✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: देवाची काठी

स
स्मिताके यांनी
Fri, 02/10/2017 - 07:03  ·  लेख
लेख
aaa "हा पाहिलास फोटो? पेपरात छापला होता म्हणे.. आजी आणि तिची मैत्रीण." "आणि हे मागे काय ग आई? " " भूकंप झाला होता ना त्यावेळी...” "मग?" "तुझी आजी हिमतीची. तिच्या घरचं कोणीच वाचलं नाही. या मैत्रिणीच्या आईला विचारलं तिने, तुमच्या बरोबर राहू का, म्हणून. त्यांचं घर तरी कुठे वाचलं होतं? कष्ट उपसले आणि निभावलं कसं तरी. गावची शाळाही कोसळली होती, पण दोघी दूरच्या शाळेत चालत जात.” "आणि हा फोटो? ही आजीने काढलेली शाळा ना?" "हो. मुलींची शाळा. मला तर वाटतं, भूकंपामुळेच गावात मुलींची शाळा झाली." "म्हणजे?" "आजीच्या घरी मुलींना शिकायला बंदी होती. लग्नच लावणार होते तिचं. तेवढ्यात भूकंप झाला, म्हणून तर.”
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2630 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

मस्त डोकं लढवलंय!!

जव्हेरगंज
Fri, 02/10/2017 - 08:57 नवीन
मस्त डोकं लढवलंय!!
  • Log in or register to post comments

*लेखकाने

जव्हेरगंज
Fri, 02/10/2017 - 08:58 नवीन
*लेखकाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

प्लस वण !

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/10/2017 - 17:17 नवीन
प्लस वण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

छान..

मराठी कथालेखक
Fri, 02/10/2017 - 11:11 नवीन
छान..
  • Log in or register to post comments

आवडली

अॅस्ट्रोनाट विनय
Fri, 02/10/2017 - 11:11 नवीन
वाईटातही चांगलं होतं म्हणतात ते असं
  • Log in or register to post comments

ठीक आहे कथा पण आजीच्या

शब्दबम्बाळ
Fri, 02/10/2017 - 11:22 नवीन
ठीक आहे कथा पण आजीच्या लहानपणीच्या काळात कलर फोटो जरा बरोबर नाही वाटलं...
  • Log in or register to post comments

कालानुरुप

आंबट गोड
Fri, 02/10/2017 - 14:53 नवीन
आणि आजी व तिची मैत्रिण एकदम शर्टपँट वगैरे घालत होत्या पाठीवर सॅक घेत होत्या हेही नाही पटत.
  • Log in or register to post comments

गोष्ट अजुन १०० वर्षांनी

पिलीयन रायडर
Fri, 02/10/2017 - 21:16 नवीन
गोष्ट अजुन १०० वर्षांनी सांगितलेली असेल तर त्यावेळच्या आज्ज्या ह्या आजच्या मिनिस्कर्ट घालणार्‍या मुली सुद्धा असु शकतातच ना.. ! चांगली कथा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट गोड

बरोबर.. पण त्यावेळी "घरी

मराठी कथालेखक
Sat, 02/11/2017 - 13:24 नवीन
बरोबर.. पण त्यावेळी "घरी मुलींना शिकायला बंदी होती" हे जुळणार नाही ना ? अर्थात फोटोतला अर्थ महत्वाचा, मुलींच्या अंगावरचे कपडे , पाठीवरची सॅक या गोष्टींना महत्व देण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अहो.. ह्यावरच्या फोटोत शर्ट

पिलीयन रायडर
Sun, 02/12/2017 - 00:00 नवीन
अहो.. ह्यावरच्या फोटोत शर्ट पॅण्ट घातलेल्या मुलींनाही शिकायला बंदी असण्याची दाट शक्यता आहे. ज्या वातावरणातला तो फोटो आहे, ते बघता नक्कीच तिथे मुलींना शिकायला फार वाव नसेल असंच वाटतंय. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा