प्रवास ३

जॉनी's picture
जॉनी in जनातलं, मनातलं
3 Nov 2016 - 10:50 pm

प्रवास 2

"थापा धीर बोल चू*, पेहली बार आया है क्या? पक्का लोग है?"
"हा शाब, 4 तो किलीयर दिख रहे है"
"कहासे?"
"तेंदूए कि हि राह पर"

सर्वजण कमालीचे अलर्ट झाले होते. श्वास रोखले होते सर्वांचे. अगदी बेस वर सीओ सर सुद्धा तणावाखाली होते. खरंतर इतका वेळ एकाच पोजिशन मध्ये बसून सगळ्यांची शरीरं आंबून गेली होती. पण काही इलाज नव्हता. आणि आता तर समोर शत्रू. जरा चुकीची हालचाल जीवघेणी ठरू शकते जे सगळ्यांना माहित होतं. सर्वजण जेव्हा आपला आपला रोल पार पाडतात तेव्हाच अशी मिशन्स यशस्वी होतात आणि हे लक्षात ठेवूनच टीम ची निवड केलेली असते. त्यातल्या त्यात ह्या टीम मध्ये आशुतोष नवीन होता, पण बाकी सगळे मात्र खूप अनुभवी होते.

इकडे कर्नल माधवन आणि हवालदार नायक रेडिओ समोर बसले होते. ह्या प्रॉक्सि वॉर बद्दल त्यांना सतत चिंता असायची. ह्या लढ्याला अंत नाही हे त्यांना चांगलच माहित होतं. आपल्या जवानांसाठी त्यांचं काळीज तुटायचं, पण शेवटी ते हि एक सैनिक होते. हे आपलं कर्तव्य आहे ह्याची त्यांना जाणीव होती.

ते चार जण आता झाडीतून बाहेर आले होते. इकडे कुणी कुणाला टार्गेट करायचं ते ठरलेलं होतं.
"अल्फा ग्रीन"
"ब्रावो रेड"
"चार्ली ग्रीन"
"डेल्टा रेड"

"होल्ड ऑन बॉईज. आय वॉन्ट ऍटलिस्ट थ्री ग्रीन"

जोपर्यंत तीन ग्रीन मिळत नाहीत तोपर्यंत मेजर पुढे जाऊ शकत नव्हते. प्रयत्न खरतर पहिल्याच झटक्यात सगळ्यांना संपवण्याचा असतो, पण जितकी माणसं जास्त तितकं हे खूप अवघड असतं. असं ग्रीन रेड ग्रीन रेड करत एका क्षणी कॅप्टन रावIत, सुभेदार विकास आणि नायब सुभेदार सिंग तिघांकडून ग्रीन आला आणि मायक्रो सेकंद हि न गमावता मेजर च्या तोंडातून शब्द बाहेर पडला,

"एक्सिक्युट"

आणि ते ऐकल्या ऐकल्या पुढच्या नॅनो सेकंदात गोळीचा आवाज घुमला. आवाज एकाच होता पण तिन्ही गोळ्या एकाच वेळी निघाल्याने एकच आवाज आला होता.

तीन जण तर जागीच ठार झाले होते. अश्या वेळी जनरल प्रॅक्टिस अशी असते की तिघे पडल्यावर एवढासा हि वेळ न घालवता चौथ्याला लपायची संधी न देता एक्सिक्युट करणे. पण हे काम प्रचंड अवघड असतं. एकतर खूप कमी वेळात त्याच्यावर लक्ष ठेवून गोळी चालवायची असते, दुसरं म्हणजे, जसं आपल्या जवानांचं हे ट्रेनिंग झालंय, तसंच त्यांचं पण झालेलं असतं. त्यामुळे तो विजेच्या चपळाईने आडवा होणार ह्यात काहीच वाद नसतो.
त्यामुळे कोण जास्ती वेगवान ह्यावर गणित ठरतं.

नाईक अजिथ याने कोणतीही चूक न करता गोळी झाडली खरी, पण ती चौथ्या अतिरेक्यांच्या खांद्यात घुसली. त्यामुळे तो जखमी झाला पण जिवंत होता. पडल्या पडल्या सरपटत एका दगडामागे गेला आणि ओरडायला लागला.

"साब हम लोग गाव वाले है, हमे क्यु मार रहे हो साब"

हि सगळी नाटकं आणि असे प्रसंग मेजर सिद्दीकी कोळून प्यायलेले होते. त्यांनी वाट पाहायचं ठरवलं. अतिरेक्याचं ओरडणं चालूच होतं. अर्ध्या तासाने उजडायला लागलं तसं सर्वजण उठून त्याच्याजवळ गेले. तो हात वर करूनच पडला होता. काही जुजबी प्रश्न विचारले त्याला मेजरने, आणि आशुतोष ला म्हणाला,

"जेब चेक करो जरा उसकी"

आशुतोष ने खिशात हात घातला आणि ऑष्ट्रीयन मेड ग्लॉक पिस्तूल बाहेर काढलं.

"ऐसे इंपोर्टेड हातीयार देता कौन है भें** तुम्हे? ओर ये लेके तू इन्सास से टक्कर लेणे निकला था?"

आता त्या अतिरेक्यालाही कळून चुकलं होतं की मरण हीच आपली सुटका. त्यातही तो हिंमत करून बोलला

"तुम लोगो के लिये यही काफी है"

किंचित हसत मेजर म्हणाला, "लेफ्टनंट यादव, ऑल युअर्स. किल द शीट आउटा हिम. अँड येस, युज हिस गन ओन्ली, वाय टू वेस्ट आर्स?"

आशुतोष ने हात वर केला खरा, पण एव्हाना त्याच्या हृदयाचे ठोके 120 च्या पुढे जाऊन पोहोचले होते. तळहातांना घाम आला होता. अजून बंदुकीचा आवाज कसा नाही झाला म्हणून मेजर ने मागं वळून पाहिलं आणि त्याला द्विधा मनःस्थितीतला आशुतोष दिसला.
मेजर सिद्दीकिना ह्याची कल्पना होतीच, प्रत्येक नवीन मेम्बर ची अशी हालत झालेली त्याने पहिली होती. मेजर शांतपणे त्याच्याजवळ आले.

"आय नो इट्स हार्ड ब्रदर, बट आज या कल तुम्हे ये करना हि पडेगा. देअर इज नो वे अराऊंड. दिस इज व्हॉट वुई आर हिअर फॉर. डु इट अँड प्रूव्ह युअर ब्लड"

त्या थंड शब्दांनी आशुतोष ला धीर आला आणि पुढच्याच क्षणी चौथ्या अतिरेक्यांच्या मेंदूतून गोळी आरपार गेली!

दोन क्षण शांततेत गेले. मग सुभेदार विकास स्मित करत बोलला, "ज्यादा सोचनेका नही साब, कचरा हि तो साफ कर रहे है हम"

सीओ ला डिटेल रिपोर्ट गेला आणि टीम बेस कडे जायला निघाली. आशुतोष अजूनही शांत शांत होता. मेजरनी त्याला परत भलंमोठं तत्वज्ञान सांगितलं, पण ते ऐकायच्या मनस्थितीत तो नव्हता. प्रत्यक्ष माणूस मारण्याचं समर्थन कसं होऊ शकतं? ज्याला मारलं त्याची ही काही बाजू असेल. हा विचार कुणीच कसं करत नाही? अर्थात, तो अतिरेकीच होता. आपण त्याला मारलं नसतं तर त्याने उद्या दहा जणांना मारलं असतं.
दोन्ही बाजूचे विचार त्याला खाऊ लागले.

बेस वर आल्या आल्या आशुतोष रूम वर गेला. अंघोळ करून देवापुढे हात जोडून कितीतरी वेळ बसून राहिला. नंतर त्याने प्रथमच स्वतःहुन आईला फोन केला. आईशी बोलल्यावर जरा हलकं वाटलं त्याला. अर्थात, आशुतोष मनाने प्रचंड कणखर होता, एव्हढच कि आयुष्याचा अर्थ त्याला नव्याने उमगत होता.

रात्री ऑफिसर्स मेस मध्ये पार्टी होती. आशुतोष पोहोचताच सीओ सरांनी त्याला बोलावून खास अभिनंदन केलं. त्याचबरोबर बाकी ऑफिसर्स साठी काळजाला भिडणाऱ्या शब्दात भाषण सुद्धा दिलं. एकशे दहा कोटी भारतीयांचा विश्वास तोडण्यासाठी आपण इथे नसून त्यांचं हरप्रकारे संरक्षण करण्यासाठीच आहोत आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी प्रत्येक सैनिकांने ठेवली पाहिजे हेच ठासून सांगितलं त्यांनी. अर्थात, प्रत्येकजण त्या तयारीचा होताच.

काही दिवसातच आशुतोष तिकडे उत्तम रुळला. अनेक अशी ऑपरेशन्स झाली. सगळीकडे त्याने आपला ठसा उमटवला. नम्र स्वभाव पण तितकाच कामाबाबत तितकाच कठोर अशी त्याची ओळख बनली. लेफ्टनंट चा लवकरच कॅप्टन होणार होता तो. अनुभवी सुभेदार मेजर सिन्हा अनेक वेळा बोलून जायचे, "शेर अब बडा हो रहा है"

दिवसामागून दिवस जात होते. अश्याच एका मोठ्या ऑपरेशन नंतर सिओंनी त्याच्या हातात लेटर ठेवलं. "तुम्हारा लिये है. बाद मे खोलना, पेहले मुझे जरा मदद करो." ऑफिस मध्ये टेबलाच्या जागांची अदलाबदल चालू होती. त्या नादात त्याने लेटर ठेवून दिलं. सगळं काम झाल्यावर निवांत रूमवर जाऊन गाणी ऐकत असताना त्या लेटर बद्दल आठवला त्याला. ते काढून एनव्हलप मधून लेटर बाहेर काढलं. ते वाचत असताना त्याच्या चेहेर्यावरचे भाव झरझर बदलत गेले. वाचून झाल्यावर त्याला मोठा धक्काच बसला होता..

क्रमश:

हे ठिकाण

प्रतिक्रिया

एस's picture

3 Nov 2016 - 10:59 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

संजय पाटिल's picture

4 Nov 2016 - 10:51 am | संजय पाटिल

उत्कंठावर्धक!
वाचतोय.

अनन्त अवधुत's picture

4 Nov 2016 - 10:55 am | अनन्त अवधुत

आवडले. पुभाप्र.

बापू नारू's picture

7 Nov 2016 - 3:01 pm | बापू नारू

छान आहे लेख ,पुढचा भाग टाका लवकर

पैसा's picture

7 Nov 2016 - 3:35 pm | पैसा

जबरदस्त लिहिताय!

नाखु's picture

7 Nov 2016 - 4:10 pm | नाखु

जॉनी म्हणजे सोन्याबापू तर नव्हेत ना?

वरुण मोहिते's picture

7 Nov 2016 - 5:47 pm | वरुण मोहिते

वाचतोय

जॉनी's picture

7 Nov 2016 - 6:55 pm | जॉनी

नाही नाखु सर..
सोन्याबापूंच्या कथांपासून प्रेरित झालेला म्हणा हवं तर. :)

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2016 - 3:42 pm | स्वाती दिनेश

वाचते आहे,
पुभाप्र.
स्वाती

इशा१२३'s picture

9 Nov 2016 - 6:15 pm | इशा१२३

वाचतेय.पुभाप्र

बदामची राणी's picture

11 Nov 2016 - 7:52 pm | बदामची राणी

फारच ऊत्कन्ठावर्धक! पुभाप्र!

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 7:45 am | कैलासवासी सोन्याबापु

छान आहे हा भाग, अकादमीला कितीही रगडाई झाली तरी ती एक प्रकारे थेअरी असते, प्रॅक्टीकॅलफक्त ऑन जॉब मिळते, पहिले ऑप कायम लक्षात राहते, ऑप नंतर सिनियर्स अन अनुभवी जुनिअर्सने पाजलेली रम, अन दिलेला बडाखाना हा एक आयुष्यभर जपायचा हृद्य अनुभव असतो, पहिल्या किल नंतर ओकारी होणे अतिशय जास्त नैसर्गिक असते, कित्येकांना तर बीपी वाढणे लो होणे पॅन्ट ओली होणे वगैरे सुद्धा होते, मेडिकलची पोरे पहिल्यांदा स्कॅलपेल हाती घेताना जी परिस्थिती असते थोडीशी तशीच ही अवस्था असते, पण नंतर फुटल्या कवट्या, बाहेर आलेली इनर्डस, पिवळसर सेरेब्रल फ्लुइड वगैरे पहायची सवय लागते हे इमानदारीत सांगतो मी तरी.

जॉनी's picture

14 Nov 2016 - 3:13 pm | जॉनी

तुम्ही जे म्हणालात अगदी हेच ऐकलंय. फुटलेल्या कवट्या, सेरेब्रल फ्लूईड याची सवय होऊन जाते नंतर. बाकी पॅरा कोर्स पूर्ण केल्यावर कॉकटेल मध्ये मरून बॅरे डीप करून प्यायला लावतात त्यावेळी कसं वाटत असेल ह्याची कल्पनाच करू शकतो आम्ही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 3:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

कॉकटेल नाही श्रीमान. बेळगावला बेसिक लीडरशिप कॅम्प केल्यावर मरून बेरे खालीस शुद्ध आर्मी रम मध्ये बुडवून देतात (फक्त कडा भिजवतात) ती हाफ साईज रम असते अन ती एका चांदीच्या घंगाळ्यात ओतून त्यात कॅप बुडवतात. नंतर ऑफिसर पासिंग आउटला ते घंगाळ तोंडाला लावून घटाघट प्यावे लागते, ज्याचा नंतर तो एक मरून बेरे कमांडो म्हणवतो. अदर रेंकला क्वार्टर देतात बॉटम्स अप मारावी लागते :P

पण, तुमचं खरंय, मरून बेरे कोर्स पासआउट होणेच एक प्रचंड मोठे अचिव्हमेंट आहे ह्यात अजिबात दुमत नाही.

इरसाल कार्टं's picture

24 Nov 2016 - 12:13 pm | इरसाल कार्टं

कधी टाकताय पुढील भाग?

जॉनी's picture

25 Nov 2016 - 12:01 am | जॉनी

टाकतोच आहे. :)

रातराणी's picture

4 Dec 2016 - 1:19 pm | रातराणी

वाचतेय. पु भा प्र.