✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वसुबारसेनिमित्त मी केलेली कविता...

व — वैभवदातार, Mon, 10/16/2017 - 11:17
वसुबारस आजि असे करुया प्रेमभरे गाईचे पूजन सवत्स धेनू दारी आली सांभाळू आपण आपले गोधन श्रीकृष्ण सांभाळी गोमातेला दत्ताचरणी आश्रय दिधला कामधेनू म्हणती भक्त तिजला पुरवी सर्वांच्या मनोकामनेला गोमूत्राची महती वर्णितो आयुर्वेद घ्यावे पंचगव्य हो धार्मिक कारणे रोग निवारणे प्यावे शरीर शुद्धी हो नैवेद्य दाखवू आरती करुया गाई वासराचे महत्त्व सांगू वसुबारसेचे महत्त्व जाणून गोवत्सांचे रक्षण करु -- शब्दांकित (वैभव दातार )

प्रतिक्रिया द्या
3116 वाचन

💬 प्रतिसाद (10)

कविता छानच आहे आपली ....

पगला गजोधर
Mon, 10/16/2017 - 12:49 नवीन
कविता छानच आहे आपली .... पण प्रशांत दामलेंवरून एकदम वसुबारस ??? त्यामुळे थोडा दचकलो ... फक्त गोधन ऐवजी, गो म्हैस बकरी इ इ वैगरे सगळ्या प्राण्याच्या उपयुक्ततेविषयी ममत्व वाढायला हवं...
  • Log in or register to post comments

पगला गजोधर सप्रेम नमस्कार ,

वैभवदातार
Mon, 10/16/2017 - 19:19 नवीन
पगला गजोधर सप्रेम नमस्कार , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद . हो सर्व प्राणिमात्रांविषयी कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे . माझी आजची कविता फक्त वसुबारसेविषयी लिहिली असल्याने त्यात फक्त गाय आणि वासरू यांचा उल्लेख केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

वा फारच सुरेख...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 10/16/2017 - 13:08 नवीन
दिवाळीच्या प्रत्येक दिवसावर कविता केली आहे का? रोज एक टाका... तसेच मागचा ब्याललॉगही लवकर भरुन काढा. कमीत कमी अक्टोबर महिन्याचा तरी काढाच. प्रसंग खालील प्रमाणे दि. १ - मोहरम दि. २ म गांधी जयंती. दि. ५ कोजागिरी पोर्णिमा, दि. ८ संकष्टी चतुर्थी, दि. १२ कालाष्टमी, दि. १५ रमा एकादशी वरील कवितांच्या प्रतिक्षेत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

__/\__

सूड
Mon, 10/16/2017 - 19:52 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा सप्रेम नमस्कार ,

वैभवदातार
Mon, 10/16/2017 - 19:16 नवीन
पैजारबुवा सप्रेम नमस्कार , बॅक लॉग भरून काढण्यासाठी कविता मी करत नाही. जर एखाद्या विशेष दिवसासाठी सुचली तर मी लिहितो.
  • Log in or register to post comments

पूर्वी एक चतुर चाणक्य नावाचे

सूड
Mon, 10/16/2017 - 20:06 नवीन
पूर्वी एक चतुर चाणक्य नावाचे गृहस्थ होते इथे. तेही तुमच्या कवितांसारख्याच सरस कविता लिहीत असत.
  • Log in or register to post comments

समयोचित. आवडली.

पद्मावति
Mon, 10/16/2017 - 20:11 नवीन
समयोचित. आवडली.
  • Log in or register to post comments

रोज एकेक कविता करा ना गडे! ;

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/16/2017 - 23:35 नवीन
रोज एकेक कविता करा ना गडे! ;)
  • Log in or register to post comments

कपडे घालून केली तरी चालेल...

पगला गजोधर
Mon, 10/16/2017 - 23:54 नवीन
कपडे घालून केली तरी चालेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आपल्या सर्वांच्या

वैभवदातार
Tue, 10/17/2017 - 12:21 नवीन
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मी आपला आभारी आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा