Skip to main content
खूण
खूण ओळखीची, दावू कुणा कळेना
माझ्याशिवाय कोणी, माझ्याकडे बघेना
हातातुनी निखळला, आरसा मनीचा
तुकड्यात चेहर्याचे प्रतिबिंब सापडेना
घालून भूल गेला, नाद बासरीचा
चकव्यात देह फिरतो, वाट आठवेना
ओठात ओठ रुतता, चढली अशी खुमारी
रात्री किती रमविल्या, शेजेसही स्मरेना
घेऊन प्राण गेला, नाव गाव सुटले
हृदयात साजणाच्या, जागा तरि मिळेना
शेवटास उरली, राख आठवांची
शिणली कुडी जिवाची, जळता परि जळेना
अनुक्रमणिका
प्रतिक्रिया
वा, सगळ्या द्विपदी सुरेख
कविता आवडली!!
कविता आवडली
वा! वा!