तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं?
कसा झक्कास विषय आहे! सर्वांना भाग घेता येण्यासारखा आहे की नाही?
पण थांबा, थांबा!
जरा विचार करा. एकदम "बाजीराव-मस्तानी" असं ओरडू नका! हे ड्रिंक असतं हे मला आमच्या एका पुणेरी मित्राकडून समजलं. आम्ही या इतिहासातील व्यक्ति आहेत असं समजत होतो. :)
तेंव्हा जरा विचार करा आणि मग सांगा. मात्र चर्चेत सामील होतांना खालील पथ्ये पाळूया, जरा मजा येईल...
१. नुसतंच ड्रिंकचं नांव किंवा एकच वाक्य नसावे. जरा अधिक वर्णन द्या.
२. ड्रिंक "अल्कोहोलिकच" असायची जरूर नाही. नॉन्-अल्कोहोलिक ड्रिंक्स सुध्धा चालतील. भगिनींना भाग घ्यायला आता हरकत नाही.
३. ते ड्रिंक तुम्हाला का आवडतं ते सांगा
४. त्याविषयीची एखादी आठवण असल्यास ती शेअर करा.
५. जमल्यास त्या ड्रिंकची रेसिपी द्या म्हणजे इतरांनाही त्याची लज्जत लुटता येईल.
ठीक आहे? चला, मी सुरवात करून देतो...
माझं सर्वात आवडतं ड्रिंक आहे...
स्कॉच ऑन द रॉक्स!
सुवर्णकांती झळाळणारं...
आपला आब राखून असणारं...
फक्त बर्फाशिवाय आणखी कुणाशी (सोडा, लेमन, ज्यूस वगैरे) सलगी न करणारं...
दिवसभराचा कामाचा शीण नाहीसा करणारं, पण बेताल होऊ न देणारं....
एक स्वच्छ चकाकणारा क्रिस्टलचा ग्लास घ्यावा. हेवी बेस असल्यास अगदी उत्तम, हातात फिट बसतो.
त्यात बर्फाचे किणकिणणारे चार-पाच स्फटिक घालावे.
बेताची, जेमतेम स्फटिक बुडतील, न बुडतील इतकी स्कॉच घालावी. शिवास रीगल ही माझी वैयक्तिक आवड कारण मला तिची चव आवडते आणि मला तिचा हँगओव्हर येत नाही. पण इतरही स्कॉच तुमच्या आवडीप्रमाणे वापरायला हरकत नाही.
सोनेरी प्रभा उधळणारं ते पेयरत्न दोन मिनीटं नुसतं न्याहाळत रहावं... सुंदर स्त्रीप्रमाणे सुंदर मद्याने भरलेला चषकही अत्यंत आकर्षक दिसतो हे उमजावं...
चषक तोंडाला लावून पहिला 'सिप' घ्यावा. घोट नव्हे, फक्त सिप...
बस्स, जेमेतेम ओठाला स्पर्श होईल इतपतच..
आपलं आवडतं पुस्तक उघडावं. मि.पा.चं खातं उघडून बसलं तरी चालेल...
चषकातील मदिरा चुंबित, चुंबित संपवावी...
पहिला पेग संपल्यावर दुसरा भरावा...
तितक्यात तळलेल्या कोलंबीने भरलेली बशी बायकोने पुढे करावी...
बशी देऊन जाता जाता चषकातली मदिरा तिने हळूच चाखावी....
"जास्त वेळ लावू नको हं, जेवण तयार होईल लवकरच" अशी प्रेमळ धमकी द्यावी...
चुलीवरच्या कोल्हापुरी मटणाचा सुगंध आसमंतात दरवळावा.....
.....
.....
अरे, स्वर्ग स्वर्ग म्हणजे तरी दुसरा काय असतो?
आपला,
(उन्मनी) डांबिसकाका
वाचने
33199
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे पिवळ्या डांबिसा,
आभार!
In reply to अरे पिवळ्या डांबिसा, by विसोबा खेचर
आता जरा नॉन अल्कोहोलिक ड्रींक्स
वा!
मला मोहाची लै आवडली.
:)
In reply to मला मोहाची लै आवडली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वा! तात्या मग एकदा होऊन जाऊदे मैफल.
In reply to :) by विसोबा खेचर
कैरीचे पन्हे, ............
ताक!
In reply to कैरीचे पन्हे, ............ by मनस्वी
मला
In reply to कैरीचे पन्हे, ............ by मनस्वी
Assumption
In reply to कैरीचे पन्हे, ............ by मनस्वी
दया!
आम्च्या बाजीराव-मस्तानीला सुमार म्हणु नका राव ...
In reply to दया! by विसोबा खेचर
डा॑बिसकाका..जिव्हाळ्याचा विषय काढलात हो...
लेको..
In reply to डा॑बिसकाका..जिव्हाळ्याचा विषय काढलात हो... by धमाल मुलगा
डो॑न्टरी तात्या....
In reply to लेको.. by विसोबा खेचर
माझ्या आवडत्या दारवा ...
पेय!
उझो, ग्राप्पा, फेर्नेट ब्रांका, येगर माइश्तर, उंदेरबर्ग...
खविस?
In reply to उझो, ग्राप्पा, फेर्नेट ब्रांका, येगर माइश्तर, उंदेरबर्ग... by संजय अभ्यंकर
ह्म्म्म्म्म... मठ्ठा
आंबील
सुंदर..
In reply to आंबील by स्वाती राजेश
चहा
माझी आवड....
एल
माझ्या पेयमय आठवणी
नावडते पेय
होश की बाते करुंगा, होश मे आनेके बाद"
आमचं पण काहीतरी
In reply to होश की बाते करुंगा, होश मे आनेके बाद" by अविनाश ओगले
पिवळा डांबिस,
मसाला दूध, कढी वा!!!! झकास.
In reply to पिवळा डांबिस, by चतुरंग
माझे आवडते ड्रिंक
In reply to मसाला दूध, कढी वा!!!! झकास. by शुचि
पाणी ..........
हे झकास
कुळथाचे ठसकेबाज कळण
१.कोल्हापू
कोकमाचे आगळ घालुन केलेली सोलकढी......
मला सर्व प्रकारची रुचकर पेये (शब्दश: अर्थ पिण्यास योग्य) आवडतात.
फिल्टर कॉफी..
In reply to मला सर्व प्रकारची रुचकर पेये (शब्दश: अर्थ पिण्यास योग्य) आवडतात. by सृष्टीलावण्या
मुंबईत ही मिळते का?
In reply to फिल्टर कॉफी.. by संजय अभ्यंकर
रास्ता पेठेत तर मिळतेच
In reply to मुंबईत ही मिळते का? by सृष्टीलावण्या
आमची आवड : व्होडका स्पेशालिटी
अरेरे..!
In reply to आमची आवड : व्होडका स्पेशालिटी by परीचा परा
प्रतिक्षा ही कायमचीच राहीन....
In reply to अरेरे..! by प्रभाकर पेठकर
वा ह वा
आमरसाची किक
मार्गारिटा
झक्कास..
In reply to मार्गारिटा by प्रियाली
शनिवार-बुधवार
In reply to झक्कास.. by विसोबा खेचर
बिजी असतो..
In reply to शनिवार-बुधवार by प्रियाली
ते प्रकरण बीझीच बरे आहे :)
In reply to बिजी असतो.. by आणिबाणीचा शासनकर्ता
हाहाहाहाहा!
In reply to ते प्रकरण बीझीच बरे आहे :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपाव खायचा....
In reply to ते प्रकरण बीझीच बरे आहे :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रोजच घ्या की!
In reply to शनिवार-बुधवार by प्रियाली
बुधवार-शनिवार
In reply to रोजच घ्या की! by सुनील
रम वुइथ कोला..कृती...
वा!
In reply to रम वुइथ कोला..कृती... by सख्याहरि
आभार!
In reply to रम वुइथ कोला..कृती... by सख्याहरि
धन्यवाद...
In reply to आभार! by पिवळा डांबिस
डार्क बकार्डी घालून ट्राय करीन लवकरच...
टिप दिल्याबद्दल धन्यवाद.
इथे जर्मनीमध्ये बीयरही फार मस्त मिळते.वाइझन बीयर.. विशेष!
-कृतकृत्त्य सख्याहरी
आज काही खरे नाही..
ताजा ताजा
आवडते ड्रींक
अस्मादिक रम आणि बियर या दोन
२००८ साली आवडत असलेल पेय २०१३
शारीरिक व मानसिक त्राण ज्या
गिनीस
आपल्याकडे अनेकदा घरी आलेल्या
आइसक्रीम लस्सी
एकूण मी पेयांचा आशिक