"मंत्रसामर्थ्य " या लेखामुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्या सर्वांची मी क्षमा मागतो. या भावना दुखावण्यावर अधिक विचार केला. भावना का दुखावतात?
माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अॅनिमल) प्रत्येकाला तर्कबुद्धी असते. (मतिमंद अपवाद). कुतूहल असते. त्यामुळे तो निसर्गाचे निरीक्षण करतो. घटनांवर विचार करतो. त्यातून अनुभव मिळतो. त्याने अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) येतो. त्याचा उपयोग व्यावहारिक जीवनात होतो. पण देवा-धर्माचे संस्कार बालपणापासून मनावर बिंबवलेले असतात. त्यात आई-वडील, शिक्षक, समाज, प्रसारमाध्यमे इत्यादींचा सहभाग असतो. बालपणीचे संस्कार दृढ असतात. भांड्यावर ठोक-ठोकून कोरलेले नाव जसे सहजी पुसता येत नाही तसे बालमेंदूवर झालेले संस्कार पुढे सहजीं पुसले जात नाहीत. मुलगी मोठी होते. मग आपल्यावर बालपणी झाले तसे संस्कार ती आपल्या मुलांवर करते. असे पिढ्यानुपिढ्या चालते. या संस्कारांमुळे श्रद्धा निर्माण होतात. त्या मुख्यत्वेकरून देव, धर्म, आत्मा, पुनर्जन्म इ.संबंधी असतात. श्रद्धेमुळे तर्कबुद्धी ठप्प होते. जे धर्मग्रंथांत आहे, धर्मगुरू सांगतात ते सर्व खरे मानण्याची मानसिकता बनते. याचा गैरफायदा घेऊन समाजातील लबाड लोकांनी ज्योतिष, मुहूर्त, भाग्यरत्ने, ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र अशा अनेक गोष्टी निर्मून त्या देवा-धर्माशी जोडल्या. त्यामुळे श्रद्धाळू त्यांना बळी पडतात. हे विषय सोडले तर अन्य क्षेत्रांत श्रद्धाळूंची तर्कबुद्धी चांगली चालते. समजा त्यांच्या वाचनात पुढील मजकूर आला:--
"मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली की तिथे देवतत्त्वाचा संचार होतो,असा समज रूढ आहे. पण त्याचा अनुभव कधी आला आहे का? प्रचीती कधी दिसली आहे का? मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा."हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे. असे लिहिणार्याची त्यांनी कीव करायला हवी. ज्यात एकही अपशब्द, असभ्य, असंसदीय शब्दप्रयोग नाही, तसेच कुणाचे चारित्र्यहनन नाही, असे अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तेव्हा श्रद्धावंतांच्या दृष्टीने निरर्थक असलेल्या लेखनाकडे त्यांनी दुर्लक्ष करावे. मग भावना का दुखावतात? मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात. ज्या लेखातील विचार सुसंस्कृत शब्दांत मांडलेले आहेत, ज्यातील विधाने वस्तुस्थितिदर्शक म्हणजे सत्य आहेत, ज्यात चारित्र्यहननाच्या हेतूने वृथा दोषारोप केलेले नाहीत, ते लेखन आपल्याला कितीही कटु आणि अप्रिय वाटले, तरी तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे समजणे योग्य ठरेल. त्या लेखनावर टीका करावी. मात्र टीकेत लेखनशुचिता अवश्य पाळावी.
वर्गीकरण
वाचने
39899
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय याना काका वेळ जात नाहीये
जौदे हो, त्यांच्या भावना
In reply to काय याना काका वेळ जात नाहीये by स्पा
अगदी सहमत.
सहमत आहे
अवघड आहे.
डायरीया ?
काका,
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या
सहमत,
In reply to हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या by प्रसाद१९७१
लेखन पटतय पण ते ही तुमच्या
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to लेखन पटतय पण ते ही तुमच्या by कविता१९७८
असहमत
In reply to लेखन पटतय पण ते ही तुमच्या by कविता१९७८
+१
लव्हर्स लॉजिक
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अत्यंत मार्मिक विश्लेषण !
मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात.अत्यंत मार्मिक विश्लेषण ! एक तर्काला ते पटलेले असते मात्र कंडीशनींग मराठी शब्द संस्कारबद्धता ही फार खोलवर झालेली असते. हा मुळ राग आपण आजवर जोपासलेल्या श्रद्धेतला फोलपणा समजल्यातुन उदभवत असावा हे खर आहे. कॉग्नीटीव्ह डिसोनन्स् चे संशोधन ही या संदर्भात बघणे उपयुक्त आहे. यातील बहुतांशी विरोध साधारण असा असतो. काही वेळा अत्यंत नकारात्मक पातळीवर भाषा शब्द संबोधन करुन होते ,त्यानंतर जोरदार तर्काच्या बाजुने मोठा प्रयत्न, तो वाया गेल्यावर मग एक वेगळीच भुमिका असते तो म्हणजे एक प्रकारची आम्ही काय बाबा अशेच त्यात एक छानसा तुच्छतावाद असतो. प्रत्येकवेळी तो तर्क मानेलच असे नाही. काही वेळा संभाव्य तर्काच्या भीतीने ही प्रतिरोध होतो. एक अत्यंत अभ्यासनीय प्रतिसाद श्री. मांत्रिक यांचा प्रातिनीधीक स्वरुपाचा असा आहे. ज्ञानेश्वरांचे एकूण साहित्य पाहता व त्यांचे एकूण व्यक्तीमत्व अभ्यासता माऊली जातभेद व लिंगभेद या गोष्टींचा पुरस्कार करत असतील असे मला तर मुळीच वाटत नाही. तर्क काहीच नाही मला वाटते मला वाटत नाही इतकचं पुरेसं आहे, एक महत्वाचा दोष म्हणजे आर्बीट्ररीली सगळ विधान असतं हम कहे सो सच हम कहे सो कायदा किंवा बाबा कहे सो सच बाबा कहे सो कायदा. थोडी लव्हर्स लॉजिक ची अपेक्षा असते. दुसरी शैली म्हणजे तुमची लायकी नाही (अॅड होमीनेम ) तिसरी भुमिका म्हणजे माझी लायकी नाही ( एक गंमत आहे समजा माझी मुल्यमापनाची लायकीच नाही क्ष या व्यक्तीची यात उघडपणे एक बाजु घेतलेली आहे की क्ष व्यक्ती इतकी पुज्यनीय आहे की मला त्याचे मुल्यमापनही करणे शक्य नाही. यावर साधा प्रतिवाद म्हणजे जर मुल्यमापन करण्याची लायकीच नाही मुळात तर या निर्षणावर कसे आलात ? की क्ष व्यक्ती योग्य च आहे. हे येणं वरील सारखं मला वाटत मला वाटत नाही बस. आपण काटछाट किंवा फेरबदल करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करुन माऊलींना खरंच कोणता अर्थ अमिप्रेत आहे हे माझ्याप्रमाणे पाहिले पाहिजे. हे अत्यंत रोचक वाक्य आहे. आपण माझ्यासारख पाहीलं पाहीजे यातला आवेश बघा. तुम्ही अभ्यास करा काय वाटेल ते करा जेव्हा निष्कर्ष जो येइल तो माझ्या मनासारखाच आला पाहीजेच . पुरावे विरोधात असतील तर असुदेत तर्क विरोधात असेल तर असु देत अॅट द एन्ड ऑफ डे माझ्याप्रमाणे पाहील पाहीजे. बरे काही आक्षेपार्ह दिसले तरी ते प्रक्षिप्त असू शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अशा गोष्टीकडे खरा साधक तरी दुर्लक्षच करेल. ही पुढील संभाव्य आक्षेपार्ह आढळण्याच्या भीतीचा बंदोबस्त बघा प्रक्षिप्त तपासा किंवा प्रक्षिप्त आहे की नाही याची छानणी तपासणी करा असे नाही. काही आक्षेपार्ह दिसले तर ते प्रक्षिप्त असु शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे ही जाणीव ह्वीच ही जाणीव नसेल तर तुम्ही कदाचित आक्षेपार्ह भागाला सत्य पुराव्याच्या आधारे जाहीर करणार. समजा प्रक्षिप्त नसले तरी त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. आता त्याच्या पुढील तरतुद हे बघा क्रमाने पुढे काय वाढुन ठेवलय याच्या भीतीने व्याकुळतेतुन समजा प्रक्षिप्त तुम्ही आणलचं शोधुन तर माझे मन कशी पळवाट शोधेल त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. त्याला माऊलींचा पाठिंबा आहे असा अर्थ होत नाही. त्याला माऊलीने पाठिंबा दिला नाही ते नाही अर्थ असा होत नाही. आता पाहू बाकीचे सदस्य काय मत व्यक्त करतात. मी एकटा तरी किती बोलू? हे विधान स्वयं स्पष्ट आहे. वरील प्रतिसाद प्रातिनीधीक आहे. हे सर्व अस आहे. यावर उपाय काय ? मार्ग काय ? तर आपले विधान आपले तत्व अधिकाधिक तर्काने संयमाने मांडण्याचा प्रयत्न करत राहणे हा तर आहेच. मात्र दाभोळकर व स्टीफन कोव्ही जसे सांगतात तसा एथोज पॅथोज नंतर लोगोज असा क्रम असतो तो नेहमी लक्षात ठेवणे. स्वतःची मते चुकीची असतील तर ती सदैव बदलण्यास तयार असणे, अन्वेषण सतत सुरु ठेवणे, जमेल तितके आपण इतरांकडुन काही चांगले घेण्यासारखे असेल ते घेत राहणे. आवश्यक तेथे थांबणे आवश्यक तेथे भावनांवर संयम ठेवणे आवश्यक तेथे तर्काने आवश्यक तेथे संवेदनशीलतेने वागणे. अतिरेक टाळणे, टोकाची भुमिका घेण्याऐवजी सामंजस्याची भुमिका घेणे असे सर्व आहे. जसे दाभोळकर करत होते ती शैली सुंदर होती तीच योग्य आहे. त्या शैली ला आपण अधिकाधिक सकारात्मक दिशेने विकसीत करत नेले पाहीजे. अजुन दुसर काय करु शकतो आपण या शिवाय ? असच काहीस आपण करु शकतो.(No subject)
In reply to अत्यंत मार्मिक विश्लेषण ! by मारवा
खिक्क! काय सणसणीत चपराक
In reply to (No subject) by स्पा
देवतत्व
तुम्ही मंत्रसामर्थ्य या
भावसाहेब,,,
In reply to तुम्ही मंत्रसामर्थ्य या by राजेश कुलकर्णी
हो
In reply to भावसाहेब,,, by संदीप डांगे
तुम्ही मुसलमान आहात?
In reply to हो by वामन देशमुख
कसं आहे
बोकोबांशी पूर्ण सहमत.
In reply to कसं आहे by बोका-ए-आझम
बोकोबांशी अगदी सहमत!
In reply to बोकोबांशी पूर्ण सहमत. by बॅटमॅन
काही प्रश्न आहेत . इच्छा असेल
कडक प्रतिसाद. टाळ्या.
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
मस्तच रे उका.!!!
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
कोणाचेही सदस्यनाम हीच मुळात
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
चला, टाईमपास करू.
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
१) नाही. तुमच्या?
In reply to चला, टाईमपास करू. by भृशुंडी
अगदी मार्मिक उ.का. साहेब.
In reply to १) नाही. तुमच्या? by उगा काहितरीच
१) विषय भावना दुखावण्याचा आहे
In reply to १) नाही. तुमच्या? by उगा काहितरीच
१) विषय भावना दुखावण्याचा आहे
In reply to १) विषय भावना दुखावण्याचा आहे by भृशुंडी
काळजी घ्या मालक, केस गळायला लागलेत तुमचे.
In reply to १) विषय भावना दुखावण्याचा आहे by उगा काहितरीच
धन्यवाद ! मंडळ आभारी आहे.
In reply to काळजी घ्या मालक, केस गळायला लागलेत तुमचे. by भृशुंडी
@उगाकाहीतरी, राष्ट्रध्वजाबद्दल तुमच्या भावना सांगा आता,
In reply to १) नाही. तुमच्या? by उगा काहितरीच
सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी
In reply to @उगाकाहीतरी, राष्ट्रध्वजाबद्दल तुमच्या भावना सांगा आता, by पगला गजोधर
कठोर तर्ककर्कश अश्रद्ध
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
म्हणजे मी "कठोर तर्ककर्कश
In reply to कठोर तर्ककर्कश अश्रद्ध by प्रकाश घाटपांडे
सहमत
In reply to म्हणजे मी "कठोर तर्ककर्कश by सतिश गावडे
असहमत!
In reply to सहमत by यनावाला
I am not saying Faith is
In reply to सहमत by यनावाला
तुम्हाला अपेक्षित
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
माझा सवाल
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
.
In reply to माझा सवाल by चौकटराजा
आमचा अर्थ
In reply to . by कवितानागेश
ह्या पक्षाची नोंदणी झालीय का.
In reply to आमचा अर्थ by चौकटराजा
जगात देव आहे
प्रयत्नात*
In reply to जगात देव आहे by सुज्ञ
अट्टल व सराईत सश्रद्ध आणि
मी पण नास्तिक
प्रश्नाला चांगले हाताळलेत.
In reply to मी पण नास्तिक by भंकस बाबा
सुंदर उपक्रम आणि विचार.
In reply to मी पण नास्तिक by भंकस बाबा
मस्त !!!
In reply to मी पण नास्तिक by भंकस बाबा
मला एक समजत नाही
अगदी बरोबर
In reply to मला एक समजत नाही by रमेश भिडे
५० % बरोबर
भंकस बाबा ह्यांनी केलेले
@रमेश
प्रक्षोभाचे प्रत्यंतर
ह्या विषयावर स्वतंत्र लेख
In reply to प्रक्षोभाचे प्रत्यंतर by यनावाला
+१
In reply to ह्या विषयावर स्वतंत्र लेख by प्रचेतस
यनावालासर,
In reply to प्रक्षोभाचे प्रत्यंतर by यनावाला
शिक्षणाने नास्तिकपणा येतोच
In reply to यनावालासर, by संदीप डांगे
प्रचेतसजी,
In reply to शिक्षणाने नास्तिकपणा येतोच by प्रचेतस
उत्तर तसं पाहिलं तर सोपं आहे.
In reply to प्रचेतसजी, by संदीप डांगे
व्यक्ती तितक्या प्रकृती
In reply to उत्तर तसं पाहिलं तर सोपं आहे. by प्रचेतस
अगदी ठामपणे तीन स्रोत
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती by संदीप डांगे
मला जरा समजले नाही आपले विधान
In reply to अगदी ठामपणे तीन स्रोत by चौकटराजा