Making of photo and status : २. जावळ.

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
15 Oct 2017 - 8:30 am

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.misalpav.com/node/41232

छायाचीत्राचा खालचा भाग पहा बरं ! काय दिसतंय ? काळ्या कातळावर केसासारखं काहीतरी दिसतंय ना ? फसलात ! ते आहे हत्तीच्या टाळक्यावर उगवलेलं जावळ !

Making of photo and status :
हा! हा!! हा!!! आहे की नाही सगळीच गंमत. आपलं डोकं कितीही लढवलं तरी ह्या फोटोवरून कोणाच्याही लक्षात येणार नाही की हा कसला फोटो आहे. मी केरळला गेलो असता तिथे हत्तीची राईड केली होती. आम्ही हत्तीच्या पाठीवर बसलो होतो, तर समोरच हत्तीचं भलं मोठं डोकं डुगुडुगू डुगुडुगू हलताना दिसत होतं. आणि त्याच्या डोक्यावर जावळासारखे दिसणारे काळेभोर विरळ केससुद्धा! It was so cute looking!! मी पट्कन हत्तीच्या डोक्याचा आणि त्याच्या केसांचा फोटो काढून घेतला. काय सुंदर दिसत होते ते केस!! एकेका केसांमध्ये चांगलं अर्ध्या सेंटिमीटरचं अंतर! आणि उंचीने भरपूर वाढलेले! खरं सांगू! मला त्या केसांवरून हात फिरवावासा वाटत होता. पण माझी हिंमतच झाली नाही. न जाणो त्याला ते आवडलं नाही तर!!? माझंच जावळ धरून उपटायचा. हा! हा! हा! पण काहो!? जशी सिंहाची आयाळ असते तसे हत्तीच्या डोक्यावरचे केस हे त्यांच्यात सौन्दर्याचे लक्षण मानले जाते का? Hmmm! कोणाला तरी विचारायला पाहिजे.

हत्तीच्या राईडची एक गंमत सांगतो. हत्तीची राईड ही घोड्याच्या राईडसारखी उडी मारून टांग टाकून बसायची नसते काही!! हत्ती पार्किंग करण्याच्या जागी एका बाजूला कायमस्वरूपी एक उंच मचाण बांधलेलं असतं. त्याला टेकूनच हत्तीला उभं करतात. आपण शिडीने मचाणावर चढायचं आणि डायरेक्ट हत्तीच्या पाठीवर बसायचं. पण मांडी ठोकून नाही. हत्तीच्या पाठीवर रेक्झिनची जाड गादी टाकलेली असते. आपण एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे टाकून बसायचे असते. ते बसणेपण सुखाचं नसतं हो! हत्ती काही घोड्यासारखा बारीक नसतो. हत्तीची ही मोठ्ठी पाठ आणि हे मोठ्ठं पोट. आपला एक पाय डावीकडे आणि दुसरा पाय उजवीकडे असा १८० कोनात ताणले जातात. थोड्यावेळाने आपल्या पायाच्या दोन्ही जांघेत जोराची कळ मारायला लागते. अर्ध्यातासाने जेव्हा आपली राईड संपल्यावर आपण हत्तीवरून खाली उतरतो ना, तेव्हा कितीतरी वेळ आपण फेंगडेच चालत असतो. हा! हा!! हा!! मग बघणार ना कधीतरी हत्तीची राईड करून!!!?

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

कला

प्रतिक्रिया

सचिन काळे's picture

15 Oct 2017 - 10:17 pm | सचिन काळे

@ आवडाबाई, मी तुमची मार्क देण्याची वाट पाहतोय. ह्यावेळी मेकिंगचेही मार्क द्या, बरं का!!! :वाट पाहणारी बाहुली:

बाजीप्रभू's picture

16 Oct 2017 - 10:14 am | बाजीप्रभू

खरं सांगू का "जावळ" शब्द शिर्षकात देऊन तुम्ही चूक केलीत.
अगदी उडतं उडतं पाहूनही हत्तीचं डोकं आहे हे कळत.

सचिन काळे's picture

16 Oct 2017 - 10:38 am | सचिन काळे

@ बाजीप्रभू, खरं सांगू का "जावळ" शब्द शिर्षकात देऊन तुम्ही चूक केलीत. अगदी उडतं उडतं पाहूनही हत्तीचं डोकं आहे हे कळत. >>> हो!मला बऱ्याच जणांनी अगदी हाच प्रतिसाद दिलाय. मला वाटलं होतं कोणाला कळणार नाही, काय आहे ते! पण उघड गुपित निघाले. :खोखो:

बरं! Making आवडलं का ते सांगा की!!!

आनन्दा's picture

16 Oct 2017 - 6:46 pm | आनन्दा

मला तो फोटो रेड्यावर उलटा बसून काढलाय असे वाटले होते.. आम्हाला कसला मिळतोय हत्ती बघायला? सगळे रेडेच

सचिन काळे's picture

16 Oct 2017 - 7:45 pm | सचिन काळे

@ आनन्दा, मला तो फोटो रेड्यावर उलटा बसून काढलाय असे वाटले होते.. >>> चला! मला एकजण तर असा भेटला, ज्याने फोटोतल्या हत्तीला ओळखले नाही. हा! हा! हा!! मी आणि माझं making भरून पावले. मी तृप्त झालो. :डोळा मारा:

सचिन काळे's picture

16 Oct 2017 - 11:37 am | सचिन काळे

@ सतिशजी गावडे, राग सोडा! मी तुमच्याही प्रतिक्रियेची वाट पहातोय.

दीपक११७७'s picture

16 Oct 2017 - 3:30 pm | दीपक११७७

हत्तीच आहे हे पटकन ओळखता येते!

सिरुसेरि's picture

16 Oct 2017 - 3:50 pm | सिरुसेरि

what an idea .

सचिन काळे's picture

16 Oct 2017 - 4:17 pm | सचिन काळे

@ दीपक, हत्तीच आहे हे पटकन ओळखता येते! >>> हो ना!!! माझा अंदाज चुकला खरा. :स्मित:

@ सिरूसेरी, what an idea . >>> आपले आभार! पण मला 'आपकी अदालत'मध्ये उभे राहिल्यासारखे वाटतेय. :खोखो:

संग्राम's picture

16 Oct 2017 - 5:08 pm | संग्राम

फोटो बघुन लगेच ओळखल की हत्ती आहे ते ... :-) ....
बाकी, एका आठवड्यात २ वेळा प्रकाशित करता येईल ...

सचिन काळे's picture

16 Oct 2017 - 6:00 pm | सचिन काळे

@ संग्राम, प्रतिक्रियेकरिता धन्यवाद!!

बाकी, एका आठवड्यात २ वेळा प्रकाशित करता येईल ... >>> मला धक्क्यातून सावरायला आठवडा कमी पडतो हो!! :खोखो:

तसं पाहिलं तर मी पाच दिवसांत पाच अगोदरच लिहून ठेवलेत. :स्मित:

बादवे, मिपावर पूर्वी स्मायली टाकता येत होत्या. आता ती सोय बंद झालीय का?

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Oct 2017 - 7:49 pm | अमरेंद्र बाहुबली

मला तो हत्ती आहे इतकं लक्षात आलं होतं. फक्त त्या डोक्याच्या भागाला मी मागचा भाग समजलो होतो.

सचिन काळे's picture

16 Oct 2017 - 8:55 pm | सचिन काळे

@ अमरेंद्र बाहुबली, फक्त त्या डोक्याच्या भागाला मी मागचा भाग समजलो होतो. >>> हा! हा! हा! झक्कास!!

Making जमलंय का? हेही सांगा ना, अमरेंद्रजी!

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Oct 2017 - 11:19 pm | अमरेंद्र बाहुबली

जमतय जमतय! उपक्रम चांगलाय पण एका वेळेस एका ऐवजी 4/5 फोटो टाका. लेख झक्कास होईल.

सचिन काळे's picture

17 Oct 2017 - 7:18 am | सचिन काळे

@ अमरेंद्रजी, एका वेळेस एका ऐवजी 4/5 फोटो टाका. लेख झक्कास होईल. >>> आपल्या सुचनेकरिता आभार. एक फोटो, त्याला साजेसं असं एक स्टेटस आणि त्यादोघांशी संबंधित Making of photo and status, असा तिघांचा मिळून एक सुंदर गुलदस्ता वाचकांना सादर करणे अशी या मालिकेची संकल्पना आहे. त्यामुळे एका लेखात एकापेक्षा अधिक फोटो एका लेखात देऊ शकत नाही. कारण प्रत्येक फोटोची status आणि making वेगळी लिहून होईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2017 - 1:27 pm | अमरेंद्र बाहुबली

कमीतकमी 2 फोटो आणी त्याचं स्टेटस टाका.

सचिन काळे's picture

17 Oct 2017 - 4:10 pm | सचिन काळे

@ अमरेंद्रजी, आपली माझ्या मालिकेबाबत एवढी उत्सुकता पाहून मला खरोखरच आनंद होत आहे. मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे आठवड्याला दोन गुणवत्ता सांभाळून 'मेकिंग' लिहिणे अत्यंत कार्यबहुल्यामुळे सध्यातरी मला शक्य होईलसे वाटत नाही. माफी असावी. तरी मध्ये कधी जमलेच तर आपल्या सूचनेचा नक्कीच विचार करेन. पुन्हा एकदा आपले आभार!

कपिलमुनी's picture

18 Oct 2017 - 4:42 pm | कपिलमुनी

red
या फोटोवर तुम्ही स्टेटस लिहाच अशी आग्रहाची ईनंती आहे

सचिन काळे's picture

18 Oct 2017 - 6:02 pm | सचिन काळे

@ कपिलमुनी, तुम्ही दिलेल्या फोटोवर स्टेटस लिहिणे खरंच मला जमत नाहीए हो!! मला माफी असावी.

सचिन काळे's picture

18 Oct 2017 - 6:35 pm | सचिन काळे

बादवे कपिलमुनीजी, माझ्या लहानपणी माझ्या वयाच्या दहा ते पंचवीस वर्षांपर्यंत 'कपिल मल्होत्रा' नावाचा माझा एक पंजाबी जिवलग मित्र होता. गेल्या तीस वर्षांत आमची भेट झालेली नाही. की त्याचा पत्ताही मला माहित नाही.
तुमचे नांव वाचले आणि मला माझ्या मित्राच्या भेटीचा आनंद झाला. डोळे पाणावले. आपले फार फार आभार.

सचिन काळे's picture

21 Oct 2017 - 7:58 pm | सचिन काळे

पुढील भाग उद्या रविवारी दुपारी १ वाजता टाकतोय. आपणां सर्वांस आग्रहाचे निमंत्रण आहे. पाहण्या आणि वाचण्यासाठी नक्की या. आणि आपली प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका बरं का!!! :स्मित: