नमस्कार मंडळी,
तुम्ही आता विचार करत असाल मिशी ह्यावर काही लिहीण्याजोगे आहे का ? पण चला जाता जाता वाचु या.
“ मुछे हो तो नथ्थुलाल जैसी वरना ना हो ! ” हा डायलॊग तर सर्वांना परिचयाचा असेलच.
तर मिशी हा काही पुरूषांचा अभिमानाचा, सौंदर्याचा विषय आहे. मिशीमुळे रूबाबदार पणा वाढतो असे काहींजणांना वाटते, मिशी शिवाय पुरूषाला शोभा नाही असे ही उदगार ऐकले आहेत.
दाढीचा तसा माना शी संबध नाही जसा मिशीचा आहे, का बरे असे असेल कोणी सांगु शकेल का? काही व्यक्तीचित्र डोळ्या समोर आणल्यावर त्यांना मिशी शिवाय आपण डॊळ्या समोर आणुच शकत नाही, गावाकडे सरपंच असलेले पाटील डोळ्या समोर उभे करा काय चित्र तयार होते ,तर धोतर, फेटा, आणि पिळ मारलेली मिशी असेच ना, तसेच, शिकारी म्हंटल्यावर डोळ्या समोर चित्र येते त्याची हॆट, दोन नळ्याची बंदुक, आणि त्याची तलवार कट मिशी हो ना, मिशी शिवाय शिकारी रंगवु शकत नाही, हिटलर आणि चार्ली चॊपलीन या दोघांच्यात त्याची मिशी ही त्याच्या व्यक्तीमत्वाचा अविभाज्य भाग होती. मिशी शिवाय त्या दोघांचे ही चेहरे आपण नजरे समोर आणु शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. माझ्या पाहण्यात आलेली दोन उदाहरणे मी देत आहे.
एक महिन्या पुर्वी आम्ही बोस्टनला व्हेल वॊचिंगला गेलो होतो तेव्हा बोटी माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते त्यांचे अंदाजे वय ६५ ते ७० वर्षाच्या आसपासचे असावे असा अंदाज बांधला. त्यांना पाहिल्यावरच त्यांच्या चेह-यावरील मिशीने दाद मिळवली नाही तर नवलच, अगदी तलवार कट मिशी राखली होती त्यांनी, आणि त्या मिशीच्या प्रेमात असावेत बहुधा ते त्याच्या हातात एक छोटासा ब्रश होता तो ब्रश काही कळुन ही येत नव्हता, एखाद्या स्त्रीने हातात छोटासा रुमाल कसा धरावा तसा ते तो ब्रश बाळगुन होते, आणि दर ३/४ मि. ते त्याच्या मिशीवरून तो ब्रश फिरवीत असत, तो असा प्रकारे फिरवत की समजुन ही येत नसे, फक्त मिशीवरून हात फिरवीत आहेत असे वाटे, मिशीची दोन्ही टोके व्यवस्थीत आहेत का ते तपासुन पहात असे.
मी ही नजरेना त्यांना मिशी छान आहे अशी दाद दिली आणि त्यांनी परत मिशीवरून ब्रश फिरवतपण हसत ती स्विकारली. मला ते अजोबा काही वेगळे रसायन वाटले, कदाचित ते नेव्ही, आर्मी किंवा एअर फोर्स मध्ये चांगले अधिकारी असतील असे उगाच वाटुन गेले.
अजुन एक मजेशिर किस्सा, मी आणि माझी मैत्रीण कार पार्किंगच्या येथे आपापल्या पतीदेवांची वाट पहात थांबलो होतो, समोर एक माणुस ज्याच्या डोक्यावर एक ही केस नव्हता (टकला )तो आपला स्वत:च्या कारच्या आरशात पुन्हा पुन्हा पाहुन मिशी विंचरत होता, आम्हा दोघींना हसु आले, अरे डोक्यावर ना एक केस आणि मिशीला किती जपतो असे आमचे उदगार निघाले, आमच्या हसणाने त्याचे लक्ष आमच्याकडे गेल्यावर तो ओशाळला असावा लगेच त्याने कार काडुन तेथुन धुम ठोकली.
असेच मी माहेरी रहायला गेले होते, तेव्हा माझा भावाने ऒफिस मधुन येताना त्याची मिशी कापुन घरी आला, आणि गपचुप येऊन सोप्यावर बसला, माझ्या लेकाने त्याला पाहिले आणि येऊन आम्हाला सांगत होता मामा काय करून आला बघ, आम्हाला कळले नाही, आम्ही जाऊन भावाकडे पाहिले तर त्याने मिशी न्हाव्याला दान केली होती, आणि माझ्या लेकाला त्याची मिशी कोठे गेली हा मोठा प्रश्न पडला होता, तो घरातल्या सगळ्यांना हाताला धरून भावाजवळ घेऊन दाखवत होता, आणि स्वत: माझ्या भावा जवळ जाऊन जाऊन त्याचा चेहरा वाकुन पाहुन येत होता. माझ्या भावाला मग त्याने चार दिवस मिशी कोठे गेले ह्यावरून अनेक प्रश्न विचारून भेडसावले.
तुम्हाला ही काही किस्से माहित असल्यास जरूर आम्हाला सांगा.
वाचने
16604
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
"फक्त
शोध
In reply to "फक्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
काका,
In reply to शोध by विनायक प्रभू
देरसे आयी
In reply to काका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
आकाश
In reply to काका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
हिर्सुटीझम
In reply to काका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
किंवा
In reply to हिर्सुटीझम by विनायक प्रभू
आहे
In reply to किंवा by लिखाळ
व्यवसाय
In reply to आहे by विनायक प्रभू
फक्त
In reply to "फक्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबर
In reply to फक्त by अवलिया
कारण...
In reply to "फक्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
फक्त
In reply to कारण... by मनस्वी
"आत्याबाईल
काही निरीक्षणे
फरक स्पष्ट करोन सांगावा.
In reply to काही निरीक्षणे by मनिष
मेट्रो-सेक्स्युअल आणि रेट्रो-सेक्स्युअल
In reply to फरक स्पष्ट करोन सांगावा. by llपुण्याचे पेशवेll
मस्त
;)
In reply to मस्त by इनोबा म्हणे
दे टोला
In reply to ;) by ब्रिटिश टिंग्या
छान लेख
ही ही
मी आणि माझी मिशी...
माझा भाऊ...
In reply to मी आणि माझी मिशी... by नीलकांत
आताचा नवरा म्हणजे?
In reply to माझा भाऊ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुने मेरे
In reply to आताचा नवरा म्हणजे? by प्रियाली
मस्त,
In reply to मी आणि माझी मिशी... by नीलकांत
"तिले
In reply to मी आणि माझी मिशी... by नीलकांत
मिशिद्दल मिशितुन
मिश्किल
सहमत
In reply to मिश्किल by धनंजय
असेच म्हणतो.
In reply to सहमत by प्रियाली
असेच
In reply to मिश्किल by धनंजय
हेच म्हणतो
In reply to मिश्किल by धनंजय
एक गम्मत.
"जिनकी
मजा
पॉहरो
In reply to मजा by लिखाळ
मी आणि माझी मिशी.....
मिशी
मिशी आणि व्यक्तिमत्व....
पेठकर
In reply to मिशी आणि व्यक्तिमत्व.... by प्रभाकर पेठकर
मस्त
मस्त
छान
आम्ही मिशी
मजेशीर
लेख आवडला.
आमची तर घर
आपल्या ला
मिशी आणी अंडरलाईन
ओव्हरलाईन...
In reply to मिशी आणी अंडरलाईन by अभिजीत मोटे
मिशाळ गावकरी
छान वाटले .