उगवता "तेजस्वी" तारा
प्रेरणास्रोत
खरंच आज देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि नक्कीच ती उणीव आपले तेजस्वी यादव भरून काढतील. त्यांना नाही जमले तर अजुन 11 तरुण कार्यकर्त्यांची अख्खी फळीच लालू यादवांनी घरी उभी केलीये. खूप खूप उपकार आहेत या भारतभुमीवर कि एकाच घरात त्यांनी इतके तरुण कार्यकर्ते निर्माण केले.
इथेच न थांबता त्यांनी स्त्रीसशक्तीकरण देखील आपल्या घरातूनच सुरु केले.
पहिल्यांदा स्वतः करून दाखवायचे आणि आपल्या कृतीतून समाजाला संदेश द्यायचा या थोर विचारसरणीचे ते पाईक आहेत.. त्यामुळे आपल्या अडाणी बायकोला डायरेक्ट मुख्यमंत्रीपदावर बसवून स्त्री ही कोणत्याच क्षेत्रात मागे राहता कामा नये हा संदेशच त्यांनी जनतेला दिला.
आज कितीतरी भारतीय जनता गरिबीत दिवस काढतेय, खायला अन्न नाही.. पण यावर खरा आवाज उठवला तो लालू प्रसाद यादव जी यांनीच. गरीब माणूस मनात आणले तर काहीही करू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचे होते. म्हणूनच त्यांनी मानवप्रजातीसाठी नवीन अन्नाचा शोध लावला. - चारा खाऊन सुद्धा माणूस जगु शकतो हे त्यांनी प्रत्यकक्षिकासह सिद्ध केले. पण हाय रे हे कुशासन.. त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना ऍप्रिसिएट करणे तर दूरच.. उलट त्यांना आपल्या राक्षसी बहुमताच्या जोरावर तुरुंगात डांबले. त्यांना कितीही त्रास दिला तरी त्यांची महती कमी होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांच्या या कार्यामुळे त्यांची तुलना हरितक्रांती चे जनक नॉर्मन बोरलॉग यांच्याशी च केली जाऊ शकते.
आज बिहार पूर्णपणे उध्वस्त आहे. सर्वत्र हाहाकार मजला आहे. कायदा आणि सुव्यवस्था हे शब्द पण उच्चारायला सामान्य माणूस घाबरतोय.. पण लालू जी यांच्या काळात 15 वर्ष्यापुर्वी बिहार हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे चे राज्य होते. राज्यात प्रवेश करायचा तरी स्पेशल पासपोर्ट असणे गरजेचे होते, आणि तो देण्याची जबाबदारी ही चंबळ आणि इतर खोऱ्यात नेमलेल्या विशेष अधिकारांची होती. ही सुव्यवस्था उध्वस्त करण्यासाठी जुलमी भारत शासनाने कित्येक अधिकाऱ्यांना बिहार मध्ये पाठवले पण लालूजींच्या क्रांतिकारी बिहारींनी त्यांना तिथेच ठेचले..
आणि ठेचणार का नाही?? भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद अश्या क्रांतिकारी लोकांनी देखील हत्यारे उचलली होती. अगदी तोच वारसा लालू यादव यांनी आपल्या राज्यात कानाकोपऱ्यात पोहचवला होता. म्हणूनच त्यावेळी बिहार हे काळाच्या पुढे चालणारे राज्य होते.
वक्तशीरपणा ही भारतीयांची कमजोरी आहे. कोणतेच काम भारतात वेळेवर होत नाही. पूर्वीपासून चालत आलेला हा प्रघात मोडण्यासाठी लालूजी यादवांनी खूप कष्ट घेतले. यासाठी त्यांना खूप कठोर निर्णय घ्यावे लागले. प्रत्येक बिहारीं माणूस हा संध्याकाळी वेळेवर घरी पोचलाच पाहिजे यासाठी त्यांची तळमळ होती. त्यामुळे त्यांनी सामाजिक जिवन असे काही ढवळून काढले कि प्रत्येक माणूस संध्याकाळी 6 च्या आधीच घरी जाऊ लागला. जर नाही गेला तर तो परत घरी जिवंत येईल कि नाही असा प्रश्न घरच्यांच्या पुढे उभा राहत असे. इतकी कडक शिस्त बिहार मध्ये निर्माण करण्यात लालूजींचा सिंहाचा वाटा आहे. लोकांनी संध्याकाळी सहा नंतर चा वेळ आपल्या परिवारासोबत व्यतीत करावा.. फक्त काम काम आणि काम न करता प्रत्येकाने पारिवारिक गोष्टींना देखील वेळ दिला पाहिजे असा थोर विचार त्यामागे होता. आज 20 वर्ष्यानंतर आता हे तत्वज्ञान सर्व जग मान्य करतेय कि कामापेक्षा परिवार आणि कौटुंबिक सौख्य जास्त महत्वाचे आहे पण लालूजींनी 20 वर्ष्यापुर्वी हे ओळखून त्यासाठी नियम आखून दिले होते. खरंच काळाच्या किती पुढे पाहणारे नेते आहेत लालू जी.
आज भारत IT मधील सुपरपॉवर आहे असं म्हणतात कि भारताने सगळे लोकं जर जगभरारून परत बोलावले तर संपूर्ण IT वर्ल्ड ठप्प होईल. आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भारतीय माणूस आपले कर्तुत्व दाखवतोय. पण हे आज आहे.
लालू जी यांनी 20 वर्ष्यापुर्वी बिहार ला अश्या स्थितीत आणून ठेवले होते कि 5 पैकी 4 बिहारी तरुण हे संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन कामधंदा करत होते. त्यांना बिहारमध्येच काम दिले असते तर बिहारचे टॅलेंट आख्या भारताला कसे समजले असते? त्यामुळे त्यांनी तरुणांना "बाहेर पडा आणि जगाला आपली ताकद दाखवून दया " हा मोलाचा संदेश दिला.
आजही जर बिहारने आपली सर्व लोकं परत बोलावली तर सर्व चोरी-मारी, रेप्स, छोटे मोठे दरोडे, खून असे नावाजलेले उद्योगधंदे एका फटक्यात ठप्प होतील.
त्यांच्यातील हेच टॅलेंट ओळखून राजमाता सोनियाबाई यांनी भारताच्या रेल्वेमंत्री पदाची ऑफर श्री लालू जी यांना दिली. त्यावेळी देखील त्यांनी आपल्या कार्यपद्धतीची आणि टॅलेंट ची चुणूक दाखवली. सर्वांना खुश करण्याकडे त्यांचा कल असायचा. आपल्यामुळे कोणतेही राज्य आणि जनता दुःखी राहू नये यासाठी ते तीळतीळ झटले. प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात त्यांनी भरगोस घोषणा आणि नवीन गाड्या सुरु करण्याची पद्धत सुरु केली. पण दुर्दैवाने सर्व योजना प्रत्यक्षात यायच्या आधीच त्यांना ते पद काही कारणास्तव सोडावे लागले. जर त्यांनी अजुन 6-7 वर्षे तिथे काम केले असते तर गरीब माणूस वेळप्रसंगी रेल्वे आणि रूळ खाऊन पण जिवंत राहू शकतो असा शोध त्यांनी नक्कीच लावला असता.
ते त्यावेळी पूर्ण देशाचे मंत्री होते परंतु आपल्या राज्यातील लोकांचे आणि तरुणांच्या वर त्यांचे विशेष प्रेम होते त्यामुळेच त्यांनी बिहार मधून सर्व विकसित शहरांत जसे कि मुंबई, दिल्ली, बेंगलोर इ कडे जाण्यासाठी शेकडो ट्रेन्स सुरु केल्या. त्यामुळेच बिहारी माणूस आपले टॅलेंट दाखवण्यासाठी प्रत्येक राज्यात पोहचला. "एक बिहारीं सौ बिमारी" ही प्रत्येक बिहारीं माणसाची ओळख त्यांनी खूप कष्टातून निर्माण केली.
आज सर्व लोकं म्हणतात कि जंगल वाचले पाहिजे, झाडे लावा, जंगले वाढवा पण पर्यावरणावर येणाऱ्या या संकटाची चाहूल लालू जी यांनी 15-20 वर्ष्यापुर्वीच ओळखली होती आणि त्यामुळे त्यांनी "जंगल राज " या नवीन योजनेचा शुभारंभ आपल्या कार्यकाळात केला. त्यावेळी बिहारचे जंगलराज हा पूर्ण जगासाठी एक अश्चर्याचा विषय होता.
अश्या ह्या थोर व्यक्तीच्या मुलाने आज जो काही पराक्रम बिहार मध्ये केला आहे तो निश्चितच देशाला आणि तरुण पिढीला या कठीण काळात एक दिलासा देणारा क्षण आहे. एक आशेचा नवकिरण आहे.
जरी त्यांचा पराभव झाला असला तरी तो आम्ही मान्यच करणार नाही ( इति आमचे नॉटी संपादक साहेब ). इतिहासात देखील पानिपत युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. आज तेजस्वी यादव यांचा पराभव देखील अश्याच पद्धतीचा आहे..!
आज आपल्या सर्वांपुढे तेजस्वी आणि राहुल जी या दोघांच्या रूपाने तरुणांसमोर खऱ्या अर्थाने एक तेजस्वी किरण तयार झालेला आहे भविष्यात या एका किरणाचे रूपांतर तळपत्या सूर्यामध्ये होईल आणि पूर्ण देश हा बिहार सारखा होईल यामध्ये मला किंचीतही शंका नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जब तक रहेगा समोसे मे आलू|
तेज
अतिशय "तेजस्वी" लेख
धन्यवाद सागर आणि यशराज.
त्यांच्यातील हेच टॅलेंट ओळखून
Surrealism प्रकारात मांडलेले
Surrealism म्हणजे काय.. ??
Surrealism म्हणजे
एक राहिलेच की. अॅसेट विकून
मी ही त्यांच्यापासून प्रेरणा
काळजी घेऊन हा
बिहार आणि यूपी
बरं
सेनेचा विरोध करता करता
बिहारमध्ये लालूयुग आणायचे.
अर्णव आणि कंगना ह्या दोन मूर्ख
राजेश काका,
सेनेचा विरोध करता करता
मस्तच
उगवता तारा तेजश्वी
काही जणांना तेजस्वी यादवही
एक गोष्ट मात्र मान्य करावीच लागेल
एक गोष्ट मात्र मान्य करावीच लागेल