Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 18/07/2024 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
आठवती ओले पायठसे मृद्गंध भारली सांज नभी मेघमृदंगा साथ करी रिमझिमती पाऊसझांज नभ तोलून धरल्या क्षितिजाला झगमगत दुभंगे वीज ढग पापण्यात दडण्याआधी अनिमिष जागतसे नीज सृजनाची हिरवी हाक जरी भवतालातून दुमदुमते ओथंबून येता नभ अवघे अवचितसे दाटून येते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1374
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आठवती ओले पायठसे मृद्गंध भारली सांज नभी मेघमृदंगा साथ करी रिमझिमती पाऊसझांज
अहाहा ! इथेच पैकीच्या पैकी गुण टाकले. बाकी ओळीही सुरेख. लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ पुढची दोन कडवी लयीत डगमगली आहेत. एक तर पूर्ण मुक्त किंवा पूर्ण लय असे आवडते. अर्थात पसंत अपनी अपनी..