मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेशमाच्या बाबांनी

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रथम आमच्या परमस्नेही विसोबा खेचरांचे आणि समस्त मिसळपाव पंचायतिचे हे संकेत स्थळ चालू केल्याबद्दल मनापासुन आभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.. आम्ही सभासद व्हायच्या आधीच आमच्या नावांने इथे शिमगा चालू असलेला बघून आम्ही धन्य झालो..असो.. सध्या जालावर आम्हाला फारसा चांगला कच्चा माल मिळत नसल्यामुळे आमची गोची झाली आहे..म्हणून वेळ काढायला .. जालावर मराठी गाणी ऐकत होतो . तेव्हा शांताबाई शेळक्यांचे रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी हे सुरेख गाणे ऐकायला मिळाले आणि आम्हाला ते 'प्रसव' का काय म्हणतात त्या वेदना सुरू झाल्या जित्याची खोड मेल्याशिवाय कशी जाणार रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी बाकपुरा आहे माझा काढीला हात नगा लावू माझ्या बॉडीला ! चूक झाली माझी लाखमोलाची विचारल मी ही पोर कोणाची विसरलो आहेकोण आहेकोण जोडीला हात नगा लावू माझ्या बॉडीला ! जात होती वाटेनं ती तोऱ्यात अवचित आला बाबा म्होऱ्यात आणि माझ्या नरडीला धरूनीया ओढीला हात नगा लावू माझ्या बॉडीला ! भीड नाही केली आल्यागेल्याची मागितली माफी मी त्या मेल्याची म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला हात नगा लावू माझ्या बॉडीला ! केशवसुमार

वाचन 38236 प्रतिक्रिया 0