नमस्कार मिपाकरांनो,
सोमवारी (१७-०१-२२) रात्री थोडी अंगदुखी जाणवू लागली होती.
दुसऱ्या दिवशी (१८-०१-२२) सकाळी अंगदुखी आणि डोकेदुखीच्या जोडीला सर्दीमुळे नाक चोंदणे, कोरडा खोकला, घशात खवखव आणि अंगात थोडी कणकणही जाणवू लागली.
धुळ, धुर आणि प्रदुषित हवेमुळे मला वर्षातून एकदा किंवा अपवादाने दोनदा ‘थ्रोट इंफेक्शन’ होते, त्यावेळी असे त्रास होत असल्याने अशावेळी हमखास उपयोगी पडणाऱ्या ‘ॲझीथ्रोमायसीन’ + ‘क्रोसीन’ ह्या गोळ्या घेतल्या पण रात्री जुलाब झाले आणि तापाचा पारा तीन पर्यंत चढल्यावर मात्र बुधवारी सकाळी दवाखाना गाठला.
डॅाक्टर चांगले अनुभवी असल्याने त्यांनी लक्षणे पाहुनच ओमायक्रॅानचे निदान करून औषधोपचार सुरू केले आणि खात्री करण्यासाठी टेस्ट करण्याचा सल्ला दिला. (रिपोर्ट अर्थातच पॅाझीटीव्ह आला)
त्या दिवशी (बुधवार १९-०१-२२) दिवसभर थोडा ताप असला तरी रात्री पारा दोन पर्यंत चढला होता.
काल गुरूवार (२०-०१-२२) दिवसभरात आणि रात्रीत ताप एक पर्यंत मर्यादीत राहीला आणि नाक व्यवस्थीत मोकळे होऊन छातीत साठलेला कफ बाहेर पडु लागला.
गेले तीन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ आणि रात्री कमी-अधिक प्रमाणात ताप होता पण आज शुक्रवार (२१-०१-२२) सकाळपासून ताप आला नाहीये. सर्दी नसल्यात जमा झाली आहे आणि खोकल्याद्वारे कफ बाहेर पडत आहे.
आता किंचीत अंगदुखी-डोकेदुखी आणि बऱ्यापैकी अशक्तपणा तेवढा जाणवत आहे.
आमच्या कुटुंबातील मी सोडुन बाकी सर्वांचे लसीकरण झालेले आहे. (आई-बाबांचे नुकतेच बुस्टर डोस देखील घेउन झाले आहेत)
लसीचे दोन डोस घेऊन झालेल्यापैकी माझी बहीण, तीचे मिस्टर आणि मुलगा असे तिघेही जानेवारीच्या पहील्या आठवड्यात ह्या आजाराने बाधीत झाले होते. त्या तिघांना दोन दिवस अंगदुखी आणि एक दिवस कमाल दोन पर्यंत ताप असा त्रास झाला होता. सात दिवस होम क्वारंटाईन रहावे लागले, कोणालाही हॅास्पिटलमध्ये दाखल व्हायची वेळ आली नाही. हा आजार पहिल्या आणि दुसऱ्या करोना लाटेएवढा गंभीर (निदान भारताततरी) नक्कीच नाही.
आता तिसऱ्या आठवड्यात लसीचा एकही डोस न घेतलेल्या मला हा आजार झाल्यावर चार दिवसांत काय त्रास झाला तो अनुभव मी मांडला आहे आणि पुर्ण रिकव्हर होईपर्यंत अधिक काही सांगण्यासारखे असल्यास त्याचीही भर घालीनच.
आपल्यापैकी (लस घेतलेल्या अथवा न घेतलेल्या) कोणाला किंवा कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळींना हा आजार झाला असल्यास त्यांचे अनुभव शेअर करावेत ही विनंती.
वैयक्तिक पातळीवर मी लसीकरणाच्या विरोधात असलो तरी ह्या धाग्यावरील चर्चेचा रोख त्याविषयी न रहाता शक्यतो स्वत:च्या किंवा आपल्या आप्तस्वकियांच्या ह्या आजारात आलेल्या अनुभवकथनावर आधारीत राहील्यास चांगली माहिती गोळा होऊ शकेल.
अपडेट (शनिवार - २२-०१-२२) आजही सकाळपासून ताप आलेला नाही आणि खोकलाही कमी झाला आहे. पण काल संध्याकाळ पासुन एक नविन त्रास सुरू झाला. आधी डावा खांदा आणि मानेचा डावा भाग दुखायला सुरूवात झाली मग दोन-अडीच तासांनी उजवा खांदा आणि मानेचा तो भागही चांगलाच दुखायला लागला. ह्या मान आणि खांदेदुखीमुळे पहाटेपर्यंत झोप लागु शकली नाही. आता डावीबाजु पुर्णपणे दुखायची थांबली आहे… उजवी बाजूही लवकरच दुखायची थांबेल अशी आशा आहे. बाकी अशक्तपणा अजूनही बऱ्यापैकी जाणवतो आहे आणि तो बरेच दिवस राहू शकेल असे अनुभवी लोकांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अपडेट (सोमवार - २४-०१-२२) काल (रवीवार) पहाटे इथे चांगलाच पाऊस पडल्याने हवामान अचानक बदलले. दिवसभर ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या थंडीमुळे बऱ्या झालेल्या सर्दीने पुन्हा डोके वर काढले! मानेचा उजवा भाग आणि खांदा अजुन पुर्णपणे थांबायचे नाव घेत नाहीये. आज डॅाक्टरांनी दिलेला पाच दिवसांच्या औषधांचा कोर्स संपत आहे. गेले पाच दिवस घेत असलेली औषधे. Zolzica (Capsules) Cefzica-O Zykacet-M Anmol-650 Amrox (Cough Syrup) Trudine (Germicide Gargle) (ह्या व्यतिरिक्त त्यांच्या कडच्याही २ प्रकारच्या सुट्ट्या गोळ्या डॅाक्टरांनी दिल्या होत्या त्यांची नावं माहित नाहीत.) उद्या फॅालोअपला जायचे आहे तेव्हा खांदेदुखी थांबण्यासाठी आणि पुढे घेण्यासाठी काही नवीन औषधे देतात का ते पहायचे.

वाचने
13792
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा !
तुम्ही लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा..
लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.
होणार बरे तीन चार दिवसांत.
थोडक्यात
मुंबई महापौराच्या
In reply to थोडक्यात by धर्मराजमुटके
ओSSSमायक्रॉन
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा
In reply to ओSSSमायक्रॉन by ज्ञानोबाचे पैजार
छानपैकी आराम करा आणि काळजी
तज्ञांना प्रश्न
काळजी
आमच्या घरचे सगळे या साथीतुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Siva Jag Mein... :- Tadapलवकरात लवकर बरे व्हा
लवकरच बरे व्हाल
Omeycron
>>पण लबाड ओमायक्रोन फसवले
In reply to Omeycron by sunil kachure
पूर्ण वाचावे
In reply to >>पण लबाड ओमायक्रोन फसवले by ॲबसेंट माइंडेड…
लवकर बरे होताल, विश्रांती
लवकर बरे व्हाल.
शुभेच्छांसाठी आपल्या सर्वांचे मन:पुर्वक आभार
अपडेट (शनिवार - २२-०१-२२)
लवकर बरे व्हाल...
In reply to अपडेट (शनिवार - २२-०१-२२) by टर्मीनेटर
Lavkar Bare Vah
काळजी घ्या
माझा अनुभव
तुम्हाला ओमिक्रॉन झालाय
काळजी घ्या! लवकर बरे व्हा आणि
अपडेट (सोमवार - २४-०१-२२)
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.
In reply to अपडेट (सोमवार - २४-०१-२२) by टर्मीनेटर
..
In reply to अपडेट (सोमवार - २४-०१-२२) by टर्मीनेटर
औषधे ?
In reply to अपडेट (सोमवार - २४-०१-२२) by टर्मीनेटर
लवकर बरे व्हा!
तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हा
एकदम स्पष्ट
बरे झाला असाल आता पर्यंत, अशी
आमचा अनुभव
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि डॉक्टरी ईलाज
अभिनंदन
In reply to आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि डॉक्टरी ईलाज by टर्मीनेटर
माझा अनुभव
तुमच्या धाडसी निर्णयाला दाद
In reply to माझा अनुभव by कासव
भरती होण्याच्या विरोधात नाहीच
In reply to तुमच्या धाडसी निर्णयाला दाद by चौथा कोनाडा
रुग्णालयांच्या बाजारूपणा
In reply to भरती होण्याच्या विरोधात नाहीच by कासव
बहीण आणि भाऊजी यांना दुसऱ्या
च्यवन ऋषि जिंदाबाद ...
खूप टोकाचे अनुभव आहेत