पाककृती आणि कॉपीराईट

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
2 May 2017 - 9:11 am

स्त्रीया आणि कॉपीराईट या पहिल्या भागात मुख्यत्वे पारंपारीक कलांबद्दल चर्चा केली. पाककृतींच्या कॉपीराईट बद्द्ल काय होते ? कारण idea वर तर कॉपीराईट मिळत नाही, कॉपीराईट मुख्यत्वे शैली आणि मांडणीवर मिळतो. अ, ब, क, ड हे चार जिन्नस अमुक मात्रेने घेऊन एक पाककृती बनवता येऊ शकते हि एक idea झाली त्यावर तर कॉपीराईट मिळणार नाही पण शैली आणि लेखनातील मांडणीवर कॉपीराईट मिळतो. म्हणजे जसे की डिक्शनरीतील शब्दांवर कॉपीराईट मिळणार नाही पण डिक्शनरीच्या मांडणीच्या पद्धतीवर कॉपीराईट मिळतो. पण मग तुमची मांडणी इतरांनी आधी केलेल्या मांडणीपेक्षा अधिक वैशिष्ट्यपुर्ण असणे कॉपीराईट सुरक्षीत करण्यासाठी साहाय्यभूत असू शकते. प्रत्यक्षात खाद्यपदार्थ टेबलवर अथवा पानात कसे मांडता यावर कॉपीराईट मिळू शकेल का ? तर बहुधा सहजतेने नाही कारण टेब्लवरची मांडणी ही आयडीआ झाली. पण पदार्थाची मांडणी डेकोरेशन विशीष्ट पद्धतीने करून त्याच्या काढलेल्या छायाचित्रांवरचा कॉपीराईट मात्र नक्कीच तुमचा होतो.

पण मग इन्नोव्हेटीव्ह पाकृंचे काय ? इन्नोव्हेटीव्ह संषोधने आणि प्रक्रीयांना कॉपीराईट कायद्यात नव्हे पण पेटंट कायद्यात संरक्षण मिळू शकते. दैनंदीन पाकृंना कितपत सहजतेने समाविष्ट करता येईल याबाबत साशंकता वाटते कारण पेटंट कायद्यांचे संरक्षण मिळवण्यासाठी संशोधन उच्चस्तराचे असणे अपे़क्षीत असावे. (चुभूदेघे) पण शास्त्रीय संशोधनाचा आधार घेऊन केलेल्या इनोव्हेटीव्ह संशोधन आणि प्रक्रीयांवर पेटंट मिळवणे शक्यही असावे. कॉपीराईट सोडून इतर बौद्धीक संपदा कायद्यांतर्गत संरक्षण मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे सर्वसाधारणपणे अभिप्रेत असावे.

विशीष्ट भौगोलीक परिसरात एखादा खाद्यपदार्थ नावाजलेला असतो त्यास भौगोलीक वारशा संबंधांने बौद्धीक संपदा कायद्याचे संरक्षण कसे मिळू शकते ते स्त्रीया आणि कॉपीराईट धाग्याच्तील प्रतिसाद चर्चेतून पाहिले आहेच तेव्हा त्याची इथे पुनरावृत्ती टाळतो.

आपला पाकृ किंवा खाद्यपदार्थांबाबतचा उत्साह व्यावसायिक स्वरुपाचा असेल तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावाने काही अटींवर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करू शकता. ज्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या क्षेत्रात तुमच्या व्यवसायाचे नाव इतर कुणास वापरता येणार नाही. टाटा नमक किंवा चितळे मिठाई किंवा अमुल बटर अशा प्रकारची तुमच्या उत्पादनांची नावे व्यापारी चिन्हे लोगो इत्यादीं साठी ट्रेडमार्कचे संरक्षण उपयूक्त पडते. असे आपले वैशिष्ट्यपुर्ण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून ते आंतरजालावरून मार्केटींगसाठी वापरता येऊ शकेल का तर नक्कीच किंवा अगदी नेहमी पाकृ लिहिणार्‍यांना आपल्या पाकृ व्यावसायिक स्तरावर उपलब्ध करण्याची इच्छा असेल तर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचा नक्कीच विचार करावा.

लोगो, प्रॉडक्ट लेबल, जाहीराती वैशीष्ट्यपुर्ण आणि कलात्मकता असेलल तर तुम्ही तयार केलेली ब्रँड इमेज इतरांना चोरणे अवघड होते त्या शिवाय कॉपीराईट कायद्याचे संरक्षण भक्कम होण्यास मदत होते. म्हणजे लोगो केवळ साधा अल्फाबेटीकल असेल तर कॉपीराईट कायद्याचे संरक्षण मर्यादीत होते तेच त्यास वैशिष्ट्यपूर्ण कलत्मक ढब असेल तर कॉपीराईट कायद्याचे संरक्षण सुलभ होते.

http://www.ipindia.gov.in/ या सरकारी साईटवर बौद्धीक संपदा कायद्यांबद्दल माहिती आणि सोई एकत्र देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते.

उत्तरदायकत्वास नकार

अर्थकारण

प्रतिक्रिया

माहितगार's picture

26 Jun 2017 - 10:15 am | माहितगार

'पाकृं कशी बनवावी' व्हिडीओंच्या कॉपीराईट उल्लंघना बद्दलची एक केस आमेरीकन न्यायालयांसमोर आली असल्याचे वृत्त आहे. मी स्वतः डिटेल मध्ये वाचली नाही, पण कुणास रुची असल्यास त्यांच्या अधिक माहितीसाठी दुवा Sugar Hero v. Food Network: Copyright Infringement of ‘How-To’ Food Videos

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 3:47 pm | धर्मराजमुटके

चांगला लेख. माहितीच्या प्रतिक्षेत !

दशानन's picture

27 Jun 2017 - 3:49 pm | दशानन

माहितीपूर्ण लेख.

माहितगार's picture

5 Jul 2017 - 8:51 am | माहितगार

भारतीय पाकृ ब्लॉग लेखकांचा उचलेगिरीशी सामना या विषयावर एक वृत्त आले आहे. केसेस वर लेखात दिलेल्या कारणाने अद्याप कोर्टात गेल्या नाहीत तरीही वकिलांनी नोटीस पाठवणे केसेस टाकणे मागे घेणे असे सगळे चालू असल्याचे दिसते.