शशक - भूल भुलैय्या २
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तिला पटत नव्हतं तरी आमच्या दोघांच्या अधिक चांगल्या भविष्यासाठी मला तिथे जायचं होतं.
अवघड प्रवासानंतर मी तिथे पोहोचलो.
ती गाणं ऐकत होती "कसे सांगू " ? ती धावत मला बिलगली.
"आता पुन्हा जायचं नाहीस." क्षणार्धात तिनं माझ्या हातातलं मशीन बाल्कनीतून भिरकावून दिलं
"मूर्ख झालीस का ?" तिच्यासोबत मला आता रहायचं नव्हतं.
" इतकी वर्षे मी तुझीच वाट पाहिली , तुझ्यावरच प्रेम केलं. आता वयस्कर झालेली मी तुला नकोय ?" तिच्या डोळ्यात पाणी होतं.
" . . . . "
" तु गेल्यावर मी एकटीनेच घर चालवलं. तुझी संपत्ती आणि विम्याची रक्कम मला मिळाली; पण सात वर्षानंतर..
तुझ्याकडे आता एकही पैसा नाहीये. त्यामुळे तु तसलं काहीही करु शकणार नाहीस.आता मीच तुझं वर्तमान आहे"
प्रतिक्रिया
लेखकाचे चार शब्द
तसंही स्पर्धेतली माझी धडपड
तसंही स्पर्धेतली माझी धडपड विजयी न झाल्यानेजे जिंकले त्यांचा आयडी ब्लाॅक मारून त्यांना बक्षीस देण्यात आलं. तुम्हालाही हवंय का बक्षीस?खेदजनक
कथेपेक्षा विश्लेषण मोठे झालं
धाग्यावर स्वागत..