✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

X/0 = ∞ ? !

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 07/25/2024 - 08:50
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो

प्रतिक्रिया द्या
1741 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रगती आहे!

अथांग आकाश
गुरुवार, 07/25/2024 - 10:58 नवीन
प्रगती आहे! कॅटरपिलरकडे शिकवणी सुरु ठेवा!! वाचकांचा मेन्दु कुरतडण्यात लवकर प्राविण्य मिळेल :-) Image removed.
  • Log in or register to post comments

चांगलय काव्य!

Bhakti
गुरुवार, 07/25/2024 - 11:01 नवीन
चांगलय काव्य!
  • Log in or register to post comments

लक्ष देऊ नका...

कर्नलतपस्वी
गुरुवार, 07/25/2024 - 12:23 नवीन
लिहीत रहा. सुख दु:खाची मांदियाळी, आयुष्य भोगीले गुणिले भागिले हाती शुन्य आले शुन्यात शुन्य मिळूनी ,अंनंत तत्व झाले X/0 = ∞ ? !
  • Log in or register to post comments

हुक शॉट येत नसेल तर बाउन्सर

अथांग आकाश
गुरुवार, 07/25/2024 - 13:13 नवीन
हुक शॉट येत नसेल तर बाउन्सर चेंडू सोडून द्यायचा! उगीच बॅट मधे घातली तर फलंदाज झेलबाद होतो :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

अनंतयात्री ,

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/25/2024 - 13:51 नवीन
अनंतयात्री , अफलातुन सुंदर लिहिलं गेलें आहे हे !
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व
हे कडवे वाचल्या वाचल्या माऊलींच्या अभंगातील कडवे आठवले . "दर्पणीं पाहता रूप न दिसे ओ आपुले | बाप रखुमादेवीवरें अम्ज ऐसे केलें " हे म्हणताना माऊलींच्या मनात जी भावना असेल ती काहीसी अशीच असावी. आपण आपलाच शोध घ्यायला जातो अन लक्षात येतें की आपण ह्या अखंड अनंत अस्तित्वाचाच एक हिस्सा आहोत , रादर आपण तेच आहोत . मग तुम्ही म्हणता तसें अनंत्त्वाची भेटी होते !
अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो
मग हे जे अनंतत्व आहे ते मोजयला , कवेत घ्यायला गेलो तर कवेत घेताच येत नाही . जी आसावला , कसनुसा होऊन जातो ! "क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥ "
धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो
आणि मग पुढे - आणि मग हे अनंत कवेत येत नाही, समजुन घेता येत नाही, अनुभवता येत नाही. कारण कोण अनुभवणार ? आणि आणि हा अनुभवणारा हा ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनंत ,त्याच्यातच आहे सामावलेला, म्हणजे अख्खा अनुभवच ह्या अनंताच्या कवेत आहे, अनंतच आहेत , अनुभवणारा आणि अनुभाव्य भिन्न नाहीच ! आपण तोच आहोत ! आपल्याच अंतरात ती अनंताची धुन झंकारते ! "बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥ " आणि मग हा केवळ झंकारण्याचा , ध्यानाचा समाधीचा एक क्षण रहात नाही, कारण प्रत्येक क्षणात, जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्हाला अनंतच दिसत आहे. त्यानंतर अख्खा प्रवासच अनंतात आहे ! तेव्हा तुम्ही अनंताचे यात्री झालेला असता , अनंताकडुन अनंताकडे अनंताच्या मार्गावरुन प्रवास करणारे! माऊली म्हणतात : घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ अहाहा. खुपच सुंदर कविता लिहिलीत तुम्ही आज. माऊलींची आठवण करुन दिलीत . मनःपुर्वक धन्यवाद :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा