(एक ग्लास त्याचा....)

Primary tabs

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 11:47 pm

प्रेरणा

बसण्याचा हिशोब साचा
एक ग्लास त्याचा, एक माझा!

दिसायला दोन्ही एकच
ब्रँडही सारखाच
फक्त चखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा!

माझा आधी संपेल, त्याचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक ग्लास त्याचा, एक माझा!

एकत्र बसून थोडं वेगळेपण
वेगळं बसूनही थोडस्सं एकत्रपण..!
त्याचं सावधपण माझं झोकांडणं
बसण्यातली चखण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक ग्लास त्याचा, एक माझा!

बिलाच्या बेरजा, नशेत केलेल्या वजा-बाक्या!
कधी गुणाकार.. कधी भागाकार
परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!!
पण गणित तिथेच येऊन थांबतं..
अगदी नेहेमी..

एक ग्लास त्याचा....

asdf

विडंबनdive aagarkokanअदभूतआता मला वाटते भितीकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचबालसाहित्यभावकविताभूछत्री

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

17 Apr 2017 - 11:50 pm | राघवेंद्र

मस्त जमलंय !!!

अजून दोनतीन कल्पना वाढवा.

सतिश गावडे's picture

18 Apr 2017 - 11:04 am | सतिश गावडे

मुळ कवितेत फक्त काही शब्दांचे फेरफार केले आहेत :)

पैसा's picture

18 Apr 2017 - 9:22 am | पैसा

=))

खटपट्या's picture

18 Apr 2017 - 9:31 am | खटपट्या

खूप छान इडंबन

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2017 - 9:47 am | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या..!
.... ..... http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/gun-face-smiley-emoticon.gif
गा वडे मास्तरांचा ग्लास

जमला फस् क्लास!

यशोधरा's picture

18 Apr 2017 - 9:56 am | यशोधरा

=))

चित्रगुप्त's picture

18 Apr 2017 - 10:01 am | चित्रगुप्त

वाहवा.

पुंबा's picture

18 Apr 2017 - 10:54 am | पुंबा

हाहाहा.. मस्त..

संजय क्षीरसागर's picture

18 Apr 2017 - 11:50 am | संजय क्षीरसागर

हे एक वेरिएशन बघा :

बसण्याचा हिशोब घरचा
एक ग्लास तिचा, एक माझा !

सगळी दारु एकच
चढणारही सारखीच
फक्त घेण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक ग्लास तिचा,एक माझा!

माझी आधी संपेल, तिची नंतर
नेहेमीचंच हे पिण्यातलं-अंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
उष्टी... चलाखीदार... बदली
पण तरीही..
एक ग्लास तिचा, एक माझा!

एकत्र बसून थोडं वेडेपण
वेगळं बसूनही झक्कास एकत्रपण..!
तिचं सावधपण, माझं उधळलेपणं
घेण्यातली आणि भरण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक ग्लास तिचा, एक माझा!

चुकीची योगासनं, नशेत केलेल्या माकड उड्या!
कधी ती माझ्यावर .. कधी मी तिच्यावर
परत त्यातही एकमेकांवर कुरघोड्या!!!
पण गणित तिथेच येऊन थांबतं..
अगदी नेहेमी..

एक ग्लास तिचा....

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2017 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा

आरारारारारारा! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/cute-smiley-tongue-in-cheek-emoticon.gif

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2017 - 6:17 pm | टवाळ कार्टा

वो सर, हा विषय मी घेणार होतो....जाऊदे आता

अभ्या..'s picture

18 Apr 2017 - 12:46 pm | अभ्या..

दोन्ही ग्लास अमितचे. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2017 - 2:01 pm | अत्रुप्त आत्मा

एक ग्लास पक्षी-दरीत'ला(ही! ) ह्ही ह्ही! =))

वरुण मोहिते's picture

18 Apr 2017 - 1:46 pm | वरुण मोहिते

विडंबन ...हाहाहा

मदनबाण's picture

18 Apr 2017 - 4:27 pm | मदनबाण

चिअर्स ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakharia

सत्यजित...'s picture

19 Apr 2017 - 2:01 am | सत्यजित...

याला म्हणावं विडंबन!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Apr 2017 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक तांब्या त्याचा मी टाकणारे ओ सगासर. डिब्ज.

फक्कडं जमलाय हा एकचं प्याला.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2017 - 12:25 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/evil/chainsaw-smiley-emoticon.gif

अनुप ढेरे's picture

19 Apr 2017 - 10:38 am | अनुप ढेरे

मस्तं!

पद्मावति's picture

19 Apr 2017 - 11:14 am | पद्मावति

मस्तच!

अभिजीत अवलिया's picture

22 Apr 2017 - 8:37 pm | अभिजीत अवलिया

विडंबन जमलय.