X/0 = ∞ ? !
अगाधा भागाया
-शून्य माझ्यातले
घेता- भेटी आले
अनंतत्व
अनंत जोखण्या
- हाती मोजपट्टी
नव्हती- हिंपुटी
नाही झालो
धून अनंताची
झंकारली गात्री
अनंताचा यात्री
तेव्हा झालो
वाचने
1753
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
प्रगती आहे! कॅटरपिलरकडे शिकवणी सुरु ठेवा!!
वाचकांचा मेन्दु कुरतडण्यात लवकर प्राविण्य मिळेल :-)


चांगलय काव्य!
लिहीत रहा.
सुख दु:खाची मांदियाळी,
आयुष्य भोगीले
गुणिले भागिले हाती शुन्य आले
शुन्यात शुन्य मिळूनी ,अंनंत तत्व झाले
X/0 = ∞ ? !
In reply to लक्ष देऊ नका... by कर्नलतपस्वी
हुक शॉट येत नसेल तर बाउन्सर चेंडू सोडून द्यायचा!
उगीच बॅट मधे घातली तर फलंदाज झेलबाद होतो :-)
अनंतयात्री ,
अफलातुन सुंदर लिहिलं गेलें आहे हे !
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्वहे कडवे वाचल्या वाचल्या माऊलींच्या अभंगातील कडवे आठवले . "दर्पणीं पाहता रूप न दिसे ओ आपुले | बाप रखुमादेवीवरें अम्ज ऐसे केलें " हे म्हणताना माऊलींच्या मनात जी भावना असेल ती काहीसी अशीच असावी. आपण आपलाच शोध घ्यायला जातो अन लक्षात येतें की आपण ह्या अखंड अनंत अस्तित्वाचाच एक हिस्सा आहोत , रादर आपण तेच आहोत . मग तुम्ही म्हणता तसें अनंत्त्वाची भेटी होते !
अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालोमग हे जे अनंतत्व आहे ते मोजयला , कवेत घ्यायला गेलो तर कवेत घेताच येत नाही . जी आसावला , कसनुसा होऊन जातो ! "क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥ "
धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालोआणि मग पुढे - आणि मग हे अनंत कवेत येत नाही, समजुन घेता येत नाही, अनुभवता येत नाही. कारण कोण अनुभवणार ? आणि आणि हा अनुभवणारा हा ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनंत ,त्याच्यातच आहे सामावलेला, म्हणजे अख्खा अनुभवच ह्या अनंताच्या कवेत आहे, अनंतच आहेत , अनुभवणारा आणि अनुभाव्य भिन्न नाहीच ! आपण तोच आहोत ! आपल्याच अंतरात ती अनंताची धुन झंकारते ! "बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥ " आणि मग हा केवळ झंकारण्याचा , ध्यानाचा समाधीचा एक क्षण रहात नाही, कारण प्रत्येक क्षणात, जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्हाला अनंतच दिसत आहे. त्यानंतर अख्खा प्रवासच अनंतात आहे ! तेव्हा तुम्ही अनंताचे यात्री झालेला असता , अनंताकडुन अनंताकडे अनंताच्या मार्गावरुन प्रवास करणारे! माऊली म्हणतात : घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ अहाहा. खुपच सुंदर कविता लिहिलीत तुम्ही आज. माऊलींची आठवण करुन दिलीत . मनःपुर्वक धन्यवाद :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
प्रगती आहे!