बग आली माझ्या कोडा
लेखनविषय:
काव्यरस
धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा
किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?
डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे
आता उद्धरण्या केवळ
तूच येई धावत सबळ
पाषाणाच्या चुकल्या कोडी
टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी
- पाभे
२६.०३.२०२४
वाचने
5424
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मस्तच, पण टीम मेंबरांच्या मदतवजा हस्तक्षेपाचीपण मजा यात येऊ द्या की.
अशा परिस्थितीत अनुभव सर्वाधिक उपयोगी ठरतो. रचना आवडली.
कविता आवडली..
वा !
अरे अरे टीम मेंबरा
कशाला फुका आरडाओरडा
आळशा आधार बार्ड
वापर की जरा कार्ड (पक्षी - डोके)
कमी कर टंगळ मंगळा
झडकरी काम उरकी बाळा
ऑफिस आता बंद होई
बायको घरी वाट पाही
रामे म्हणे ऐशा नरा
माराव्या मोजुनी पैजारा
In reply to पाभे यांची माफी मागुन by राजेंद्र मेहेंदळे
वा, रामे, झकास!
In reply to पाभे यांची माफी मागुन by राजेंद्र मेहेंदळे
मूळ कवितेवर प्रतिक्रियेने चार चंद्र लावले आहेत ;-).
In reply to पाभे यांची माफी मागुन by राजेंद्र मेहेंदळे
प्रॉम्प्ट होता चांगला
बार्ड तरीही गंडला
बार्ड झाले जेमिनी
आज झाले एनिमी
वाटले जे गेम-चेंजिंग?
निघाले ते नेम-चेंजिंग
गपटाचे धरता पाय
भरकटे तोही हाय..
अपॉलॉजीचा नुसता पूर
सोल्यूषण राहिले दूरदूर..
खरच प्रतयक्षाहून प्रतिमा (प्रतिक्रिया) सुंदर !!
पाषाणाच्या जरी चुकल्या कोडी
टंकाळली बोटं कडाकडा मोडी
भंजाळले डोके तरी सुटेना कोडे
वारंवार लिडरा डोळे मोडी
काय करू आता सांगा तुम्ही
पाषण म्हणे....
अरे अरे पाषाणा ....
फुका फोडशी टाहो
झडकरी शरण जा हो
बेतुक्या माजी
म्हणे मेंबर....
उठ उठं पाषाणा काढ धुम्रकांडी
सोडी गोल गोल धुम्रवलये भराभरा
बार्ड,जेमिनी आणी चाटगपटं
सारे वाकतील चरणी पटापट
खोडा सुटेल कोडाचा झटपट
बेतुक्या म्हणे.....
निसंदेह सुटेल कोडा,
सत्वर नवस फेडा
चकणा,उदक सोडा
बेतुक्या मुखी.
-बेतुक्या
अपॉलॉजीचा नुसता पूर
सोल्यूषण राहिले दूरदूर.--सुरेख
सत्वर नवस फेडा
चकणा,उदक सोडा
बेतुक्या मुखी.---ही सुचवणी पण जबरदस्त
चूक झाली कुठं गावंना
बोलल्या बिगर रहावना
बु्जलिया डोळ्यांची भोकं
न खाजवा की
तुम्ही खाजवा की
जरा खाजवा की
बग शोधायला डोकं
न खाजवा की
बग शोधायला डोकं


In reply to चूक झाली कुठं गावंना by अथांग आकाश
आवडले
कवितेवर कवितांचा प्रतिसाद पाहून
डोळे ओले झाले.
वाटते कवितेला आता
अच्छे दिन आले.
मस्तच, पण टीम मेंबरांच्या