तंत्रज्ञान म्हणजे काय ? एखादी अपेक्षा कशी पूर्ण करायची ह्यांचे ज्ञान. बहुतेक जनावरांना भूक लागली कि ती खातात. हे ज्ञान बहुतेक वेळा त्यांना खूप विचार करून येत नाही तो त्यांच्या जैविक अस्तित्वाचा भाग असतो. मानव प्राणी वेगळा आहे. एखादी अपॆक्षा निर्माण झाली कि ती कशी पूर्ण करायची ह्यावर मानव विचार करतो आणि काळाच्या ओघांत नवीन ज्ञान निर्माण करून ती अपॆक्षा पूर्ण करतो. मानवाची हि क्षमता थक्क करणारी. भांडी निर्माण करण्यासाठी मानवाने चक्राची निर्मिती केली. मग हातगाडीची. आणि काहीच हजार वर्षांत मानवाने चंद्रावर पाय ठेवला. आज काल मानवजात दशकांचे प्रयत्न आणि लक्षावधी लोकांचे मेंदू कामाला लावून विविध अपेक्षा पूर्ण करतो.
हे सर्व साधे सोपे वाटले तरी काही गोष्टी लक्षपूर्वक पाहिल्याशिवाय समजणार नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे कसला शोध कुणी कधी लावला ह्याला विशेष महत्व नाही (सामान्यज्ञान सोडून). न्यूटन ने हा शोध लावला किंवा चितळ्यांची भाकरवडी बेस्ट ह्याच्या मागे एक सत्य दडलेले असते ज्याची चर्चा विशेष होत नाही. प्रत्येक यशामागे हजारो लोकांचे अपयश दडलेले असते. तुम्ही बाजारांत जाऊन काही दुकाने नोट करा. दहा वर्षांनी त्यातील अनेक दुकाने बंद होऊन नवीन उघडली असतील. २० वर्षांनी आणखीन. एखादेच चितळे बंधू किंवा वैशाली व्हेज दशकों दशके त्याच जागी त्याच यशाने चालू असते. पण हजारो लोकांनी प्रयत्न केले म्हणून त्यातून १-२ यशस्वी होतात. हजारो प्रयत्नरत माणसातून नक्की कोण यशस्वी होणार हे आपण आधी सांगू शकत नाही. पण एकदा माणूस यशस्वी झाला आणि न्यूटन ने गुरुत्वाकर्षणाचे नियम सिद्ध केले कि ते ज्ञान सर्वांचे होते. मग त्या ज्ञानावर इतर लोक दुसरे शोध लावण्याचे प्रयत्न करतात त्यातील बहुतेक लोक अपयशी होतात पण एखादा दुसरा यशस्वी होतो. यशाचा मनोरा अपयशाच्या पायावर खंबीर पणे वाढत जातो.
जितके प्रयोग जास्त, तितके यशस्वी लोक जास्त. प्रयोग जास्त करायचे असतील तर मग जास्त मानव आवश्यक आहेत. म्हणजे लोकसंख्या जास्त असेल तर आम्ही खूप प्रयोग करू शकतो आणि त्यामुळे विविध शोध सुद्धा लागू शकतात.
तर मग भारताची लोकसंख्या इतकी प्रचंड असून सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ११ फ़ुटबाँल पटू का बरे भारतांत नाहीत ? (पण टीचभर असलेल्या पोर्तुगाल देशांत बक्कळ आहेत).
ह्याचे कारण असे आहे कि निव्वळ मेंदू असला म्हणून तुम्ही जास्त प्रयोग करू शकता असे नाही. त्या मेंदूला स्वातंत्र्य असले पाहिजे. विविध प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य असले तरच लोक विविध प्रयोग करून पाहू शकतात. जर तुम्हाला कंपनी निर्माण करायलाच १ वर्ष लागत असेल तर प्रचंड वेळ त्यांतच जातो. प्रत्येक गोष्टी साठी कुणाची तर परवानगी घ्यावी लागत असेल तर मग प्रयोग करण्याची समाजाची प्रवृत्ती मंदावते.
पण स्वातंत्र्य हा एकच फॅक्टर आहे असे नाही. भूगोल आणि हवामान सुद्धा मानवी प्रयोगक्षमतेला चालना देतात. उदाहरण घ्या. बहुतेक गोऱ्या राष्ट्रांनी जसे फ्रांस, पोर्तुगाल, इंग्लंड इत्यादींनी १५०० ते १८०० बऱ्यापकी प्रगती केली. जहाज बांधणी, व्यापार इत्यादी करून शेवटी दुसऱ्या देशांत त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या. पण रशिया हा एक असा देश आहे जो मोठा होता आणि गोरा सुद्धा होता पण त्याने ह्या क्षेत्रांत प्रगती केली नाही. कारण रशियातील जवळ जवळ सर्व नद्या ह्या आर्टिक समुद्रांत जातात. तिथून प्रवास दुष्कर आहे. ह्याच्या उलट इंग्लंड ची थेम्स, कलकत्ता ची हुगळी आणि पॅरिस ची सॅन नदी आहे. आफ्रिकेचे उदाहरण घ्या. इथे भरपूर नद्या आहेत पण कुठलीही नदी प्रवास कारण्यासाखी नाही कारण ह्यांच्या पाण्याला वेग आहे आणि धबधबे आहेत. त्यामुळे प्रवास आणि व्यापार मुश्किल होतो.
हवामानाचा मानवी प्रयोगक्षमतेवर परिणाम होतो. औद्योगिक क्रांती युरोप मध्ये का झाली ? चीन, भारतीय आणि अरब लोकांनी भूतकाळांत बऱ्यापैकी शोध लावले होते. युरोप हा थंड प्रदेश आहे. इथे तुम्हाला उन्हाळ्यांत भरपूर काम करून हिवाळासाठी अन्न साठवून ठेवावे लागते कारण एकदा बर्फ पडायला लागले कि मग कुठलेही झाड उगवत नाही. त्यामुळे आपल्या परिवारासाठी अन्न आणि आपल्या जनावरांसाठी चारा ह्या दोन्ही गोष्टी साठवल्या पाहिजेत. नाहीतर किमान एकाधे जनावर मारून त्याचे मांस व्यवस्थित साठवून ठेवायला पाहिजे. नंतर हिवाळ्यात काहीही न करता कुडकुडत पडून राहायचे. गरज हि शोधाची जननी असते. हिवाळ्यातील त्या थंडीनं मग बहुतेक लोक उष्णतेविषयी विचार करतात. ह्यातूनच पुढे कोळसा, कोळसा वापरून बाष्पयंत्रे इत्यादींचे शोध थंड प्रदेशांत लागले आणि लोकप्रिय सुद्धा झाले.
पण इतकेच नाही तर हिवाळ्यात फॅक्टरीचे तापमान बाहेरील तापमाना पेक्षा १०-१५ डिग्री जास्त असायचे कारण कोळश्यांतील उष्णता हवेत जायची. त्यामुळे लोक खूप आनंदाने हिवाळ्यात फॅक्टरी मध्ये जाऊन काम करायचे आणि कधी कधी फुकट सुद्धा. जितके जास्त लोक ह्या क्षेत्रांत आहेत तितके मग जास्त प्रयोग आणि त्यामुळे त्या दिशेने वेगाने प्रगती. ह्याची परिणीती औद्योगिक क्रांती आणि पहिली शेती क्रांतीत झाले. भारतीय सुद्धा पाहिजे तर बॉयलर वगैरे इशांत सहज अनु शकले असते आणि आणला सुद्धा होता. पण इकडचे तापमान आधीच जास्त मग त्यांत आखीन गरमी कोण सहन करणार ? त्यामुळे डोके असले, लोक असले तरी औद्योगिक क्रांतीसाठी जे हवामान असायला पाहिजे होते ते भारतांत नव्हते. त्याचवेळी शास्त्रीय संगीत, नृत्य इत्यादी क्षेत्रांत भारतीयांची पीछेहाट कधीच झाली नाही. चित्रपट सृष्टीचा पाया सुद्धा एका भारतीयाने वेड घेऊन रचला आणि त्याचा पुढे वटवृक्ष झाला.
स्वातंत्र्यानंतर अनेक क्षेत्रांत भरारी घेणे भारतीयांना शक्य होते. त्या काळांत देश सोडून गेलेल्या अनेक लोकांनी केनिया ते कॅनडा पर्यंत प्रचंड प्रगती केली. पण स्वतंत्र भारतांत भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य नव्हते त्यामुळे प्लॅनिंग कमिशनच्या परवानगी शिवाय काहीही करणे अशक्य होते. त्यामुळे देशाची पीछेहाट प्रत्येक क्षेत्रांत होत गेली.
फिनलंड किंवा नॉर्वे सारख्या देशांत विशेष लोकसंख्या नाही त्यामुळे ह्या देशांत काय काय निर्माण होऊ शकते ह्यावर प्रचंड मर्यादा आहेत. त्याशिवाय सिंगापुर किंवा हॉंकॉंग प्रमाणे इथे बहुसंख्य प्रमाणात लोकांची ये जा नाही त्यामुळे नवीन विचार येणे आणि बाहेर जाणे हे सुद्धा नाही त्यामुळे त्यांच्या साठी प्रत्येक क्षेत्रांत ठसा उमटवणे मुश्किल आहे. त्यामुळे ह्या देशांत त्यांनी काही ठराविक क्षेत्रांतच त्यांचे कौशल्य निर्माण झाले आहे (मुद्दाम हुन "झाले" हा शब्द वापरला आहे, कारण कुणी सरकारने प्लॅनिंग करून ते "केले" नाही ) आणि बहुतेक वेळा हे कौशल्य त्यांच्या इतिहासाशी निगडित आहे. नोकिया फोन हा फिनलॅंड मधील होता. नोकियाच्या बाबतीत आम्ही विनोद करायचो कि हा वरून पडला तर फोन पेक्षा फारशीला धोका जास्त. आयफोन वगैरे मंडळी आपला फोन जलप्रूफ आहे इत्यादी बाता मारत असताना ११०० चुकून वॉशिंग मशीन मध्ये गेला तरी बाहेर येऊन वजयाचा. फिनलंड ह्या देशाच्या संस्कृतीत ruggedness ह्याला प्रचंड महत्व आहे. ते लोक स्वतःला सिसू असे म्हणतात. ह्याचा अर्थ नतुटणारे असा होतो. छोटे दिवस आणि प्रचंड -४०फ वाली थंडी. बर्फाचे डोंगर अश्या वातावरणात हि मंडळी वाढली आहेत. फिनलॅंड मधील विजेचा खांब पासून कुत्र्याला बांधण्याचा खुंटा हा १००-२०० वर्षे टिकेल अश्या पद्धतीने बांधलेला असतो. हि मानसिकता आज उद्या निर्माण झालेली नसून शेकडो वर्षांच्या काळाच्या ओघांत उत्क्रांत झाली आहे.
नोकिया च्या कथा हव्या असतील तर इथे वाचा : https://www.quora.com/Why-are-Nokia-phones-stereotyped-as-being-indestr…
भारतासारखा देश अवाढ्यव असल्याने भारत सर्वच क्षेत्रांत ठसा उमटवू शकतो. अवकाश प्रवास पासून फ़ुटबाँल पर्यंत आणि अत्याधीनुक शिक्षण व्यवस्था पासून नवीन ऊर्जास्त्रोत पर्यंत. काही क्षेत्रांत भारताला खूप जुनी परंपरा आहे उदाहरणार्थ शस्त्रास्त्रे, युद्धकला, संगीत, नृत्य आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे शिक्षण व्यवस्था. व्यापार, धातुकाम इत्यादींत सुद्धा ऐतिहासिक काळापासून भारतीयांनी खूप काही कमावले होते. भारतीयांची बहुतेक प्रगती हि त्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संकल्पनावर आधारित होत्या.
आधुनिक काळांत ह्या बहुतेक क्षेत्रांत पूर्ण पणे बदल घडवून आणले. काही क्षेत्रांत इस्लामिक संकल्पना तर काही क्षेत्रांत साम्यवादी किंवा समाजवादी संकल्पना रुजवल्या गेल्या. ह्याचा परिणाम भारताची प्रयोगशीलता, उद्यमक्षमता मंदावण्यात झाला. शिक्षण सारख्या काही व्यवस्था इतक्या जोराने सरकारी कचाट्यांत आहेत कि मुलाला नर्सरी ऍडमिशन घेण्यासाठी काय काय खस्ता खाव्या लागल्या ह्यावर लोक मिपावर लेख लिहून चर्चा करतात. प्लॅनिंग कमिशन ने मागील ६० वर्षांत जे काही रिपोर्ट्स प्रकाशित केलेले आहेत ते वाचून पाहावे. जिथे जिथे ह्यांचे प्लॅनिंग आहे तिथे तिथे भारताने शेण खाल्ले आहे. ह्याउलट देशांत संगणक आधारित काही धंधे आहेत हे ह्यांना ठाऊक सुद्धा नव्हते तेंव्हा वेगाने देशांत ह्या क्षेत्राची प्रगती झाली. यशस्वी होण्यासाठी, अपयशाचा अनुभव सुद्धा सामाजिक स्तरावर अत्यंत गरजेचा आहे. कुणीही अपयशी होणार नाही अश्या प्रकारचा समाज आपण निर्माण करायला गेलो तर प्रयोग क्षमता नष्ट करावी लागते. हि एकदा नष्ट झाली कि मग प्रगती खुंटते.
अर्थांत वर जे काही लिहिले आहे ते माझे मत आहे असे नाही. ऍडम स्मिथ पासून मॅट रिडले पर्यंत विविध लोकांनी ह्यावर विपुल प्रमाणात लिहिले आहे.
पण ह्याचा एक वेगळा परिणाम आहे ज्याबद्दल मला लिहायचे होते.
मानवी शरीरांत रोगप्रतिकारक क्षमता असते. शरीरांत काही जंतू आले तर मग विविध प्रकारची अँटीबॉडी वगैरे निर्माण करून रोगप्रतिकारक क्षमता त्याच्यावर हल्ला करते. त्यानंतर कफ, शरीराचे तापमान वाढवणे ह्या गोष्टी होतात. मग शरीरांत थकावट निर्माण करून त्याला थोडा आराम करण्यास भाग पडण्याची क्षमता सुद्धा आपल्या शरीरांत असते. हे सर्व करूनही काही नाही झाले तर प्रसंगी शरीर किडनी, लिव्हर इत्यादी अवयव बंद पडून संपूर्ण शरीराचे ध्यान जंतूंना नष्ट करण्यासाठी वळवले जाते.
हि सर्व प्रक्रिया कोणी डिसाईन नाही केली तर काळाच्या ओघांत उत्क्रांत झाली आहे. म्हणजे ज्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता असे काम करत नाही ते शरीर मरते आणि म्हणून प्रजनन करू शकत नाही. त्यामुळे ती जनुके पुढील पिढीला मिळत नाही. ह्याउलट जे शरीर टिकते ते प्रजनन करून जनुके पुढील पिढीला देते. त्यामुळे शरीराचे हे गुण वृद्धिंगत होत जातात.
मानव शोध प्रक्रिया ह्यासारखीच आहे. जे लोक यशस्वी होतात त्यांचे ज्ञान इतर लोक जास्त शिकतात, त्यांची जास्त कॉपी करतात तर वारंवार जे लोक फेल होतात त्यांना लोक जास्त किंमत देत नाहीत. त्यामुळे यशाचा मार्ग आणखीन आणखीन विस्तृत होत जातो. पण यश हे नेहमी यशच राहील असे नाही. एखादी कंपनी जितकी यशस्वी तितकी ती मोठी होत जाते. मोठी झालास त्यांचे जास्त दुश्मन बनतात. भ्रष्टाचाराला आळा घालणे कठीण जाते, भाऊबंदकी निर्माण होते इत्यादी आणि कधी ना कधी यश अपयशांत बदलते. पण त्या अपयशातून काय करू नये हे इतर लोक शिकतात आणि एकूण समाजाला फायदा होतो.
हे सुद्धा काही प्रमाणात जनुकां सारखेच आहे. मानवी शरीराने गरजे पेक्षा जास्त अन्न खाल्ले तर ते चरबी म्हणून शरीरांत साठवले जाते. कारण पूर्वी माणसाला दररोज अन्न मिळेल ह्याची शाश्वती नव्हती. त्यामुळे अंगांत चरबी साठविण्याच्या जनुकांना जास्त वाव मिळाला. पण मग चरबी प्रमाणाबाहेर का वाढत नाही ? चरबी प्रमाणाबाहेर वाढली तर त्याचा अर्थ असा होतो कि हा माणूस शारीरिक काम करत नाही. मग शारीरिक काम न करणाऱ्या माणसांना (हजारो वर्षांपूर्वी) जोडीदार मिळणे कठीण होते कारण शिकार केली नाही तर अन्न कसे येणार ? त्यामुळे जास्त लठ्ठ माणूस सुद्धा प्रजाजन करायला अक्षम होता. त्यामुळे मानवी शरीराची उत्क्रांती अशी झाली कि शरीरावर थोडीफार चरबी असणे चांगले पण खूपच नाही. पण ज्या प्रमाणे वैयक्तिक स्तरावर जनुकीय बदल अनेक गोष्टी घडवून आणतात त्याच प्रमाणे सामाजिक स्तरावर सुद्धा जनुके बदल घडवून आणतात.
एखादा समाज जर खतरे में असला तर ? समाज म्हणून आपल्या लोकांत काही सामाजिक स्तरावरची रोगप्रतिकारक क्षमता विकसित झाली आहे का ? ह्याचे उत्तर सुद्धा हो आहे. समाजाची अधोगती होत असली तर अश्या समाजांत मुले निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढते. वैयक्तिक स्तरावर ती का वाढते ह्याची कारणे वेग वेगळी असली तरी, सामाजिक स्तरावर ती वाढणे मानवी समाजाची एक उत्क्रान्तिक वाटचाल आहे असे वाटते. आफ्रिकेतून मानवाला चीन किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये पोचायला साधारण १०,००० वर्षे लागली. ह्यादरम्यान कित्येक पिढ्या होऊन गेल्या असतील आणि कित्येक संकटे ह्या लोकांनी झेलली असतील आणि वेगाने प्रजनन करणे कदाचित ह्या लोकांसाठी महत्वाचा फॅक्टर असेल.
समाज गरिबींत असला किंवा धोक्यांत असला तर वेगाने प्रजनन करून माणसांना वाढविणे हा कदाचित आपल्या मानवी समाजाचा एक सामाजिक स्तरावरील immune रिस्पॉन्स असू शकतो. म्हणजे इतके लोक निर्माण करायचे कि त्यातून काही व्यक्ती अश्या निपजतील ज्या समाजापुढील काही मोठ्या समस्यांचे निराकरण करू शकतील. ह्याला आपण कदाचित throwing babies at problems असे म्हणू शकतो. अमेरिकेत द्वितीय महायुद्धानंतर प्रचंड प्रमाणात मुले निर्माण झाली. इतकी कि ह्या संपूर्ण पिढीला बेबी बूमर्स असे म्हणतात. अर्थांत वैयक्तिक स्तरावर ह्याची कारणे अनेक लोक देतात. पत्नीपासून खूप काळ दुर राहिल्याने त्यांनी त्याची भरपाई केली, खूप पुरुष युद्धांत असल्याने स्त्रिया पुरुषांसाठी आसुसलेला होत्या इत्यादी इत्यादी आणि त्यांत तथ्य सुद्धा असेल पण सामाजिक स्तरावर तो एक प्रकारचा immune रिस्पॉन्स म्हणून सुद्धा पहिला जाऊ शकतो. भारतीय स्त्रियांनी ओव्हरटाईम करून मुले निर्माण नसती केली तर समाजाचे रक्षण इस्लाम पासून करणे शक्य होते का ?
भारताचे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर ज्या काही एक दोन गोष्टी चांगल्या झाल्या ह्यांत भारताची प्रचंड लोकसंख्या ह्याचा भाग मोठा होता. लोकसंख्या प्रचंड असल्याने भारताला वसाहत म्हणून ठेवणे इंग्लंड ला शक्य नव्हते. लोकसंख्या थोडीच असल्यास सहज लोकांची गळचेपी करून त्यांनी भारताला स्वतंत्र नाही तर किमान कॅनडा, ऑस्ट्रेलिया प्रमाणे मंडलिक राष्ट्र म्हणून ठेवले असते. हिंदू लोकांना कदाचित त्यांच्या रिसर्वेशन वर राहावे लागले असते.
स्वातंत्र्यानंतर सुद्धा साम्यवादी आणि समाजवादी लोकांना लहान लोकसंख्येची गळचेपी करणे सोपे गेले असते. भारताची विविधता आणि लोकसंख्या इतकी मोठी होती कि प्लॅनिंग कमिशन ला ती पुरून उरली. तरी सुद्धा साम्यवादी आणि समाजवादी लोकांनी भारताचे प्रचंड नुकसान केले. गरीब राष्ट्रांना काही भिकेचे तुकडे देऊन त्यांना आपल्या अंगठ्याखाली ठेवायची पाश्चात्य राष्ट्रांची जी पद्धत होती ती भारतांत चालली नाही कारण भीक द्यायची असली तर लोकसंख्या प्रचंड असल्याने अमेरिकेला सुद्धा परवडणारी नव्हती. त्यामानाने पाकिस्तानची लोकसंख्या कमी असल्याने त्यांना गळ्यांत पट्टा बांधून व्यवस्थित ठेवले. अमेरिकेची हि कोंबडी अंडे मात्र चीनच्या अंगणात जाऊन घालते.
१९९२ मधील विविध आर्थिक सुधार सुद्धा भारत सरकारने चांगली अक्कल येऊन केले नाहीत. दुर्दैवाने इंग्लंड अमेरिकेकडून भीक घेऊन सुद्धा देशाची आर्थिक परिस्थिती सुधारली नसती, लोकसंख्या प्रचंड असल्याने सुधार करण्याशिवाय रावा कडे पर्याय नव्हता. त्यामुळे आज थोडे सुगीचे दिवस दिसत आहेत.
आता सुद्धा मोदी सरकार नाईलाजाने का होईना पण काही सुधार करत आहेत ते प्रचंड मोठ्या लोकसंख्येने बहुतेक राष्ट्रीय समस्या (APMC, रेल्वे, PSU इत्यादी) ह्यांनी कॅन्सर चे रूप धारण केले आहे.
इस्लामिक समाजांत प्रचंड प्रमाणात मुले निर्माण करण्याची जी मानसिकता आहे कदाचित ती सुद्धा ह्यामुळेच असावी. एक तर इस्लाम खतरेमें नेहमीच असतो. किंवा अगदी सौदी बारबेरिया मध्ये सुद्धा कदाचित समाज प्रचंड धार्मिक दडपणा खाली असावा आणि त्यातून सुटण्यासाठी हि त्यांची धडपड असावी. इस्लाम विरोधांत आवाज उठवणाऱ्या माणसाला तात्काळ ठार मारले जाते त्यामुळे इस्लाम विरुद्ध बंड करायचे आहे तर तसाच प्रतापी पुरुष (किंवा महिला) त्यातून जन्मली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या ह्या रोगप्रतिकारक क्षमतेला ओव्हरटाईम केल्याशिवाय गत्यंतर नाही.
लेखाचा दुसरा भाग माझे स्वतःचे असल्याने मी पूर्णतः चुकले असण्याची सुद्धा शक्यता आहे, पण एक वेगळ्या प्रकारचा विचार म्हणून चर्चा करण्यात काय हरकत आहे.
वाचने
35902
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
:=))
- भांडी निर्माण करण्यासाठी मानवाने चक्राची निर्मिती केली
- लोकसंख्या जास्त असेल तर आम्ही खूप प्रयोग करू शकतो आणि त्यामुळे विविध शोध सुद्धा लागू शकतात.
- औद्योगिक क्रांतीसाठी जे हवामान असायला पाहिजे होते ते भारतांत नव्हते v/s व्यापार, धातुकाम इत्यादींत सुद्धा ऐतिहासिक काळापासून भारतीयांनी खूप काही कमावले होते
- समाजाची अधोगती होत असली तर अश्या समाजांत मुले निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढते.
- भारतीय स्त्रियांनी ओव्हरटाईम करून मुले निर्माण नसती केली तर समाजाचे रक्षण इस्लाम पासून करणे शक्य होते का ?
- लोकसंख्या प्रचंड असल्याने भारताला वसाहत म्हणून ठेवणे इंग्लंड ला शक्य नव्हते
- गरीब राष्ट्रांना काही भिकेचे तुकडे देऊन त्यांना आपल्या अंगठ्याखाली ठेवायची पाश्चात्य राष्ट्रांची जी पद्धत होती ती भारतांत चालली नाही कारण भीक द्यायची असली तर लोकसंख्या प्रचंड असल्याने अमेरिकेला सुद्धा परवडणारी नव्हती.
- १९९२ मधील विविध आर्थिक सुधार सुद्धा भारत सरकारने चांगली अक्कल येऊन केले नाहीत
- आता सुद्धा मोदी सरकार नाईलाजाने का होईना पण काही सुधार करत आहेत
- एक तर इस्लाम खतरेमें नेहमीच असतो.
😄 धन्यवाद! - (तंत्रज्ञ) सोकाजीआधी बाण मारा ....आणि
In reply to :=)) by सोत्रि
:)
In reply to आधी बाण मारा ....आणि by मुक्त विहारि
दोनच गोष्टी समजल्या ....
रशियाची
छान लेखलोकसंख्या जास्त असेल
कसं आहे ना....
In reply to छान लेखलोकसंख्या जास्त असेल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
समजत नाही
In reply to कसं आहे ना.... by मुक्त विहारि
कदाचित अस्थिरता हेच
In reply to समजत नाही by चंद्रसूर्यकुमार
काही गोष्टी आपल्याला तर्क लावून, आधीच्या पिढ्यांचे अनुभव ऐकून
In reply to कदाचित अस्थिरता हेच by आनन्दा
@मुवि - माझे महान विचार ;)
In reply to काही गोष्टी आपल्याला तर्क लावून, आधीच्या पिढ्यांचे अनुभव ऐकून by मुक्त विहारि
इथे रोजचा संघर्ष खूप जास्त आहे ना?
In reply to @मुवि - माझे महान विचार ;) by उपयोजक
असे असेल?
In reply to कदाचित अस्थिरता हेच by आनन्दा
.
In reply to असे असेल? by उपयोजक
मी काय म्हणतो ....
In reply to . by काळे मांजर
मुळात अनेक तंत्रांची प्रगती
In reply to समजत नाही by चंद्रसूर्यकुमार
छान
In reply to कसं आहे ना.... by मुक्त विहारि
शुन्याच्या शोधाला कमी समजू नका ....
In reply to छान by काळे मांजर
@काळे मांजर
In reply to छान by काळे मांजर
अहो....ते दरवेळी, नवीन नवीन अवतारात येतात .....
In reply to @काळे मांजर by उपयोजक
+१००
In reply to छान लेखलोकसंख्या जास्त असेल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मी पण
In reply to +१०० by सोत्रि
दुसरा भाग पण चांगला आहे.
मानवी वेळ वाया जात आहे
सहमत आहे....
In reply to मानवी वेळ वाया जात आहे by Rajesh188
धन्यवाद. त्यामुळे अश्या
In reply to मानवी वेळ वाया जात आहे by Rajesh188
थोडक्यात तुम्हाला हे मुद्दे पटलेले नाहीत ....
In reply to धन्यवाद. त्यामुळे अश्या by साहना
काही मुद्दे
1. परकीय आक्रमण आणि त्यामुळे आलेली अशांतता ..
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
> हवामान वगैरे मुद्दे जे
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
आफ्रिकन लोकां संदर्भात एक उत्तम पुस्तक जरूर वाचा ...
In reply to > हवामान वगैरे मुद्दे जे by साहना
ही जुनी स्थिती झाली
प्रगती
In reply to ही जुनी स्थिती झाली by Rajesh188
काही सांघीक गोष्टी जमल्या... Team Work ...
In reply to ही जुनी स्थिती झाली by Rajesh188
तोंड आहे म्हणून बोलावे असे
In reply to ही जुनी स्थिती झाली by Rajesh188
मी प्रश्न विचारला आहे
In reply to तोंड आहे म्हणून बोलावे असे by साहना
ज्याला खाज आहे त्याने स्वतःच
In reply to मी प्रश्न विचारला आहे by Rajesh188
हम्म
> मग त्यावेळेस काय करायला हवे
भयानक
In reply to > मग त्यावेळेस काय करायला हवे by साहना
https://www.amazon.com/dp
In reply to भयानक by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to https://www.amazon.com/dp by साहना
सहकारी साखर कारखान्यांच्या मार्गानेच
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
सहकारी साखर कारखाना मुळे
In reply to सहकारी साखर कारखान्यांच्या मार्गानेच by मुक्त विहारि
सामना चित्रपट बघा
In reply to सहकारी साखर कारखाना मुळे by Rajesh188
जरा विस्कटून सांगता काय
In reply to सहकारी साखर कारखाना मुळे by Rajesh188
त्यांच्या नावाची फोड
In reply to सहकारी साखर कारखान्यांच्या मार्गानेच by मुक्त विहारि
सहमत आहे...
In reply to त्यांच्या नावाची फोड by उपयोजक
नेहरुकालीन सगळ्यात वाईट
+१
In reply to नेहरुकालीन सगळ्यात वाईट by अनुप ढेरे
अजुन एक डेडली धोरण होते,
In reply to +१ by साहना
सरकारी दरोडेखोरी
In reply to नेहरुकालीन सगळ्यात वाईट by अनुप ढेरे
.
In reply to सरकारी दरोडेखोरी by चंद्रसूर्यकुमार
.
In reply to . by काळे मांजर
खासगी उद्योगपती हे लुटारू च आहेत
In reply to सरकारी दरोडेखोरी by चंद्रसूर्यकुमार
असल्या प्रकारे कम्पन्या
In reply to खासगी उद्योगपती हे लुटारू च आहेत by Rajesh188
धन्यवाद
In reply to खासगी उद्योगपती हे लुटारू च आहेत by Rajesh188
अगदी क्युबा सुद्धा आता ओपन
In reply to धन्यवाद by चौकस२१२
घी देखा पण बडगा नही देखा
In reply to धन्यवाद by चौकस२१२
@चंद्रसूर्यकुमार
In reply to घी देखा पण बडगा नही देखा by चंद्रसूर्यकुमार
इतर लोक काय काम करतात ह्यांची
In reply to घी देखा पण बडगा नही देखा by चंद्रसूर्यकुमार
@साहना
In reply to इतर लोक काय काम करतात ह्यांची by साहना
माझा अनुभव ..
In reply to खासगी उद्योगपती हे लुटारू च आहेत by Rajesh188
@चौकटराजा
In reply to माझा अनुभव .. by चौकटराजा
नाचता येईना म्हणे अंगण वाकडे
छान
In reply to नाचता येईना म्हणे अंगण वाकडे by Rajesh188
म
In reply to छान by काळे मांजर
चान
In reply to छान by काळे मांजर
.
In reply to चान by सॅगी
मोदी नी
अजुन पण railway ट्रॅक वर
In reply to चला आता ह्या चाटुकार मंडळींना by साहना
हाहाहा
In reply to अजुन पण railway ट्रॅक वर by Rajesh188
गणित शिक रे
In reply to हाहाहा by सॅगी
उरलेली वर्षे कोणाची?
In reply to गणित शिक रे by काळे मांजर
छान
In reply to उरलेली वर्षे कोणाची? by सॅगी
का?
In reply to छान by काळे मांजर
बाकी
In reply to छान by काळे मांजर
खासगी उद्योगांना सरकारने घशात
उद्योगपती नी
In reply to खासगी उद्योगांना सरकारने घशात by अनुप ढेरे
ब्रिटिश राजनेच भारतीय
In reply to उद्योगपती नी by Rajesh188
ब्रिटिश राजनेच भारतीय
In reply to ब्रिटिश राजनेच भारतीय by अनुप ढेरे
रेल्वे सरकार च चालवत
छान
In reply to रेल्वे सरकार च चालवत by Rajesh188
ह्यात
In reply to छान by काळे मांजर
उपभोग ?
In reply to छान by काळे मांजर
शेती संशोधन....
In reply to छान by काळे मांजर
खासगी कंपनीत काम करणाऱ्या
कॅन्सर
संपादक मंडळः वर एक अतिशय