टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र
प्रेषक धनंजय ( मंगळ, ०२/०५/२००८ - ०७:४९) .
लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र
अ अ अनशापोटी
आ आ आवळा खाल्ला
इ ई इथे बसलाय्?
उ ऊ उड्या मारतोय्?
ए ए एकदा सांगून
ऐ ऐ ऐकत नाही!
ओ ओ ओरडतोय्
औ औ औषध द्याला -
अं आं आंबटशोक
अ: आहा आंगलट आला!
छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला!
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


:)
छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला!
मस्त!
'अ आ इ ई....' ची बाराखडी आवडली...
आपला,
(सहा महिने आवेचा त्रास सहन केलेला!) तात्या.
तात्या
तुम्हाला जास्त मिसळ खाऊन झाला की काय त्रास्?
अजून येऊ देत
वैद्य धनंजयपंत, असेच निरनिराळ्या व्याधींवरील मंत्र येऊद्यात!!!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आवडली
बडबडगीत सदृश बालकविता आवडली
फक्त अं आं आंबटशोक चा अर्थ मुलं नक्की विचारतील असं वाटलं
ऋषिकेश
फक्त अं आं आंबटशोक चा अर्थ मुलं नक्की विचारतील असं वाटलं ;)
हे मात्र खरे.. म्हणूनच पुण्यातील मुलांना बिघडण्यापासून दूर ठेवण्यासाठी शहराबाहेर काढलेली बावन्नखणी अनेकमुलांना उत्सुकतेपोटीच आपलीशी वाटू लागली आणि प्रसिद्ध पावली...
पुण्याचे पेशवे
आंबटशोक ;-)
ती ओळ इथे ज्यादा लिंबू पिळल्यासारखी स्पेशल!
लहान मुलांसाठी :
> अं आं आंबटचिंबट
> अ: आहा आंगलट आले
असे म्हणता येईल.
"आंबटशोक" हा शब्द मी पहिल्यांदा किशोर मासिकात अशाच एका (मुलांना चालेल अशा) वात्रट कवितेत वाचला होता. (आमच्याकडे किशोर आणि चांदोबा येत असे, बहुतेक चांदोबा नसावा-चांदोबात कुठलीच कविता आठवत नाही.) आईने तेव्हा साळसूदपणे "आंबट-चिंबट आवडणे" असा अर्थ सांगितला. तेवढ्यावर माझे समाधान झाले, आणि कवितेतला एक अर्थही (दोनपैकी) बाळबुद्धीला लागला, विनोदी वाटला. चुकून वरचा मंत्र जसाचा तसा मुलांना म्हणून दाखवला तर माझ्या आईची युक्ती वापरता येईल... तसाही अर्थ लागतो.