प्रेरणा -
काळजाच्या या तळाशी राहशी तू - Deepak Pawar
बिल्डींगच्या या तळाशी राहशी तू
सारखा शेजारी माझ्या नांदशी तू
मागणे ते, "उसणवार देत जावे मी तुला!"
कसे सांगू? संयम जणू माझा मागशी तू
चव नाही माझ्या मीठाला सांगताना
का रे आता? जीभ वेड्या चावशी तू?
एवढा आता कसा हा बदलला तू
जाऊनी वाटे, माझ्याशी भांडशी तू!
आठवू मी का तुला? म्हणतोस आणिक
उसणवाराला तरी आता जागशी तू?
विशेष
वाचने
8380
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
=)) आवडले
=))
आवडले
हुच्च
आवडले. जब्रा.
कविता एकतर डोक्यावरून जातात (खरंतर लैच डोक्यात जातात)
कविता एकतर डोक्यावरून जातात (खरंतर लैच डोक्यात जातात) त्यामुळे त्यांच्या वाटेला जात नाही 😂
पण कवितांची विडंबने मात्र चेहऱ्यावर हसू फुलवत असल्याने ती आवर्जून वाचतो!
उधार-उसनवारी करणाऱ्या शेजारी/सहवासींवरचे हे विडंबन आवडले 😀
आवडलीच!
आवडलीच!
एकदम हुच्च!!
काळजाच्या तळाशी असलेल्या शेजाऱ्याला पार उचलून फेकलय!!
मस्त
मागताना, ताक भांडे किती लपविशील तू
दिलेले, पाच हजार परत कधी देशील तू
हा हा हा.....
यावरून भांडे का लपविता ... ??
In reply to मस्त by कर्नलतपस्वी
यावरून भांडे का लपविता ... ??? हे मिपावरील एक अजरामर विडंबन आठवले
खिक्क
खिक्क
छान.
आवडले. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
आवडली.
आवडली.