आठवती..
लेखनविषय:
काव्यरस
आठवती ओले पायठसे
मृद्गंध भारली सांज
नभी मेघमृदंगा साथ करी
रिमझिमती पाऊसझांज
नभ तोलून धरल्या क्षितिजाला
झगमगत दुभंगे वीज
ढग पापण्यात दडण्याआधी
अनिमिष जागतसे नीज
सृजनाची हिरवी हाक जरी
भवतालातून दुमदुमते
ओथंबून येता नभ अवघे
अवचितसे दाटून येते
वाचने
1346
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
आठवती ओले पायठसे मृद्गंध भारली सांज नभी मेघमृदंगा साथ करी रिमझिमती पाऊसझांजअहाहा ! इथेच पैकीच्या पैकी गुण टाकले. बाकी ओळीही सुरेख. लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे
In reply to आठवती ओले पायठसे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
पुढची दोन कडवी लयीत डगमगली आहेत. एक तर पूर्ण मुक्त किंवा पूर्ण लय असे आवडते. अर्थात पसंत अपनी अपनी..
धन्यवाद
आठवती ओले पायठसे