गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....( वर्गणीचा हिशोब )

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 8:53 am

माझ्या एका मित्राच्या ऑफ़िसमध्ये एका मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवात सी सी टि व्ही संदर्भात चर्चा करण्यास आले होते.
पण अजून फ़्लेक्स स्टार अध्यक्ष आले नव्हते म्हणून ते गप्पा मारत बसले होते.
कार्यकर्ता नं 1- आपण ह्या वर्षी काहितरी वेगळा देखावा करुया.
कार्यकर्ता नं 2- आयला खरच आपण कायतर वेगळे केल पाह्यजे. साले ते वरच्या मंडळाचा तो अमर्या लय भाव खातो.
का. 1- आं काय? अमर्या साला त्याचा काय संबंध?
का. 2- तसं नाय
ते काय करतय नगरसेवकाच्या हापीस वर पडीक असतय ना मग तिथ कामासाठी आलेले त्याला ओळखत्यात मग वर्गणीच्या येळेला सालं चांगल्या पावत्या फ़ाडतय.
का. 1-अरे पण आपण देखाव्याचा विषय
का. 2- नाय रे देखावा कधी चांगली वर्गणी जमा झाल्याशिवाय करणार का?
का. 1- मागची शिल्लक कुठाय रे तुच खजिनदार होतास.
का.2- हा ते ना, त्याच ना, मी ना हिशोब दिलाय रे त्या आपल्या ह्याला अरे आठवलं साला तो तुझ्या आयट्म च्या मागे असतो.
का.1- क्काय!!! तिच्या मागे आय शप्पथ आज संपलाच माझ्या हातुन.
का.2- ए येड्या संपला काय, मी हाय ना.साल्याला हिशोब दिलाय तरी म्हणतय नाय दिला? जरा डोक्यानं काटा काढायला शिक. फ़क्त तु साथ दे रे बघच कसा अडकवतो.
का.1- कसा रे?
का.2- तु संध्याकाळी भेट निवांत क्काय ये एक 90 गेली ना डोक्यात मग बघ कश्या आयडीया येत्यात. आता कस हे वर्गणी म्हणल्यावर थोडं हिकडं तिकडं व्हणार.ते बघु नंतर तु हे ना माझ्यावर सोड.

पुढे अजुन काय विषय होतोय ह्याची मला पण उत्सुकता होती पण तेवढ्यात फ़्लेक्स स्टार आले आणि विषय तिथेच थांबला.

वर्गणीच्या छोट्याशा हिशोबाची गोष्ट लपवण्यासाठी लफड्यातल्या विषया इतकी मोठी केली गेली.

भाषासमाजजीवनमानमौजमजाविचारआस्वादलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Sep 2015 - 9:01 am | प्रचेतस

एक लिंबू झेलू....

राजू's picture

30 Sep 2015 - 9:40 am | राजू

एक लिंबु झेलू ....
म्हणजे काय? स्पष्ट करशील का?

उगा काहितरीच's picture

30 Sep 2015 - 11:21 am | उगा काहितरीच

या आपण सर्वजण लिंबू नावाचे १(अक्षरी एक) फळ (जे बहुतेक वेळेस पिवळ्या रंगाचे वा हिरव्या रंगाचे असून चवीला आंबट असते, व ज्याचा आकार गोल असतो) वर म्हणजे गुरूत्वाकर्षणाच्या विरूद्ध दिशेला फेकू, मग ते (लिंबू ) काही क्षण हवेत (सामान्य माणसाने फेकल्यास) राहील व पुन्हा गुरूत्वाकर्षणामुळे जमिनीकडे येईल (इथे लिंबु फेकणारी व्यक्ती पृथ्वीवर उभी आहे/होती हे कंसीडर (याला मराठीत काय म्हणतात ) केल्या गेले आहे.) मग ते लिंबू हाताचा वापर करून पकडणे याला म्हणतात लिंबू झेलणे.

खटपट्या's picture

30 Sep 2015 - 11:32 am | खटपट्या

खिक्क !!

आनंदराव's picture

30 Sep 2015 - 6:23 pm | आनंदराव

षटकार...
कंसीडर - ग्रूहीत धरणे