उगवता "तेजस्वी" तारा

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
12 Nov 2020 - 1:36 pm

प्रेरणास्रोत

खरंच आज देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि नक्कीच ती उणीव आपले तेजस्वी यादव भरून काढतील. त्यांना नाही जमले तर अजुन 11 तरुण कार्यकर्त्यांची अख्खी फळीच लालू यादवांनी घरी उभी केलीये. खूप खूप उपकार आहेत या भारतभुमीवर कि एकाच घरात त्यांनी इतके तरुण कार्यकर्ते निर्माण केले.
इथेच न थांबता त्यांनी स्त्रीसशक्तीकरण देखील आपल्या घरातूनच सुरु केले.
पहिल्यांदा स्वतः करून दाखवायचे आणि आपल्या कृतीतून समाजाला संदेश द्यायचा या थोर विचारसरणीचे ते पाईक आहेत.. त्यामुळे आपल्या अडाणी बायकोला डायरेक्ट मुख्यमंत्रीपदावर बसवून स्त्री ही कोणत्याच क्षेत्रात मागे राहता कामा नये हा संदेशच त्यांनी जनतेला दिला.

आज कितीतरी भारतीय जनता गरिबीत दिवस काढतेय, खायला अन्न नाही.. पण यावर खरा आवाज उठवला तो लालू प्रसाद यादव जी यांनीच. गरीब माणूस मनात आणले तर काहीही करू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचे होते. म्हणूनच त्यांनी मानवप्रजातीसाठी नवीन अन्नाचा शोध लावला. - चारा खाऊन सुद्धा माणूस जगु शकतो हे त्यांनी प्रत्यकक्षिकासह सिद्ध केले. पण हाय रे हे कुशासन.. त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना ऍप्रिसिएट करणे तर दूरच.. उलट त्यांना आपल्या राक्षसी बहुमताच्या जोरावर तुरुंगात डांबले. त्यांना कितीही त्रास दिला तरी त्यांची महती कमी होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांच्या या कार्यामुळे त्यांची तुलना हरितक्रांती चे जनक नॉर्मन बोरलॉग यांच्याशी च केली जाऊ शकते.

आज बिहार पूर्णपणे उध्वस्त आहे. सर्वत्र हाहाकार मजला आहे. कायदा आणि सुव्यवस्था हे शब्द पण उच्चारायला सामान्य माणूस घाबरतोय.. पण लालू जी यांच्या काळात 15 वर्ष्यापुर्वी बिहार हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे चे राज्य होते. राज्यात प्रवेश करायचा तरी स्पेशल पासपोर्ट असणे गरजेचे होते, आणि तो देण्याची जबाबदारी ही चंबळ आणि इतर खोऱ्यात नेमलेल्या विशेष अधिकारांची होती. ही सुव्यवस्था उध्वस्त करण्यासाठी जुलमी भारत शासनाने कित्येक अधिकाऱ्यांना बिहार मध्ये पाठवले पण लालूजींच्या क्रांतिकारी बिहारींनी त्यांना तिथेच ठेचले..
आणि ठेचणार का नाही?? भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद अश्या क्रांतिकारी लोकांनी देखील हत्यारे उचलली होती. अगदी तोच वारसा लालू यादव यांनी आपल्या राज्यात कानाकोपऱ्यात पोहचवला होता. म्हणूनच त्यावेळी बिहार हे काळाच्या पुढे चालणारे राज्य होते.

वक्तशीरपणा ही भारतीयांची कमजोरी आहे. कोणतेच काम भारतात वेळेवर होत नाही. पूर्वीपासून चालत आलेला हा प्रघात मोडण्यासाठी लालूजी यादवांनी खूप कष्ट घेतले. यासाठी त्यांना खूप कठोर निर्णय घ्यावे लागले. प्रत्येक बिहारीं माणूस हा संध्याकाळी वेळेवर घरी पोचलाच पाहिजे यासाठी त्यांची तळमळ होती. त्यामुळे त्यांनी सामाजिक जिवन असे काही ढवळून काढले कि प्रत्येक माणूस संध्याकाळी 6 च्या आधीच घरी जाऊ लागला. जर नाही गेला तर तो परत घरी जिवंत येईल कि नाही असा प्रश्न घरच्यांच्या पुढे उभा राहत असे. इतकी कडक शिस्त बिहार मध्ये निर्माण करण्यात लालूजींचा सिंहाचा वाटा आहे. लोकांनी संध्याकाळी सहा नंतर चा वेळ आपल्या परिवारासोबत व्यतीत करावा.. फक्त काम काम आणि काम न करता प्रत्येकाने पारिवारिक गोष्टींना देखील वेळ दिला पाहिजे असा थोर विचार त्यामागे होता. आज 20 वर्ष्यानंतर आता हे तत्वज्ञान सर्व जग मान्य करतेय कि कामापेक्षा परिवार आणि कौटुंबिक सौख्य जास्त महत्वाचे आहे पण लालूजींनी 20 वर्ष्यापुर्वी हे ओळखून त्यासाठी नियम आखून दिले होते. खरंच काळाच्या किती पुढे पाहणारे नेते आहेत लालू जी.

आज भारत IT मधील सुपरपॉवर आहे असं म्हणतात कि भारताने सगळे लोकं जर जगभरारून परत बोलावले तर संपूर्ण IT वर्ल्ड ठप्प होईल. आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भारतीय माणूस आपले कर्तुत्व दाखवतोय. पण हे आज आहे.
लालू जी यांनी 20 वर्ष्यापुर्वी बिहार ला अश्या स्थितीत आणून ठेवले होते कि 5 पैकी 4 बिहारी तरुण हे संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन कामधंदा करत होते. त्यांना बिहारमध्येच काम दिले असते तर बिहारचे टॅलेंट आख्या भारताला कसे समजले असते? त्यामुळे त्यांनी तरुणांना "बाहेर पडा आणि जगाला आपली ताकद दाखवून दया " हा मोलाचा संदेश दिला.
आजही जर बिहारने आपली सर्व लोकं परत बोलावली तर सर्व चोरी-मारी, रेप्स, छोटे मोठे दरोडे, खून असे नावाजलेले उद्योगधंदे एका फटक्यात ठप्प होतील.

त्यांच्यातील हेच टॅलेंट ओळखून राजमाता सोनियाबाई यांनी भारताच्या रेल्वेमंत्री पदाची ऑफर श्री लालू जी यांना दिली. त्यावेळी देखील त्यांनी आपल्या कार्यपद्धतीची आणि टॅलेंट ची चुणूक दाखवली. सर्वांना खुश करण्याकडे त्यांचा कल असायचा. आपल्यामुळे कोणतेही राज्य आणि जनता दुःखी राहू नये यासाठी ते तीळतीळ झटले. प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात त्यांनी भरगोस घोषणा आणि नवीन गाड्या सुरु करण्याची पद्धत सुरु केली. पण दुर्दैवाने सर्व योजना प्रत्यक्षात यायच्या आधीच त्यांना ते पद काही कारणास्तव सोडावे लागले. जर त्यांनी अजुन 6-7 वर्षे तिथे काम केले असते तर गरीब माणूस वेळप्रसंगी रेल्वे आणि रूळ खाऊन पण जिवंत राहू शकतो असा शोध त्यांनी नक्कीच लावला असता.
ते त्यावेळी पूर्ण देशाचे मंत्री होते परंतु आपल्या राज्यातील लोकांचे आणि तरुणांच्या वर त्यांचे विशेष प्रेम होते त्यामुळेच त्यांनी बिहार मधून सर्व विकसित शहरांत जसे कि मुंबई, दिल्ली, बेंगलोर इ कडे जाण्यासाठी शेकडो ट्रेन्स सुरु केल्या. त्यामुळेच बिहारी माणूस आपले टॅलेंट दाखवण्यासाठी प्रत्येक राज्यात पोहचला. "एक बिहारीं सौ बिमारी" ही प्रत्येक बिहारीं माणसाची ओळख त्यांनी खूप कष्टातून निर्माण केली.

आज सर्व लोकं म्हणतात कि जंगल वाचले पाहिजे, झाडे लावा, जंगले वाढवा पण पर्यावरणावर येणाऱ्या या संकटाची चाहूल लालू जी यांनी 15-20 वर्ष्यापुर्वीच ओळखली होती आणि त्यामुळे त्यांनी "जंगल राज " या नवीन योजनेचा शुभारंभ आपल्या कार्यकाळात केला. त्यावेळी बिहारचे जंगलराज हा पूर्ण जगासाठी एक अश्चर्याचा विषय होता.

अश्या ह्या थोर व्यक्तीच्या मुलाने आज जो काही पराक्रम बिहार मध्ये केला आहे तो निश्चितच देशाला आणि तरुण पिढीला या कठीण काळात एक दिलासा देणारा क्षण आहे. एक आशेचा नवकिरण आहे.
जरी त्यांचा पराभव झाला असला तरी तो आम्ही मान्यच करणार नाही ( इति आमचे नॉटी संपादक साहेब ). इतिहासात देखील पानिपत युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. आज तेजस्वी यादव यांचा पराभव देखील अश्याच पद्धतीचा आहे..!
आज आपल्या सर्वांपुढे तेजस्वी आणि राहुल जी या दोघांच्या रूपाने तरुणांसमोर खऱ्या अर्थाने एक तेजस्वी किरण तयार झालेला आहे भविष्यात या एका किरणाचे रूपांतर तळपत्या सूर्यामध्ये होईल आणि पूर्ण देश हा बिहार सारखा होईल यामध्ये मला किंचीतही शंका नाही.

मुक्तकविडंबनसमाजजीवनमानराहणीभूगोल

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

12 Nov 2020 - 3:08 pm | टर्मीनेटर

जब तक रहेगा समोसे मे आलू|
तब तक रहेगा बिहार मे लालू ||
(कू)कर्मवीर, (अ)धर्मवीर श्री.श्री. लालूजी प्रसादजी यादवजी ह्यांना त्रिवार नमन,
त्यांचे सुपुत्र श्री. श्री. तेजास्वीजी लालूजी प्रसादजी यादवजी ह्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! आणि,
प.पु. राहुलजी गांधीजी आणि माता सोनियाजी गांधीजी ह्यांच्ये मार्गदर्शन आणि सहकार्य श्री. श्री. तेजास्वीजी लालूजी प्रसादजी यादवजी ह्यांना सातत्याने लाभत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

सॅगी's picture

12 Nov 2020 - 4:23 pm | सॅगी

या धाग्याच्या तेजाने डोळे दिपुन गेले आहेत, कसाबसा हा प्रतिसाद टायपतोय...

धागा आवडला हेवेसांनल...

यश राज's picture

12 Nov 2020 - 5:03 pm | यश राज

धागा आवडला....

बाप्पू's picture

12 Nov 2020 - 6:42 pm | बाप्पू

धन्यवाद सागर आणि यशराज.

त्यांच्यातील हेच टॅलेंट ओळखून

चुकून टॉयलेट वाचले याबद्दल शिसान.
मी स्वतःचाच जाहीर त्रिवार निषेध निशेध करत आहे.

वामन देशमुख's picture

12 Nov 2020 - 6:38 pm | वामन देशमुख

Surrealism प्रकारात मांडलेले दुर्दैवी वास्तव!

बाप्पू's picture

12 Nov 2020 - 6:42 pm | बाप्पू

Surrealism म्हणजे काय.. ??
माफ करा. पण तुमचा प्रतिसाद समजला नाही..

वामन देशमुख's picture

13 Nov 2020 - 8:35 pm | वामन देशमुख

Surrealism म्हणजे अतिवास्तववाद / बटबटीत वास्तवाची मांडणी.

तुमचा लेख जरी उपरोधिक अंगाने जात असला तरी, त्यात बिहारच्या वास्तवाची मांडणी आहे असं मला म्हणायचं होतं.

विजुभाऊ's picture

12 Nov 2020 - 6:52 pm | विजुभाऊ

एक राहिलेच की. अ‍ॅसेट विकून उद्योग नफ्यात आणता येतो हा नवा अर्थशास्त्रीय फंडा त्यांनी रेल्वेच्या जमिनी विकून रेल्वे नफ्यात आणताना सिद्ध केला.
विषेश म्हणजे या बद्दल देशातील आय आय एम नी त्यांचे कौतूकही केले होते.

मी ही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन माझे घर विकून माझे तोट्यात चाललेले बँक पासबुक नफ्यात आणावे म्हणतोय....

सॅगी's picture

12 Nov 2020 - 7:40 pm | सॅगी

नाहीतर घर विकल्यावर खात्यावरचा पत्ता चुकीचा आहे या कारणास्तव तेच बँक खाते गोठवले जाईल...
ना घर का..ना घाट का...

ह. घ्या.

Rajesh188's picture

12 Nov 2020 - 7:33 pm | Rajesh188

ही दोन राज्य कधीच सुधारणार नाहीत.फक्त लोकसंख्या वाढ करण्यात ही दोनी राज्य आघाडीवर राहणार.
सर्व नियम कायदे ह्यांची वाट ह्याच दोन राज्यात लावली जाते.
वीज चोरी,केंद्र सरकार कडे कमी टॅक्स भरून किती तरी पट्टी ने जास्त बाकी देशातील राज्याचा पैसा ह्यांना दिला जातो.
केंद्रीय पैसा ज्या राज्यांना सर्वात जास्त दिला जातो त्या मध्ये हि दोन राज्य आघाडीवर आहेत.
सर्व कायदे धाब्यावर बसवून ,कोणताच विकास ची काम न करता केंद्र सरकार जर बाकी राज्यांचे उत्पादन ओरबाडून ह्यांना देत असेल तर हे कशाला विकास करतील.
फक्त ट्रेन देशभरात चालू केल्या की झाले ते केंद्रांनी देशाच्या पैसे नी च सवलती च्य दरात चालू करायच्या.
लालू गेले आणि नितीश BJP आली म्हणून बिहार मध्ये काहीच फरक पडलेला नाही.
बिहार आहे तसाच आहे आणि तो कधीच सुधारणार नाही.
आणि राजकीय पक्षांना अशी अशिक्षित विपुल लोकसंख्या हवीच आहे सत्तेत येण्यासाठी .
त्या मुळे ही दोन्ही राज्य सुधरवित असे कधीच राजकीय पक्षाना वाटत नाही.

शा वि कु's picture

12 Nov 2020 - 8:11 pm | शा वि कु

मग काय करायचं आता ?

सत्ता न मिळाल्या मुळे सेनेचा विरोध करता करता bjp नी महाराष्ट्र चा विरोध करणे चालू केले हे त्यांना समजलेच नाही.
कंगना आणि अर्णव सारख्या मुर्खांना सुपारी देवून महाराष्ट्र ,महाराष्ट्र पोलीस ह्यांची बदनामी BJP नी केली .
आणि हे पूर्ण देशाभर बघितले गेले.
त्या मुळे BJP हा पक्ष स्वार्थ साठी कोणत्या ही थराला जावू शकतो हा संदेश गेला देशभर.
त्या मुळेच बिहार मध्ये BJP सत्तेत नसावी अशीच सर्वांची इच्छा आहे.
महाराष्ट्रात जे घडले तेच बिहार मध्ये घडले पाहिजे.

बिहारमध्ये लालूयुग आणायचे. कसेही करून BJP ला दूर ठेवायच. भले गाढव का असेना सत्तेत फक्त BJP नको.

बाकी मिपावर GK नावाचे एक सद्गृहस्थ होते. कोणताही विषय शेवटी BJP, गुजरात आणि मोदीद्वेषावर नेऊन ठेवण्याचे कॅलिबर त्यांच्याकडे होते. त्यांनतर त्यांचा वारसा तुम्हीच चालवताय..

अर्णव आणि कंगना ह्या दोन मूर्ख व्यक्ती साठी भारतीय जनता पक्षाने त्यांची पूर्ण यंत्रणा महाराष्ट्र ला बदनाम करण्यासाठी वापरली नसती तर देशभरात भारतीय जनता पक्ष विषयी चांगला संदेश गेला असता.
महाराष्ट्र ला सत्ता मिळाली नाही म्हणून नेत्या पासून कार्यकर्ते,मीडिया ह्यांचा वापर राज्याला बदनाम करण्यासाठी BJP ni केला हे देशातील प्रतेक राज्यातील लोकांनी बघितले आहे.
त्याचाच हा परिणाम आहे भारतीय जनता पक्ष हा विश्वासू पक्ष वाटत नाही.

बाप्पू's picture

12 Nov 2020 - 11:02 pm | बाप्पू

राजेश काका,

विषय काय... तुम्ही बोलताय काय...!!!

सत्ता न मिळाल्या मुळे सेनेचा विरोध करता करता bjp नी महाराष्ट्र चा विरोध करणे चालू केले हे त्यांना समजलेच नाही.
कंगना आणि अर्णव सारख्या मुर्खांना सुपारी देवून महाराष्ट्र ,महाराष्ट्र पोलीस ह्यांची बदनामी BJP नी केली .
आणि हे पूर्ण देशाभर बघितले गेले.
त्या मुळे BJP हा पक्ष स्वार्थ साठी कोणत्या ही थराला जावू शकतो हा संदेश गेला देशभर.
त्या मुळेच बिहार मध्ये BJP सत्तेत नसावी अशीच सर्वांची इच्छा आहे.
महाराष्ट्रात जे घडले तेच बिहार मध्ये घडले पाहिजे.

सॅगी's picture

12 Nov 2020 - 11:34 pm | सॅगी

असेच प्रतिसाद देत जा, भाजप व्यतिरिक्त इतर कोणाला मत देऊ नये हा विचार अजूनच पक्का होत जाईल... निदान माझा तरी...

दिगोचि's picture

13 Nov 2020 - 4:09 am | दिगोचि

लालु प्रसाद यान्चे जन्गलराज हे मुस्लिम-यादव यान्च्या मदतीने १५ वर्शे चालले. तसेच त्याना तेजश्वी यान्च्याकडुन चालवायचे होते. म्हणुन त्यानी अनेक वर्शपूर्वी ठरवुन त्याला ८वी पर्यन्तच शिकवले. पहा किती दूरचा विचार लालुनी केला होता. तसेच त्यानी वर्तमानपत्राना कोठेही तेजश्वीवर त्याच्याकदे असलेल्या मालमत्तेवर क्रिमिनल केस आहे हे सान्गु नका असे पण सान्गितले असावे. पण मोदीनी त्यान्चे हे सर्व डाव उधळले.

पाषाणभेद's picture

13 Nov 2020 - 11:28 pm | पाषाणभेद

काही जणांना तेजस्वी यादवही हिरो म्हणून आवडतो आहे.

Up आणि बिहार मधील यादव प्लस मुस्लिम हे जातीय समीकरण BJP नी मोडून काढले .
आणि लालू आणि मुलायम ह्यांचे राजकीय भविष्य च बिघडवून टाकले.
हे नक्कीच चांगले घडले.

Up आणि बिहार मधील यादव प्लस मुस्लिम हे जातीय समीकरण BJP नी मोडून काढले .
आणि लालू आणि मुलायम ह्यांचे राजकीय भविष्य च बिघडवून टाकले.
हे नक्कीच चांगले घडले.