वसुबारस आजि असे करुया
प्रेमभरे गाईचे पूजन
सवत्स धेनू दारी आली
सांभाळू आपण आपले गोधन
श्रीकृष्ण सांभाळी गोमातेला
दत्ताचरणी आश्रय दिधला
कामधेनू म्हणती भक्त तिजला
पुरवी सर्वांच्या मनोकामनेला
गोमूत्राची महती वर्णितो
आयुर्वेद घ्यावे पंचगव्य हो
धार्मिक कारणे रोग निवारणे
प्यावे शरीर शुद्धी हो
नैवेद्य दाखवू आरती करुया
गाई वासराचे महत्त्व सांगू
वसुबारसेचे महत्त्व जाणून
गोवत्सांचे रक्षण करु
-- शब्दांकित (वैभव दातार )
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3124
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता छानच आहे आपली ....
पगला गजोधर सप्रेम नमस्कार ,
In reply to कविता छानच आहे आपली .... by पगला गजोधर
वा फारच सुरेख...
__/\__
In reply to वा फारच सुरेख... by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा सप्रेम नमस्कार ,
पूर्वी एक चतुर चाणक्य नावाचे
समयोचित. आवडली.
रोज एकेक कविता करा ना गडे! ;
कपडे घालून केली तरी चालेल...
In reply to रोज एकेक कविता करा ना गडे! ; by अत्रुप्त आत्मा
आपल्या सर्वांच्या