'बघणं' राहूनच गेलं
.
शब्दांमागे धावण्यात
'बघणं' राहूनच गेलं
रस्त्याकडेचं इवलं रोपटं
कुणी न बघताच मेलं
शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको
'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात
सौंदर्यगंध दरवळतो
समजून घेण्याच्या नादात
तोच नेमका हरपतो
समोर अप्सरा उभी
तिचं आधी नाव सांगा
वय-जात-उंची-शिक्षण
सगळं तपशील्वार सांगा
सांदि-कोपर्यात डुलणारं फूल-
त्यात विशेष काय आहे
नवी ब्रेकिंग न्यूज काय-
ते महत्वाचं आहे...
सुंदर कविता... चित्रेही छान!
विचार आवड्ला. कविता अजून
अप्रतिम सुंदर चित्रे आणि कविता !
चित्रगुप्तजी,
छान!
छान!
छान!
समर्था,
हा हा हा!!!
ते निसर्गचित्राच्या वरचं अॅबस्ट्रॅक्ट सोडून बाकी आवडले..
कविता आवडली
शब्दांचा पसारा हवा
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- The Weeknd - Starboy (official) ft. Daft Punkछान!
चित्रगुप्त साहेब ,
खूपच छान