स्ट्रिंग थिअरीचा पाया

अनन्त्_यात्री जे न देखे रवी...
(FunU)वादी लेखनाची होता उर्मी अनावर ब्रह्मलीन असूनही प्रकटू का मिपावर? बादरायणी संबंध येतील का माझ्या कामी? (एन्ट्रॉपीचे ॐकाराशी करू कलम कसे मी?) "जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? ओव्या, अभंग, सूक्तांची लेखा जोडू का शेपटी? डिस्क्लेमर टाकावा का स्वांत:सुखाचा शेवटी? असिधारा व्रत माझे (FunU)वादी लेखनाचे जरी गायबलो सध्या लोड नका घेऊ त्याचे ! एक शिक्रेट सांगतो कोणालाही सांगू नका (FunU)वादी लेखनाचा माझा आ-मिपांत* ठेका ! ~~~~~~~~~~~~ *आ-मिपांत= मिपाच्या अंतापर्यंत प्रेमळ सूचना: मुमुक्षूंनी कृपया हलके घ्यावे :)))
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

10 टिप्पण्या 2,520 दृश्ये

Comments

डॅनी ओशन नवीन

हाहाहा मस्तच. तुमची कविता क्वाणटम पातळीवर अतिशय प्रकाशित आहे.

चित्रगुप्त नवीन

In reply to by अनन्त्_यात्री

आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले. -- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)

स्वधर्म नवीन

"जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? हे सॉलीड आहे :-)

अनन्त्_यात्री नवीन

(१) दुसरी कविता ? कोणती ? (२) सर्जिकल स्ट्राईक ? कोणावर?

सोत्रि नवीन

हा हा हा ... हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे ! - (स्वांत-सुखी) सोकाजी