मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माणसे मित्र बनून येतात...... ( प्रेरणा :: माणसे कविता बनून येतात...)

खिलजि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माणसे मित्र बनून येतात सदैव गाती मैत्रीचे गोडवे तोंडात जणू साखर ठेवतात, काही महिन्यांमध्येच एक जीवघेणी कळ देऊन पाठीत वार करून जातात ... माणसे मित्र बनून येतात मनातलं बाहेर काढून केवळ अर्थाचा अनर्थ घेऊन दिवसभर कानाशी बसतात आपली लागताना खोलून मैत्रीच्या अंधारात पुन्हा गुडूप होतात...... माणसे मित्र बनून येतात...

वाचने 3876 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चामुंडराय 27/04/2019 - 03:26
सुंदर विडंबन न धरता स्वतंत्र कविता म्हणून देखील चालेल म्हणजे पळेलच !

शब्दानुज 28/04/2019 - 07:50
खिलजींच्या भाषेत सांगायचे तर जबराव आहे ही कविता.

चित्रगुप्त 28/04/2019 - 07:58
मस्त आहे कविता. आता एक कविता जन्मभर मैत्री कायम ठेवणार्‍या दोस्तांबद्दलही येऊ द्या.