दाराआडचे घड्याळ
एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार...
जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ...
आणि एक वाळूचे घड्याळ...
अजुनही मागे मागे....
जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र
भिंतीवर कोरलेले सावलीचे घड्याळ...
आणखी कितीतरी चित्रविचित्र घड्याळं...
.
आणि खूप खूप पूर्वी वाळूत खोवलेला लाकडाचा एक तुकडा....
पूर्वी कधीतरी सव्वा अकरा वाजता बंद पडलेलं ते घड्याळ
जर्जर इमारतीच्या तुटक्या दाराआडून बघतच रहाते...
बघतच रहाते...
मस्त काका...
वक्त से डर कर रहे....क्या पता वक्त का कब बदले मिज़ाज!
घंटा नाहीये का घड्याळात?
"आज्जीजवळी घड्याळ, कसले आहे
शिवकन्या यांनी निर्मिलेला कवितेचा एक सुंदर घाट
खरंय चित्रगुप्त साहेब ,, खरंय
घड्याळ म्हणजेच
वाह, मस्तच !