3 Idiots

वेडसर's picture
वेडसर in जनातलं, मनातलं
28 Dec 2018 - 7:09 pm

सकाळी कुठेतरी 3 Idiots बद्दलचा एक लेख वाचला. आता तो धागा नेमका सापडत नाहीये.

लेख फारसा पटला नाही. त्यात एका प्रतिक्रियेत out of the box जाऊन काही करावं, आपल्याला आवडेल तेच करावं किंवा करून पहावं अशा काहीशा आशयाची एक प्रतिक्रिया होती ती मात्र पटली.

शिवाय त्यातल्या संवादातून चतूर एकटा यशस्वी आहे आणि बाकीचे फरहान वगैरे फेल आहेत हे जे चित्र रंगवलं आहे ते चुकीचं आहे. लता मंगेशकरने, सचिनने मेहनत घेतली पण फरहानने त्याच्या वाईल्ड फोटोग्राफीत तेवढी मेहनत घेतलीच नाही असंच का गृहीत धरलं गेलंय?

उलटपक्षी बाकी सगळे मस्त मजेत आहेत, आपल्याला हवं तेच करून सुखी झाले आहेत आणि चतूर मात्र पैसा एके पैसा आणि करीयर एके करीयर करत बसला आहे आणि आयुष्य मस्त मजेत जगायचंच पार विसरून गेला आहे असं कशावरून नसेल?

आणि ज्या चतुरने कॉलेज जीवनात आणि नंतरही ज्या रेंचोचा द्वेष केला, अखेरीस तोच चतूर रेंचोला आपलं निळ्या चड्डीतलं ढुंगण दाखवत 'जहापन्हा तुसी ग्रेट हो, तोफू कबूल करो' असं म्हणतोच ना?

तिथेच रेंचो आणि रेंचोचं 'कामयाबी झक मार के पिछे आएगी' हे तत्व जिंकतं!

असो. असाही एक विचार!

वेडसर.

कला

प्रतिक्रिया

आयुष्य सार्थक करायला, किमान मजेत जगायला, आवडीच्या क्षेत्रात पुरेसा पैसा मिळवुन देणारं काम करता येणं महत्वाचं असतं. आवड किती, पुरेसा पैसा किती हे ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं. थ्री इडीयट्समधे हा मुद्दा रोमॅण्टीसीझमकडे झुकणारा आहे. पुर्वीच्या चित्रपटात जालीम दुनीयासे लढके १८ साल पुरे होतेही शादी करके मोहोब्बत कि जीत करणार्‍यांसारखं. पण हे मोहोब्बतचं पाणि काळाच्या भाजणीत इव्हॅपोरेट होतं, तेंव्हा आपलं पाणि किती खोल आहे हे सुद्धा योग्य वेळी उमगणं आवष्यक असतं.
आयुष्यभर आपल्या आवडीचे गोड पदार्थ खायला मिळणं हा नशीबाचा, चॉईसचा भाग झाला. आपणच आपली साखर मॅनेज करुन कुठलाही पदार्थ गोड करण्याची हातोटी कमावणं हा शहाणपणाचा भाग झाला. अर्थात, त्याचं काहि स्पेसीफीक गणित नाहि.

आयुष्य सार्थक करायला, किमान मजेत जगायला, आवडीच्या क्षेत्रात पुरेसा पैसा मिळवुन देणारं काम करता येणं महत्वाचं असतं

.
हे खरं आहे हो. जगायला पैसा लागतोच.
आपली आवड आणि सांसारीक कर्तव्य या त नेहमीच कॉस्ट ऑफ अपोर्च्युनिटी चा विचार करत आपण आपल्या आवडीचा बळी देतो.
पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे वाक्य अंबाणी, तेंडूलकर किंवा लता मंगेशकर कधीच म्हणणार नाहीत. त्याना पैसा असेल तर आपली आवड अधीक सोप्या पद्धतीने जगता येते हे माहीत आहे. ते त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करीत आहेत हे देखील महत्वाचे.

पैशांचं काय हो, रस्त्यावर उभी राहणारी वेश्यादेखील पैसे कमावते!

आणि हल्ली वेश्यावृत्ती कुठे दिसत नाही ते सांगा.

मोठमोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रात स्वत:च्या बायकोला बॉसकडे झोपायला पाठवणारे लोक आहेत. एखादं कंत्राट मिळावं, किंवा सरकार दरबारी आपलं एखादं अडलेलं काम निपटावं म्हणून पैसे दिले जातात ही कुठली वृत्ती? फक्त स्वतची शारिरक वासना मिटावी म्हणून वेश्येला पैसे दिले जातात म्हणजेच केवळ वेश्यानृत्ती नव्हे!

सिनेमात कास्टींग काउच चालतं, राजकारणात पद मिळावं, तिकिट मिळावं म्हणून काय काय चालतं याचा तुम्हीच विचार करा..

वृत्तवाहिन्या.

दोन विरोधी विचारांच्या लोकांना चर्चेला बोलवायचं, भडक चर्चा घडवून आणायची, समाजमनं भडकवायची आणि आपली TRP ची पोळी भाजायची ही कुठली वृत्ती?

जेव्हा चतुरला समजतं की रेंचो हाच फुंकसुक वांगडू आहे तेव्हा आपलं contract जाऊ नये म्हणून तो चड्डी दाखवत आणि सावरत लाचारासारखा रेंचोच्या मागे पळत जातो.

ही कुठली वृत्ती?

त्यापेक्षा स्वत:च्या आवडीनुसार स्वांतसुखाय wild photography करणारा फरहान अधिक सुखी की नाही?

विचार करा! :)

मित्रहो's picture

29 Dec 2018 - 7:50 am | मित्रहो

दोन मुले विप्रोमधे कामाला होते. व्यवस्थित चालल होत. मनाला आवडेल ते करायच भूत डोक्यात शिरल आणि सायकलचे दुकान काढले. भारताबाहेर ज्या प्रकारे सायकलींग होते त्या प्रकारातली सायकलींग इकडे आणण्यासाठी. आजही काही अंबानीसारखा पैसा मिळवित असतील असे नाही पण विप्रोत राहून जेवढे कमावले असते तेवढे नक्कीच कमावित असतील. अधेमधे विदेशातले सायकलींग टूर आहेच तेंव्हा फिरणही झाल.
माझ्या एका मित्राचा साळा, अमेरीकेत शिकायला होता, चांगला पिचडी करीत होता. अचानक काहीतरी वेगळ नवीन करायच डोक्यात आल.दिल सार सोडून. व्हीसा पुढे वाढवता आला नाही. त्याच क्षेत्र भारतात नवीन होत. लोक पैसे देत नव्हते. असंख्य अडचणी होत्या. आज प्रचंड य़शस्वी आहे. जेंव्हा त्याच्या पुतण्याने इंजीनियरींग पूर्ण केल्यानंतर मला फक्त दोन वर्षे द्या मी टेनिसमधे प्रयत्न करतो सांगितल्यावर साऱ्यासमोर त्याच्या काकाचा प्रवास उभा झाला. तो त्रास, ती अनिश्चितता परत कुणालाच नको होत. कुणीच सहजासहजी तयार झाल नाही घरात यशस्वी उदाहरण असून सुद्धा.
प्रश्न यशस्वी किंवा अयशस्वी होण्याचा किंवा मेहनतीचा नाही तर जी अनिश्चिततेची तलवार सतत डोक्यावर असते ती सहन करण्याची मानसिक तयारी ही खरी समस्या असते. हे साऱ्यांना जमेलच असे नाही. सर्वसाधारण नोकरीत अनिश्चितता नाही असा एक समज असतो. वाद्य छान वाजविता येउन, त्यात शिक्षण घेउन आकाशवाणीतली नोकरी पकडण्यासाठी धडपड करनारे बघितले.
एक सत्य हेही आहे की सामान्य इजीनियर आणि सामान्य तबला वादक यातला सामान्य इंजीनियर हा नेहमीच सुखी असतो. काळ बदलतोय, आपल्या पिढीत चाललेली गोष्ट पुढच्या पिढीसाठी योग्य असेलच असे छाती ठोक पणे कुणी सांगू शकत नाही. प्रत्येकाचा प्रवास वेगळा.
जो पैसे कमावतो म्हणून आनंदी नाही असे काही नाही तोही मनाला आवडनारे काम करीत असेल. असा कुठला एक फॉर्मुला नाही. रेंचो त्याच्या जागी योग्य आहे त्याची विरुद्ध बाजूही योग्य आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा.

मुद्दा हा आहे की फक्त चतुरच सुखी होतो आणि फरहान नेहमी फेल होतो हे माझ्या मते चुकीचं आहे!

मुक्त विहारि's picture

29 Dec 2018 - 10:12 am | मुक्त विहारि

अर्थस्य पुरुषो दासः

वेडसर's picture

29 Dec 2018 - 10:19 am | वेडसर

!