भावना दुखावणे
"मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली की तिथे देवतत्त्वाचा संचार होतो,असा समज रूढ आहे. पण त्याचा अनुभव कधी आला आहे का? प्रचीती कधी दिसली आहे का? मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा."हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे. असे लिहिणार्याची त्यांनी कीव करायला हवी. ज्यात एकही अपशब्द, असभ्य, असंसदीय शब्दप्रयोग नाही, तसेच कुणाचे चारित्र्यहनन नाही, असे अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तेव्हा श्रद्धावंतांच्या दृष्टीने निरर्थक असलेल्या लेखनाकडे त्यांनी दुर्लक्ष करावे. मग भावना का दुखावतात? मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात. ज्या लेखातील विचार सुसंस्कृत शब्दांत मांडलेले आहेत, ज्यातील विधाने वस्तुस्थितिदर्शक म्हणजे सत्य आहेत, ज्यात चारित्र्यहननाच्या हेतूने वृथा दोषारोप केलेले नाहीत, ते लेखन आपल्याला कितीही कटु आणि अप्रिय वाटले, तरी तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे समजणे योग्य ठरेल. त्या लेखनावर टीका करावी. मात्र टीकेत लेखनशुचिता अवश्य पाळावी.
In reply to काय याना काका वेळ जात नाहीये by स्पा
माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अॅनिमल)याविषयी मात्र मतेमतांतरे नक्कीच आहेत. इज मॅन रिअली अ रॅशनल अॅनिमल यावर डॅनिएल कॅनेमान आणि रिचर्ड ट्रॅव्हस्की यांनी केलेल्या प्रयोगांविषयी वेळ मिळेल तेव्हा एक लेख मिपावर जरूर लिहायचा आहे.
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे.हा प्रश्न चुकीचा आआण, उद्धट आहे आणि अतिशहाणपणाचा आहे. हे बघा १. सत्यता "सुबुद्ध" व्यक्तीला पटावी - म्हणजे वाचणार्याला ती पटली नाही तर तो निर्बुद्ध किंवा कुबुद्धी. वा रे वा!!! २. दुसरे म्हणजे, कोणी कोणा बद्दल लिहावे च का? कोणी माणुस आपल्या घरात दार-खिडक्या बंद करुन नागडा बसेल, तू ( इथे तू म्हणजे यना वाला नाहीत तर हे दिडशहाणे लोक ) कोण सांगणार त्याला की कपडे घाल म्हणुन. यनावाला - आधी हे स्वताला मी हत्ती वर बसलोय आणि बाकी मूर्ख लोक अनवाणी फिरतायत हे हे समजणे सोडा. तुम्हाला ती लोक अनवाणी फिरतायत असे वाटते पण त्यांना तुम्ही हत्ती वर नाही तर गाढवावर बसला आहात ( आणि ते पण उलटे ) असे वाटतय.
In reply to हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या by प्रसाद१९७१
In reply to लेखन पटतय पण ते ही तुमच्या by कविता१९७८
In reply to लेखन पटतय पण ते ही तुमच्या by कविता१९७८
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात.
अत्यंत मार्मिक विश्लेषण !
एक तर्काला ते पटलेले असते मात्र कंडीशनींग मराठी शब्द संस्कारबद्धता ही फार खोलवर झालेली असते. हा मुळ राग आपण आजवर जोपासलेल्या श्रद्धेतला फोलपणा समजल्यातुन उदभवत असावा हे खर आहे. कॉग्नीटीव्ह डिसोनन्स् चे संशोधन ही या संदर्भात बघणे उपयुक्त आहे.
यातील बहुतांशी विरोध साधारण असा असतो.
काही वेळा अत्यंत नकारात्मक पातळीवर भाषा शब्द संबोधन करुन होते ,त्यानंतर जोरदार तर्काच्या बाजुने मोठा प्रयत्न, तो वाया गेल्यावर मग एक वेगळीच भुमिका असते तो म्हणजे एक प्रकारची आम्ही काय बाबा अशेच त्यात एक छानसा तुच्छतावाद असतो. प्रत्येकवेळी तो तर्क मानेलच असे नाही. काही वेळा संभाव्य तर्काच्या भीतीने ही प्रतिरोध होतो.
एक अत्यंत अभ्यासनीय प्रतिसाद श्री. मांत्रिक यांचा प्रातिनीधीक स्वरुपाचा असा आहे.
हो, काही ठिकाणी आध्यात्मिक अर्थ सरळसरळ दृग्गोचर होतो. काही ठिकाणी व्यावहारिक दृष्टांत असू शकतात, असतीलच असे नाही. कारण मुळात ज्ञा.कालीन मराठीचा अर्थ चटकन लक्षात येत नाही. ज्ञानेश्वरांचे एकूण साहित्य पाहता व त्यांचे एकूण व्यक्तीमत्व अभ्यासता माऊली जातभेद व लिंगभेद या गोष्टींचा पुरस्कार करत असतील असे मला तर मुळीच वाटत नाही. आपण काटछाट किंवा फेरबदल करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करुन माऊलींना खरंच कोणता अर्थ अमिप्रेत आहे हे माझ्याप्रमाणे पाहिले पाहिजे. तशी दृष्टी ठेवली तर माऊलींच्या साहित्याचा खरा गहन आध्यात्मिक अर्थ समोर येईल व आपणांस एक नवीनच आनंद प्राप्त होईल. बरे काही आक्षेपार्ह दिसले तरी ते प्रक्षिप्त असू शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अशा गोष्टीकडे खरा साधक तरी दुर्लक्षच करेल. समजा प्रक्षिप्त नसले तरी त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. त्याला माऊलींचा पाठिंबा आहे असा अर्थ होत नाही. आता पाहू बाकीचे सदस्य काय मत व्यक्त करतात. मी एकटा तरी किती बोलू?ज्ञानेश्वरांचे एकूण साहित्य पाहता व त्यांचे एकूण व्यक्तीमत्व अभ्यासता माऊली जातभेद व लिंगभेद या गोष्टींचा पुरस्कार करत असतील असे मला तर मुळीच वाटत नाही. तर्क काहीच नाही मला वाटते मला वाटत नाही इतकचं पुरेसं आहे, एक महत्वाचा दोष म्हणजे आर्बीट्ररीली सगळ विधान असतं हम कहे सो सच हम कहे सो कायदा किंवा बाबा कहे सो सच बाबा कहे सो कायदा. थोडी लव्हर्स लॉजिक ची अपेक्षा असते. दुसरी शैली म्हणजे तुमची लायकी नाही (अॅड होमीनेम ) तिसरी भुमिका म्हणजे माझी लायकी नाही ( एक गंमत आहे समजा माझी मुल्यमापनाची लायकीच नाही क्ष या व्यक्तीची यात उघडपणे एक बाजु घेतलेली आहे की क्ष व्यक्ती इतकी पुज्यनीय आहे की मला त्याचे मुल्यमापनही करणे शक्य नाही. यावर साधा प्रतिवाद म्हणजे जर मुल्यमापन करण्याची लायकीच नाही मुळात तर या निर्षणावर कसे आलात ? की क्ष व्यक्ती योग्य च आहे. हे येणं वरील सारखं मला वाटत मला वाटत नाही बस. आपण काटछाट किंवा फेरबदल करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करुन माऊलींना खरंच कोणता अर्थ अमिप्रेत आहे हे माझ्याप्रमाणे पाहिले पाहिजे. हे अत्यंत रोचक वाक्य आहे. आपण माझ्यासारख पाहीलं पाहीजे यातला आवेश बघा. तुम्ही अभ्यास करा काय वाटेल ते करा जेव्हा निष्कर्ष जो येइल तो माझ्या मनासारखाच आला पाहीजेच . पुरावे विरोधात असतील तर असुदेत तर्क विरोधात असेल तर असु देत अॅट द एन्ड ऑफ डे माझ्याप्रमाणे पाहील पाहीजे. बरे काही आक्षेपार्ह दिसले तरी ते प्रक्षिप्त असू शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अशा गोष्टीकडे खरा साधक तरी दुर्लक्षच करेल. ही पुढील संभाव्य आक्षेपार्ह आढळण्याच्या भीतीचा बंदोबस्त बघा प्रक्षिप्त तपासा किंवा प्रक्षिप्त आहे की नाही याची छानणी तपासणी करा असे नाही. काही आक्षेपार्ह दिसले तर ते प्रक्षिप्त असु शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे ही जाणीव ह्वीच ही जाणीव नसेल तर तुम्ही कदाचित आक्षेपार्ह भागाला सत्य पुराव्याच्या आधारे जाहीर करणार. समजा प्रक्षिप्त नसले तरी त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. आता त्याच्या पुढील तरतुद हे बघा क्रमाने पुढे काय वाढुन ठेवलय याच्या भीतीने व्याकुळतेतुन समजा प्रक्षिप्त तुम्ही आणलचं शोधुन तर माझे मन कशी पळवाट शोधेल त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. त्याला माऊलींचा पाठिंबा आहे असा अर्थ होत नाही. त्याला माऊलीने पाठिंबा दिला नाही ते नाही अर्थ असा होत नाही. आता पाहू बाकीचे सदस्य काय मत व्यक्त करतात. मी एकटा तरी किती बोलू? हे विधान स्वयं स्पष्ट आहे. वरील प्रतिसाद प्रातिनीधीक आहे. हे सर्व अस आहे. यावर उपाय काय ? मार्ग काय ? तर आपले विधान आपले तत्व अधिकाधिक तर्काने संयमाने मांडण्याचा प्रयत्न करत राहणे हा तर आहेच. मात्र दाभोळकर व स्टीफन कोव्ही जसे सांगतात तसा एथोज पॅथोज नंतर लोगोज असा क्रम असतो तो नेहमी लक्षात ठेवणे. स्वतःची मते चुकीची असतील तर ती सदैव बदलण्यास तयार असणे, अन्वेषण सतत सुरु ठेवणे, जमेल तितके आपण इतरांकडुन काही चांगले घेण्यासारखे असेल ते घेत राहणे. आवश्यक तेथे थांबणे आवश्यक तेथे भावनांवर संयम ठेवणे आवश्यक तेथे तर्काने आवश्यक तेथे संवेदनशीलतेने वागणे. अतिरेक टाळणे, टोकाची भुमिका घेण्याऐवजी सामंजस्याची भुमिका घेणे असे सर्व आहे. जसे दाभोळकर करत होते ती शैली सुंदर होती तीच योग्य आहे. त्या शैली ला आपण अधिकाधिक सकारात्मक दिशेने विकसीत करत नेले पाहीजे. अजुन दुसर काय करु शकतो आपण या शिवाय ? असच काहीस आपण करु शकतो.
In reply to अत्यंत मार्मिक विश्लेषण ! by मारवा

In reply to (No subject) by स्पा
In reply to तुम्ही मंत्रसामर्थ्य या by राजेश कुलकर्णी
In reply to भावसाहेब,,, by संदीप डांगे
२. देव माना नाहीतर तुमच्या माना मुरगाळतो असे कुणी तुम्हाला म्हटले काय?हो, इस्लाम असेच म्हणतो.
In reply to हो by वामन देशमुख
In reply to कसं आहे by बोका-ए-आझम
In reply to बोकोबांशी पूर्ण सहमत. by बॅटमॅन
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
In reply to चला, टाईमपास करू. by भृशुंडी
१) नाही. तुमच्या?बिलकुल दुखावणार , कारण आम्ही आमच्या वडिलांचा, आजोबांचा आदर करतो. रच्याकने तुम्ही स्वतः हा प्रयोग तुमच्या वडिलांसमोर केला तर तुमच्या वडिलांना तुमच्याबद्दल अभिमान वाटेल , नाही ?
२) काहीच नाहीज्या व्यक्तीला भारतीय झेंड्याप्रती आदरच नाही. त्या व्यक्तीने भारतात राहूच नये असे प्रामाणिकपणे वाटते .
राष्ट्रीय पक्षी मोराबद्दल तुमची काय भावना आहे?प्रेमाची भावना आहे.
In reply to १) नाही. तुमच्या? by उगा काहितरीच
In reply to १) नाही. तुमच्या? by उगा काहितरीच
In reply to १) विषय भावना दुखावण्याचा आहे by भृशुंडी
१) विषय भावना दुखावण्याचा आहे, आदर /अनादराचा नाही.माझ्या मते "आदर" ही पण एक "भावनाच" आहे.
२) भारताच्या झेंड्याबद्दल आदर असणे ही भारतीय असण्याची पूर्व अट आहे हे सांगितलंत ते बरं केलंत.बघा मिपावर आल्याचा फायदा झाला तुम्हाला ! (मनातल्या मनात लाजलो बुवा. )
बरं, झेंड्याचा आदर असणे/नसणे ह्याचा भावनांशी काय संबंध?मला असे म्हणायचे होते की सामान्य लोकांना झेंडा या 'प्रतिकाबद्दल' आदर असू शकतो तर 'मुर्ती' बद्दल थोडा आदर असेल तर पोट का दुखावे ? असो ! मलाच माझ्या "भावना" पोचवता आल्या नाहीत बहुतेक .
३) मग मोराला जर कुणी शिव्या घातल्या तर तुमच्या भावना दुखावतील का? नाही ! बट तुम्ही जर मोराला मारत असतील तर मात्र माझ्या भावना दुखतील.
In reply to १) विषय भावना दुखावण्याचा आहे by उगा काहितरीच
In reply to काळजी घ्या मालक, केस गळायला लागलेत तुमचे. by भृशुंडी
In reply to १) नाही. तुमच्या? by उगा काहितरीच

In reply to @उगाकाहीतरी, राष्ट्रध्वजाबद्दल तुमच्या भावना सांगा आता, by पगला गजोधर
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
In reply to कठोर तर्ककर्कश अश्रद्ध by प्रकाश घाटपांडे
In reply to म्हणजे मी "कठोर तर्ककर्कश by सतिश गावडे
अर्थात मी "अंधश्रद्धा" हा शब्दच चुकीचा समजतो. श्रद्धा असते किंवा नसते. डोळस श्रद्धा आणि अंध श्रद्धा असे काही नसते.श्री. सतीश गावडे यांच्याशी सहमत. "अंधश्रद्धा" म्हणणे ही द्विरुक्ती आहे. श्रद्धा अंधच असते. म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत भेद (फरक)कोणता ? तर पहिल्या शब्दापेक्षा दुसर्या शब्दात अधिक अक्षरे आहेत एवढाच !हे झाले तत्त्वतः. पण व्यवहारात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत भेद करता येईल.
In reply to सहमत by यनावाला
In reply to सहमत by यनावाला
but they are different In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
In reply to काही प्रश्न आहेत . इच्छा असेल by उगा काहितरीच
In reply to माझा सवाल by चौकटराजा
In reply to . by कवितानागेश
In reply to आमचा अर्थ by चौकटराजा
In reply to जगात देव आहे by सुज्ञ
In reply to मी पण नास्तिक by भंकस बाबा
In reply to मी पण नास्तिक by भंकस बाबा
In reply to मी पण नास्तिक by भंकस बाबा
In reply to मला एक समजत नाही by रमेश भिडे
In reply to प्रक्षोभाचे प्रत्यंतर by यनावाला
In reply to ह्या विषयावर स्वतंत्र लेख by प्रचेतस
In reply to प्रक्षोभाचे प्रत्यंतर by यनावाला
In reply to यनावालासर, by संदीप डांगे
In reply to शिक्षणाने नास्तिकपणा येतोच by प्रचेतस
In reply to प्रचेतसजी, by संदीप डांगे
In reply to उत्तर तसं पाहिलं तर सोपं आहे. by प्रचेतस
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती by संदीप डांगे
In reply to अगदी ठामपणे तीन स्रोत by चौकटराजा
In reply to प्रक्षोभाचे प्रत्यंतर by यनावाला
In reply to शान्तिप्रिय (?) अल्प(? by रमेश भिडे
In reply to शान्तिप्रिय (?) अल्प(? by रमेश भिडे
In reply to होय ते मागास आहेत. by भंकस बाबा
बाय द वे तुमचा कुराण, हदीस ,बाइबल यावरचा अभ्यास बराच दांडगा वाटतो. एक नविन धागा टाकून चर्चेला तोंड फोड़ा ना .वा! बिनतोड . धन्यवाद !
In reply to बिंदुगामी प्रतिसाद by यनावाला
In reply to प्रक्षोभाचे प्रत्यंतर by यनावाला
In reply to काय विचार करावा कळेनासं झालं by असंका
In reply to श्रद्धावंत माणसाला सरसकट, by संदीप डांगे
सभ्यता, सुसंस्कृतता ही भाषेत नसून भावनेत असतेबव्हंशी सहमत.
In reply to बव्हंशी सहमत by वामन देशमुख
In reply to संदीप डांगे साहेब by नितीनचंद्र
प्रत्येकाचा एक पिंड असतो, जो तो जन्मत:च घेऊन येतो.जर माझं संदीपच्या त्या प्रतिसादाचे आकलन योग्य असेल तर संदीपचा रोख पुनर्जन्माच्या सिध्दांताकडे नसून Genetic Predisposition कडे आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा जनुकांच्या स्वरुपात काही स्वभाव विशेष घेऊन जन्माला घेऊन येतो. उदा. कुणी जन्मतःच तापट स्वभावाचा असतो तर कुणी अंतर्मुख. हे स्वभाव विशेष एका पीढीकडून दुसर्या पीढीकडे जनुकांच्या स्वरुपात पुढे सरकत राहतात. अर्थात त्यातही काही वेळा एखाद्या पीढीतील एखाद्या अपत्यामध्ये हे स्वभाव विशेष कधी दबले जातात तर कधी प्रकर्षाने मूर्त रुप धारण करतात.
In reply to प्रत्येकाचा एक पिंड असतो, जो by सतिश गावडे
अर्थात त्यातही काही वेळा एखाद्या पीढीतील एखाद्या अपत्यामध्ये हे स्वभाव विशेष कधी दबले जातात तर कधी प्रकर्षाने मूर्त रुप धारण करतात.सहमत. Mendel's laws of inheritance हेच सांगतो.
In reply to ओ धागावाले, तुम्ही पण टू द by संदीप डांगे
In reply to @संदीप , डांगेचे by भंकस बाबा
संदीप जी तुम्ही तेच ना जे दुसऱ्या धाग्यावर मुस्लिमाचा कैवार घेत होते.मी कधीच मुस्लिमांचा कैवार घेत नाही. मुस्लिमांना जानीदुष्मन समजणारे मी तसं करतो असं समजतात. उदा: "भाजपविरोधी बोलणे म्हणजे देशद्रोही/पाकिस्तानप्रेमी असणे"
एक तर तुम्ही गोंधळात आहत अथवा माझे डोके चालेनासे झाले आहे.पहिला क्लॉज चुकीचा आहे, दुसर्या क्लॉजबद्दल मी काही सांगू शकत नाही.
श्रद्धा ह्या फ़क्त हिंदुच्या असतात काय?हा प्रश्न मला विचारण्याचा हेतू काय? नाही खरंच मला प्रश्नच समजला नाही. म्हणजे तुम्ही नेमकं कोण्या बाजूने बोलत आहात. श्रद्धावंतांच्या की बुद्धीवाद्यांच्या? कारण सद्यस्थितीत ह्या धाग्यावर हिंदू-मुस्लिम असं काही नाही आणि मी तरी श्रद्धावंतांच्या बाजूने मत मांडत आहे आतापर्यंत.
तुमच्या मागे दिलेल्या प्रतिसादानुसार मुस्लिम दंगे घडवत नाहीत तर काही बाहरी शक्ति ते त्यांच्याकडून ते करुन घेतात.वाक्यांचा विपर्यास करुन स्वतःला हवे ते समजुन घेऊन एखाद्याबद्दल प्रतिमा तयार केली तर काय होते याचे हे विधान मूर्तिमंत उदाहरण आहे. मी कुठेही असं म्हटलेलं नाही की 'मुस्लिम दंगे घडवत नाहीत'. हां, हे म्हटलं असेल की राजकारणी मतांचे धृवीकरण करण्यासाठी दंग्यांचे आयोजन करतात. पुढचं विधान 'बाहरी शक्ति' हे फक्त आयसिस, अलकायदाला असलेल्या अमेरिकन पाठिंब्याबद्दल आहे. उणेपुरे तीस हजार आयसिसवाले आतंकवादी मारायला ७+ देशांना १३+ महिने झाले तरी जमत नाहीये. असं का होते याचं उत्तर शोधा. हा ह्या चर्चेचा धागा नाही. त्यामुळे इथे यापेक्षा जास्त लिहिणार नाही. कृपया माझी 'मुस्लिमप्रेमी' अशी काही प्रतिमा बनवून घेऊ नये. डोके चकरावणार्या बर्याच भूमिका मी घेऊ शकतो. इथे मिसळपाववर कोणी मुस्लिम इस्लामची भलामण करणारा धागा टाकत नाही म्हणून... अन्यथा तेही दिसले असते.
In reply to श्रद्धा या फ़क्त हिंदुच्या असतात काय? by भंकस बाबा
In reply to नेहमीप्रमाणेच चुकीच्या by कवितानागेश
बाबारे, तू ज्या गोष्टीवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहेस त्याविषयाच्या तुझ्या मूळ संकल्पनाच चुकीच्या आहेत. तुमचं मुसळ केरात जात नाहि आहे, तुम्ही केर-कचराच मुसळात घेतलाय कुटायला.असं आम्हि आमच्या सरांना समजावुन सांगण्याचा खुप प्रयत्न केला... पण त्यांच्या पचनी पडलं नाहि. तसच अपचन झालय इथे पण. असो.
In reply to . by कवितानागेश
In reply to मला वाटते तुमची भावना बरीच by विवेकपटाईत
In reply to काही विदा आहे का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा.
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे.प्राणप्रतिष्ठा, मुर्तीपूजा वगैरे एक विशिष्ट प्रकारची साधना आहे (ति कशी हा वेगळा विषय आहे). प्राणप्रतिष्ठा करुन एखादा रोबोट निर्माण करावा व त्याने आपल्या मालमत्तेचं रक्षण करावं अशी कुठलिही प्रोव्हिजन त्यात नाहि. रेडीओसंचात बॅटरी घालुन आकाषवाणी केंद्राशी ट्युन करतात. आता त्या रेडीओची प्लॅस्टीकची केस बदलुन चामड्याची घातली, किंवा तो रेडीओसंच चोरीला गेला, तुटला तर आकाषवाणी केंद्राने आपलं "सामर्थ्य" दाखवावं असा 'वैज्ञानीक' दावा कोणि करत नाहि. आपण जे आर्ग्युमेण्ट करत आहोत त्यातल्या प्रमेयांची किमान वैधता तपासुन बघणे इतकंहि करु नये 'विज्ञानवाद्यां'नी ? आपले समज चुकीचे नाहितच या वैज्ञानीक अंधश्रद्धेच्या निर्मुलनाकरता कुणी आनेवाले है क्या दुनीयामे ??
In reply to 'विज्ञानवादी' 'अंध'श्रद्धेचं उत्कृष्ट उदाहरण !!! by अर्धवटराव
In reply to हमें आपके रेडियो के गाने बहुत by pacificready
In reply to 'विज्ञानवादी' 'अंध'श्रद्धेचं उत्कृष्ट उदाहरण !!! by अर्धवटराव
काय याना काका वेळ जात नाहीये