केव्हापासून आपल्याकडे पाहात गालातल्या गालात हसत आहे, असा भास त्याला होऊ लागला!

तिला फोन करून पहावे का? पण मोबाईलवरून फोन नको. आपला नंबर तिला कळता कामा नये. एकतर नको त्या वेळी तिने फोन केला तर पंचाईत आणि दुसरे म्हणजे, न जाणो, ती कुठल्या लफड्यात असेल आणि पोलीसांनी तिला पकडले तर त्यांना आपला नंबरही मिळेल! नकोच ती भानगड! नाही नाही मोबाईलवरून फोन नाही पण जवळपास कुठे पब्लिक फोनही दिसत नव्हता.

काय करावे बरे? निघून जावे काय? आता साडेसहा वाजले आहेत. अजून पाच-दहा मिनिटे वाट पाहू आणि नंतर निघून जाऊ असा विचार तो करणार तोच एक रिक्षा त्याच्या जवळ येऊन थांबली.

नेहेमी रंगरंगोटी केलेला चेहरा आणि घागरा चोळीत काजलला पहायची सवय असलेल्या त्याला हलकासा मेकअप आणि पंजाबी सूट मध्ये पाहून तो क्षणभर चक्रावलाच. काजलच आहे ना ती? नक्कीच तिचं हसणं तर तेच आहे की!

"सॉरी लेट झाला, रिक्षाच मिळाली नाही आमच्या इथे. पार इंदिरा नगरपर्यंत चालत यावं लागलं रिक्षासाठी"

"ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही", तो तिच्या चेहर्‍याकडे पाहात म्हणाला.

कोणी काही न ठरवता, दोघेही चेकनाक्याच्या दिशेने चालत जाऊ लागले. नक्की काय बोलायचं हे त्यालाही कळत नव्हत? काय बोलायचं असतं ह्या मुलींशी? बारमध्ये त्यांना जवळ बोलावून पैशाची उधळण करणारे लोक काय बोलत असत त्यांच्याशी? मुली तर खुदूखुदू हसताना दिसत त्यांच्याशी बोलताना! आपण काय बोलणार? खरंतर आजवर एक दहाची नोटही दिली नाही तिला!

"इथेच डावीकडे जाऊ, तलावाकडे", ती म्हणाली.

"तलाव? इथे कुठला तलाव?", त्याला कळेना.

कमानीखालून आत गेल्यावर एक विस्तीर्ण तलाव त्याच्या दृष्टीस पडला. इथेहे एक तलाव आहे हे त्याला ठाऊकच नव्हते!

फारच तुरळक माणसे तिथे उपस्थित होती. एका कठड्यावर ते बसले. तलावात एक बदक तरंगत होते.

त्याच्याकडे बोत दाखवत तो म्हणाला, "वो देखो...ब..ब..", बदकाला हिंदीत काय म्हणतात हे त्याला ठाऊकच नव्हते!

"हमारी बंगालीमें उसको राजहंस बोलते है", ती म्हणाली.

"राजहंस?", त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. नकळत तिचा हात त्याने हातात घेतला!

अगदी हाकेच्या अंतरावर चेकनाक्यावरचा कोलाहल होता पण इथे होती फक्त नि:शब्द, नीरव शांतता!

*******

घरी जाण्यासाठी चांदनीने रिक्षा आपल्या गल्लीत वळवली आणि नाक्यावरच तिला तिचा नवरा दिसला. अशाच दोन-चार उडाणटप्पूंबरोबर चकाट्या पिसताना. तिला प्रचंड संताप आला. ह्याचं माझं पोट भरावं, घरं चालावं म्हणून मी काय काय सहन करते आणि ह्याला साधे हातपाय हलवता येत नाहीत? हॉटेलातील बरेचसे वेटर लगले कुठे कुठे आणि हा मात्र बसलाय रिकामा.

रागाने थरथरच तिने घरचा दरवाजा उघडला.

*******

मर्जिना घरी आली तीच मुळी पिसासारखी हलकी होऊन! असेही कस्टमर असतात? इतके शांत आणि समजूतदार? आपल्या सगळ्या व्यथा, सगळ्या काळज्या, सगळी दु:ख आपल्याला का त्याला सांगाविशी वाटली? तिही अशा पहिल्या भेटीतच?

पण हे सगळं त्याला सांगून मन हलकं झालयं हेही खरंच. त्याच्याकडून पैशाच्या मदतीची अपेक्षा नाहीच पण एक चांगला दोस्त मिळाला, हे काय कमी आहे?

*******

अर्धी रात्र उलटून गेली तरी त्याचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. काय दु:ख असतात जगात विविध माणसांना? डान्स बार बंद झाले, पैशाची आवक कमी झाली म्हणून काय त्रागा करीत होती काजल!

पण तिला हे कसं समजावं की, तारुण्य, सौंदर्य ह्या उतरत्या घसार्‍याच्या ठेवी आहेत. त्यावर फार काळ अवलंबून कसं राहता येईल? पण हे सगळं तिला समजावून सांगायलाच हवे. चाळीशीला आलेल्या तिच्या मावशीला बारमालकानेच आता येऊ नको म्हणून सांगितले होते, असे तीच सांगत होती ना?

पेपरात बारबालांबद्दल जे जे छापले जाते त्यापेक्षा किती वेगळी होती काजल! कदाचित तो अपवाददेखिल असू शकेल - तळ्यातल्या राजहंसासारखा!

******* ******* *******
(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jul 2009 - 9:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुनील, बर्‍याच दिवसांनी 'प्रिटी वूमन' भेटली, पण कथेचा तजेला तसाच आहे. आता पुढचा ब्रेक एवढा नका लांबवू प्लीज!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Jul 2009 - 10:35 am | घाशीराम कोतवाल १.२

अदितीशी सहमत
सुनिलशेट आता खुप वेळ नका लावु

प्रीटी वुमन भाग ७ ( गुरू, 12/11/2008 - 14:09) .
प्रीटी वुमन भाग ८ ( शनी, 07/04/2009 - 08:34) .
दोन्ही भागात किति अंतर बघा आता येउ दे पटापट बर....

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

दशानन's picture

4 Jul 2009 - 11:51 am | दशानन

यमी शी सहमत.

थोडेसं नवीन !

श्रावण मोडक's picture

4 Jul 2009 - 12:03 pm | श्रावण मोडक

इतक्या गॅपनंतर वाचण्यासाठी पुन्हा मागचे वाचावे लागते. त्यामुळे आता हे वाचणार नाही. समाप्त झाल्यावरच वाचेन.
चांगल्या कथेपासून वाचकांना वंचित ठेवल्याबद्दल निषेध!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jul 2009 - 1:23 pm | बिपिन कार्यकर्ते

कथा वाचली. बरेच संदर्भ तुटले होते. त्यामुळे परत सगळे वाचावे लागले असते. आता सुनीलरावांना एकच विनंति. एक तर भाग लवकर लवकर टाका नाहीतर एकदम सगळं लिहा आणि मग बसा टाकत एक एक भाग. आता प्रतिक्रिया एकदम शेवटीच देईन म्हणतो.

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jul 2009 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार

वाचतोय.

फ्लो थोडा तुटला होता पण घेतो सावरुन ;)

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

4 Jul 2009 - 3:59 pm | स्वाती दिनेश

आधी मागचे वाचले आणि मग हा भाग .. तसाच फ्लो कायम आहे पण आता मात्र वेळ नका घालवू सुनील भाऊ..
स्वाती

प्राजु's picture

5 Jul 2009 - 9:04 am | प्राजु

मागचे आधी वाचायला लागले. मग संदर्भ लागला. असो..
कथा आता वेगाने पुढे सरकते आहे. पुढच्या भागांना वेळ लावू नका.. ही कळकळीची विनंती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

5 Jul 2009 - 9:06 am | विनायक प्रभू

सुनील भाई

आनंदयात्री's picture

5 Jul 2009 - 5:10 pm | आनंदयात्री

मस्त !!
त्या जगातल्या गोष्टीबरोबर हातात घालुन प्रेमकथा पण मस्त फुलायला लागलीये. नेहमीचीच विनंती .. पुढला भाय येउ द्या लवकर.

अनिल हटेला's picture

6 Jul 2009 - 4:27 pm | अनिल हटेला

सहमत आहे......

:-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

सुनील's picture

7 Jul 2009 - 10:36 am | सुनील

सर्व वाचक / प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.

ह्या भागाला अंमळ उशीर झाला हे मान्य. परंतु, यापुढील भाग लवकर टाकायचा प्रयत राहील.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पॅपिलॉन's picture

19 Feb 2010 - 3:51 pm | पॅपिलॉन

बंद झालेले डान्स बार पुन्हा चालू झालेत का?

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

शिल्पा ब's picture

25 Aug 2010 - 6:15 am | शिल्पा ब

कथा छान आहे...पुढचा भाग कधी?

सुनील's picture

25 Aug 2010 - 8:32 am | सुनील

उत्खननाबद्दल धन्यवाद!

पुढील भाग लवकरच!

स्वाती दिनेश's picture

25 Aug 2010 - 11:42 am | स्वाती दिनेश

शिल्पाने खाणकाम केले, त्यामुळे मी परत एकदा प्रिटीवूमनचे सगळे भाग वाचले. आता मात्र पुढचा भाग लवकर येऊ दे सुनीलभाऊ,
स्वाती

हाही भाग सुरेख. आता पुढचे भाग लिंक न तुटता वाचता येतील अशी आशा करु का? :)

डावखुरा's picture

2 Sep 2010 - 8:29 pm | डावखुरा

सुनीलजी..

अतिशय प्रगल्भ व ओघवत्या शैलीत लेखन...

तुमच्या पंख्यांमधे भर पड्ली निश्चित..

पण तुमच्यामागे अजुन एक कटकट करणारा लागला..पुढ्च्या भागाविषयी काय?

सुनिल रावांना परत एकदा आठवण करून द्यायला भाग वर आणत आहे.. :)

सुनील's picture

8 Sep 2010 - 11:31 pm | सुनील

धन्यवाद!

डावखुरा's picture

26 Sep 2010 - 2:22 pm | डावखुरा

???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????@?@?@?@????????????????????????????????????????????????????????@???????????@?????????????????????????????????????????????????????@??????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@??????????????????????????????????????????????????????????????????@??????????????????????????????????????????????????????????????????@?????????????????????????????????????????????????????????????????@????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

डावखुरा's picture

26 Sep 2010 - 2:24 pm | डावखुरा

???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????@?@?@?@????????????????????????????????????????????????????????@???????????@?????????????????????????????????????????????????????@??????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@??????????????????????????????????????????????????????????????????@??????????????????????????????????????????????????????????????????@?????????????????????????????????????????????????????????????????@????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

डावखुरा's picture

26 Sep 2010 - 2:24 pm | डावखुरा

???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????@?@?@?@????????????????????????????????????????????????????????@???????????@?????????????????????????????????????????????????????@??????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@??????????????????????????????????????????????????????????????????@??????????????????????????????????????????????????????????????????@?????????????????????????????????????????????????????????????????@????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????@????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????@???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

प्रतीक्षा होडे.'s picture

24 Feb 2016 - 2:04 pm | प्रतीक्षा होडे.

मला प्रिटी वूमनचे ८ च्या पुढचे भाग कुठे भेटतील? कोणी मला लिंक पाठवू शकता का????????

सुनील's picture

24 Feb 2016 - 6:56 pm | सुनील

धन्यवाद!

मालिकेचे पुढील भाग सध्यातरी फक्त माझ्या डोक्यातच आहेत!

बघुया कधी लिहिले जाताहेत ते!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Jun 2016 - 7:31 pm | घाशीराम कोतवाल १.२

काय राव सहा वर्ष झालि आता तरी सम्पवातो धम्या शिकार आनि पोकळवाडीचे चमत्कार करुन उसात जाउन बसलाय निदान तुम्ही तरी प्रिटी वुमन पुर्ण करा

मराठी कथालेखक's picture

16 Jun 2016 - 4:40 pm | मराठी कथालेखक

छान.. सगळे भाग आज वाचलेत

सुनील's picture

17 Jun 2016 - 9:40 am | सुनील

@ घाशीराम कोतवाल १.२ - पुनरुत्खननाबद्दल आभार!

@ मराठी कथालेखक - धन्यवाद!