✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निघा निघा चिऊताई

अ — अनन्त्_यात्री, Fri, 03/21/2025 - 11:12
निघा निघा चिऊताई सारीकडे काँक्रीटले दाणा पाणी हरवले शहरी ह्या विषारी धुरके आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी अजूनही उरलेली पाखरे ही भयसूचनांचे गाणे गाऊनी टिपती दाणे अखेरचे झोपू नका अशा तुम्ही वाचविण्या मृत्युक्षणी येईल का मग कोणी बाळाला ह्या बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई बाळासकट ती जाई कायमची!

प्रतिक्रिया द्या
2327 वाचन

💬 प्रतिसाद (8)

खरे आहे!!

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 03/21/2025 - 11:24 नवीन
कविता छान आहे असे म्हणवत नाही. पण परीस्थिती अचूक टिपली आहे.
  • Log in or register to post comments

क्या बात है सर....

कर्नलतपस्वी
Fri, 03/21/2025 - 12:59 नवीन
येणारी पिढी चिऊताई बघायला संग्रहालयात न जाओ.... सटिक वर्णन म्हणावे लागेल. लहानपणी आंगणात पाहिलेल्या चिमण्या बघायला कुठे कुठे जावे लागते हा दैवदुर्विलास याची देही याची डोळा बघावा लागत आहे. कालच एक पक्षिमित्राने अमेरिकन चिऊताई चे फोटो पाठवले आहेत. काही चिमण्या अमेरिकेत जाऊन बदलल्या आहेत तर काही अजून तशाच म्हणजे देशी आहेत.. विश्व चिमणी दिवस यावर लेख लिहीण्याचा विचार होता. जुने साहीत्य खंगाळताना Paul Laurence Dunbar 1872 –1906 यांची एक खुप सुंदर कविता वाचनात आली. Paul Laurence Dunbar 1872 –1906 A little bird, with plumage brown, Beside my window flutters down, A moment chirps its little strain, Ten taps upon my window–pane, And chirps again, and hops along, To call my notice to its song; But I work on, nor heed its lay, Till, in neglect, it flies away. So birds of peace and hope and love Come fluttering earthward from above, To settle on life’s window–sills, And ease our load of earthly ills; But we, in traffic’s rush and din Too deep engaged to let them in, With deadened heart and sense plod on, Nor know our loss till they are gone. एक संदेश पण आला आहे. सरली सुरेख थंडी, फोफावला उन्हाळा, संतप्त सूर्य झाला, ओकेल तप्त ज्वाळा.  पक्षी दिशांना फिरतील, ते थव्यांनी सुकतील,कंठ त्यांचे मग शोधतील पाणी, सुकली तळी जळांची. पाणी पिण्यास नाही, त्या सानुल्या जीवांची होईल लाही लाही, त्यांच्या जीवाकरिता इतकी कराचं सेवा, वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा. 
  • Log in or register to post comments

क्या बात है सर....

कर्नलतपस्वी
Fri, 03/21/2025 - 13:00 नवीन

Paul Dunbar ची "The Sparrow" ही कविता

अनन्त्_यात्री
Fri, 03/21/2025 - 16:22 नवीन
माझ्याही आवडत्या कवितांपैकी एक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

वस्तुस्थिती आहे....

श्वेता२४
Fri, 03/21/2025 - 14:11 नवीन
मी गॅलरीमध्ये दाणा पाणी ठेवते पक्षांसाठी...कधी आली चिमणी तर इतकं छान वाटतं तिच्या चिवचिवाटाने......!!! खरंतर हे नैसर्गिक सुखही आता किती दूर्मिळ झालंय...
  • Log in or register to post comments

छान कविता!

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/21/2025 - 15:06 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments

चिमणी दिनाच्या निमित्तानं

खेडूत
Sun, 03/23/2025 - 11:28 नवीन
चिमणी दिनाच्या निमित्तानं आलेली कविता आवडली. खरंच दुर्मिळ होत आहेत चिमण्या!! ( मागे मीही मिपावर एका हिंदी कवितेचे रूपांतर केले होते..)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणाऱ्या

अनन्त्_यात्री
Mon, 03/24/2025 - 14:20 नवीन
सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा