'बघणं' राहूनच गेलं
काव्यरस
.
शब्दांमागे धावण्यात
'बघणं' राहूनच गेलं
रस्त्याकडेचं इवलं रोपटं
कुणी न बघताच मेलं
शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको
'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात
सौंदर्यगंध दरवळतो
समजून घेण्याच्या नादात
तोच नेमका हरपतो
समोर अप्सरा उभी
तिचं आधी नाव सांगा
वय-जात-उंची-शिक्षण
सगळं तपशील्वार सांगा
सांदि-कोपर्यात डुलणारं फूल-
त्यात विशेष काय आहे
नवी ब्रेकिंग न्यूज काय-
ते महत्वाचं आहे...
वाचने
11580
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुंदर कविता... चित्रेही छान!
विचार आवड्ला. कविता अजून चांगली करता आली असती.
पहिल्या चित्राकडे बघतच राहिलो.
निव्वळ अप्रतिम !
बघण्याजोगी झालीये पोस्ट !
In reply to चित्रगुप्तजी, by संजय क्षीरसागर
In reply to चित्रगुप्तजी, by संजय क्षीरसागर
In reply to चित्रगुप्तजी, by संजय क्षीरसागर
संजया, नेमके कोणते चित्र 'बघण्याजोगे' वाटले हो तुजला? ;)
डोळे/नजर "कातिल" असणं म्हणजे काय, ते पहिया फोटोत कळतं!
कविता आवडली
शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको
मस्त...
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- The Weeknd - Starboy (official) ft. Daft Punkशब्दांच्या पलिकडे अनुभूती असते असं म्हणतात... पण, अलिकडे असायलाही काही बंदी नसावी.
बाकी, त्या निर्वस्त्र चित्राचे प्रयोजन समजलं नाही. कारण, सुंदर स्त्रीकडे विनाकारण पहाणारे 'चंट' म्हणून ओळखले जातात.
फारच सुंदर लिहिलीय कविता आणि सोबत उत्तम कलाकृतींची जोड त्याला . सजलीय अक्षरशः कविता तुमची ..
सिद्धेश्वर विलास पाटणकर
कविता आवडली.
सुंदर कविता... चित्रेही छान!