दिवाळी अंक मुखपृष्ठ

अभ्या.. दिवाळी अंक
cover_2(1)
वर्गीकरण
दिवाळी अंक वर्ष

61 टिप्पण्या 56,537 दृश्ये

Comments

गवि नवीन

वा.कल्पक मुखपृष्ठ. अभ्या, भरपूर श्रमलास अापल्या अंकासाठी. अनेक वर्षं हे सातत्य दिसलंय. कौतुकास्पद..

माम्लेदारचा पन्खा नवीन

सगळी मेहनत फळाला आलेली आहे... बहोत खूब...!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

अभ्या, मिपा दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आवडलं. भुपाळी ते लावणी असा लोकसंस्कृतीचा ठेवा मुखपृष्ठावर अलगद उमटला आहे. खाली कोपर्‍यात प्रकाशमान झालेला एका स्त्रीच्या हातातील दिवा दिवाळीची जाणीव करुन देतो. खुपच सुरेख. हं आता अस्पष्ट प्रतिमा अजून स्पष्ट करता आल्या असत्या तर मुखपृष्ठ अजून खुलले असते असेही कोणाला वाटेल पण मला हे आवडलं. खाली लिहिलेल्या चार ओळी तितक्याच सुंदर. कलाकार नुसता कलाकार असून चालत नाही तर त्याला नाविन्यतेचाही ध्यास असला पाहिजे, काही सर्जनशीलता असली पाहिजे असं माझं मत आहे, अन तुझ्या कारागिरीतून ते नेहमीच दिसलं आहे. अभिनंदन आभार आणि शुभेच्छा. -दिलीप बिरुटे (अभ्याच्या कारागिरीचा फ्यान)

सतिश गावडे नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही बरंच काही म्हणायचं होतं मुखपृष्ठाबद्दल. मात्र इतक्या छान शब्दात ते मांडता आलं नसतं. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा आणि मिपावरील विविध उपक्रमासाठी सोबत दिवाळी अंकासाठी आम्ही तुम्हाला खुप राबवून घेतो. अभ्या लेका फुटर कधी देणार, हीडर कधी देणार, कव्हर कधी देणार, दिवाळीची आपली व्यक्तिगत अन्य कामं दिवस रात्र चालु असतांनाही मिपासाठीचं आपलं जे योगदान असतं सालं त्याला तोड नाही. असो. मी केलेलं कौतुकही तुम्हाला सहन होत नाही म्हणुन थांबतो. :) -दिलीप बिरुटे

आतिवास नवीन

मस्त आहे. तुमच्या बोटात जादू आहे खरी. ती बहरत राहो ही शुभेच्छा.

सस्नेह नवीन

तुझी चित्रे ट्रॅडिशनलपेक्षा वेगळी असतात. कलाकारांच्या प्रतिमा आणखी स्पष्ट किंवा वेगळ्या रंगात हव्या असे वाटते.

यशोधरा नवीन

In reply to by सस्नेह

प्रतिमा स्पष्ट केल्यास एकूणच परिणाम साधला जाणार नाही आणि एक प्रकारचा बटबटीतपणा जाणवेल, जे आहे तेच उत्तम आहे, आणि कलात्मक आहे.

चौकटराजा नवीन

In reply to by यशोधरा

कैक वेळी फोटो जसा असतो तसा तंतोतंत पणा आणला तर त्यालाच अनावश्यक महत्व प्राप्त होते अशा वेळॆस हाफ़्टोन सारखे तंत्र वापरून एक पार्श्वभूमीवर टाकून महत्वाचे फोर ग्राउण्डला घ्यावे लागते.

मुक्त विहारि नवीन

भुपाळी ते लावणी, सगळेच प्रिय. भूपाळी ऐकता ऐकता पा़.कृ.तील पदार्थ होतात आणि काथ्याकूट आणि जनातले मनातले वाचता वाचता दिवस कधी संपतो, ते पण समजत नाही. मिपाकरां बरोबर, "तुझी घागर नळाला लाव" अशा लावण्यांचा आस्वाद, आपल्या आपल्या आवडत्या पेयासमवेत, घेता घेता, कट्टे साजरे होतात मस्त मूखपृष्ठ. (स्वगत ===> ये अभ्या.., के साथ एक कट्टा मनाना पडॅगा)

किसन शिंदे नवीन

मुखपृष्ठ आवडलेच पण त्यावरच्या ओळी फार जास्त आवडल्या. वर सरांनी ज्या शब्दात मांडलंय तसं मला लिहीता येणार पण माझ्याही भावना अगदी त्याच.

स्वाती दिनेश नवीन

मुखपृष्ठ फार सुंदर! प्रा डॉ नी लिहिले आहेच सगळ्यांच्या मनातले! स्वाती

बहुगुणी नवीन

In reply to by स्वाती दिनेश

अप्रतिम कलाकृती!

तुडतुडी नवीन

प्रामाणिक मत द्यायचं झालं तर मुखपृष्ठ चांगलं आहे. पण ती पणती जर अजून सुंदर दाखवता आली असती . जुनाट , कळपटलेली वाटतीये . आणि ज्यांचे फोटो लावलेत त्यांची परवानगी घेतलीये का . :-)

हेमंत लाटकर नवीन

In reply to by तुडतुडी

प्रामाणिक मत द्यायचं झालं तर मुखपृष्ठ चांगलं आहे. पण ?
तुडतुडी, प्रत्येक गाेष्टीत खोड काढू नये. कधी कधी दिल खोलके चांगले म्हणावे!

तिमा नवीन

बिरुटे सरांशी सहमत. उत्तम मुखपृष्ठ केले आहे.

प्रभाकर पेठकर नवीन

अतिशय सुंदर मुखपृष्ठ. अस्पष्ट प्रतिमा पांढर्‍या रेखाचित्रात आल्या असत्या तर अधिक मजा आली असती. स्त्रीच्या ओंजळीतील प्रकाशमान पणती फार आकर्षक आहे आणि जणू सुचविते आहे, 'ज्ञानाचा दिवा घरोघर लावा'. असंच पाहिजे होतं आणि तसंच पाहिजे होतं सांगणं सोपं आहे पण नित्यनेमाच्या धबडक्यातून वेळात वेळ काढून लष्कराच्या भाकरी भाजणे सोपे नाही. सुंदर मुखपृष्ठासाठी शतशः धन्यवाद.

संदीप डांगे नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

असंच पाहिजे होतं आणि तसंच पाहिजे होतं सांगणं सोपं आहे पण नित्यनेमाच्या धबडक्यातून वेळात वेळ काढून लष्कराच्या भाकरी भाजणे सोपे नाही. सहमत...

मित्रहो नवीन

वॉव अभ्या मस्त मुखपृष्ठ, कल्पक. आवडले.

अद्द्या नवीन

अभ्या भावा लैच भारी . . मस्तच

दिवाकर कुलकर्णी नवीन

छान मुखपृष्ठ . पार्श्व भागी असलेल्या अंधुक प्रतिमानी मुखपृष्ठ जास्त खुलतंय. मुळगावकर,दलालांच्या सौंदर्य वतींच्या भिन्न प्रकृतीच्या सौंदर्याचा आस्वाद घेत दिवाळी अंक ओरपायचे हा भूतकाळाचा शिरस्ता.सध्याच्या आभासी विश्वात मुखपृष्ठांची लिपीहि नूतन हवी.मिपाच्या मुखपृष्ठाकडं पाहून अशा लिपीचं अनावरण होऊ लागल्याचं जाणवतंय. एकूणंच मिपाच्या तरुणाईला, त्यांच्या उत्साहाला,उन्मेशाला हैट्स अॉफ.

श्रीरंग_जोशी नवीन

मुखपृष्ठाच्या सादरीकरणाच्या मध्यवर्ती कल्पनेचे नाविन्य खूपच भावले. अभ्या - एक मिपाकर म्हणून वर्षानुवर्षे तु दिलेल्या एकाहून एक चित्रानुभुतींसाठी मी कायम ऋणी राहील.

नीलमोहर नवीन

दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ सुरेख झालंय.. अगोदरचा फटाकेवाला बैनरही भारी होता !!