शतशब्दकथा स्पर्धा २०१७: देवाची काठी
लेखनप्रकार
"हा पाहिलास फोटो? पेपरात छापला होता म्हणे.. आजी आणि तिची मैत्रीण."
"आणि हे मागे काय ग आई? "
" भूकंप झाला होता ना त्यावेळी...”
"मग?"
"तुझी आजी हिमतीची. तिच्या घरचं कोणीच वाचलं नाही. या मैत्रिणीच्या आईला विचारलं तिने, तुमच्या बरोबर राहू का, म्हणून. त्यांचं घर तरी कुठे वाचलं होतं? कष्ट उपसले आणि निभावलं कसं तरी. गावची शाळाही कोसळली होती, पण दोघी दूरच्या शाळेत चालत जात.”
"आणि हा फोटो? ही आजीने काढलेली शाळा ना?"
"हो. मुलींची शाळा. मला तर वाटतं, भूकंपामुळेच गावात मुलींची शाळा झाली."
"म्हणजे?"
"आजीच्या घरी मुलींना शिकायला बंदी होती. लग्नच लावणार होते तिचं. तेवढ्यात भूकंप झाला, म्हणून तर.”
वाचने
2652
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मस्त डोकं लढवलंय!!
In reply to मस्त डोकं लढवलंय!! by जव्हेरगंज
*लेखकाने
In reply to मस्त डोकं लढवलंय!! by जव्हेरगंज
प्लस वण !
छान..
आवडली
ठीक आहे कथा पण आजीच्या
कालानुरुप
In reply to कालानुरुप by आंबट गोड
गोष्ट अजुन १०० वर्षांनी
In reply to गोष्ट अजुन १०० वर्षांनी by पिलीयन रायडर
बरोबर.. पण त्यावेळी "घरी
In reply to बरोबर.. पण त्यावेळी "घरी by मराठी कथालेखक
अहो.. ह्यावरच्या फोटोत शर्ट