ठिकऱ्या
लेखनविषय:
काव्यरस
रात्री रस्त्यावर चालताना
समुद्र माझ्या ओंजळीत लपला.
उथळ पाण्यात चंद्र ढगाआडून खोल हसला.
काळवंडलेली विवरं अनंतात रुतत गेली.
आकर्षकणाची साखळी सहस्त्रकांत गोल फिरली.
हलकेच तरंग उठले आणि चांदण्या बेभान झाल्या.
ऊधानलेल्या समुद्रात सहर्ष हेलकावत खिदळत राहिल्या.
कुठुनसा एक किरण लाजत लाजत चालुन आला
अविरक्त अवकाशात फाटत फरफटत पुढे गेला
नकळत माझ्या मुठीतून,
विश्वातला एक थेंब रस्ताभर पाझरु लागला
काळोखातला सुर्य अंधार चिरडत पेटत गेला
कित्येक चकोर चांदण्या ऊधानून चमकत निसटुन गेल्या
अवकाशाच्या निर्वातात एका ठिणगीच्या ठिकऱ्या झाल्या.
वाचने
2764
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
का कोण जाणे
In reply to का कोण जाणे by चतुरंग
:)
हे पहा...
In reply to हे पहा... by चांदणे संदीप
हीहीही... खपेश!
In reply to हीहीही... खपेश! by जव्हेरगंज
रात्री एकदाच फास्ट