✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Fri, 05/29/2015 - 10:20
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥

म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्‍यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्‍यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥

ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
शेतकर्‍यांना स्मशानात थेट घेऊन गेली
कुणास पडलं सुतूक, जरी बदाबदा मेले? ....॥

दुष्काळाच्या वार्‍यापायी शेंगा नाही झोंबल्या
ज्या काही झोंबल्या त्या भावापायी लोंबल्या
चाळीस रुपये किलोवर कापूस रांगत नाही
सोयाबिनच्या इज्जतीले व्यापार हुंगत नाही
काय करू काय नाही, समजत नाही मले ....॥

कास्तकाराचे हाल भाऊ, कुत्रे पुसत नाही
काय पेरावं यंदा, काही मार्ग सुचत नाही
ना सुलतानाची हमी, ना कायदोबाचे ’अभय’
म्हणत असतो तरी आम्ही, “भारतमाता की जय”
आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ....॥

                                - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------------


प्रतिक्रिया द्या
4854 वाचन

💬 प्रतिसाद (17)

अप्रतिम ... नेमकी व्यथा ...

गणेशा
Fri, 05/29/2015 - 10:26 नवीन
अप्रतिम ... नेमकी व्यथा ... वर्षोनवर्षे शेती रीलेटेड कविता लिहिने आणि त्याचे चित्रण करणे खरेच अवघड आहे.. कोणी तरी म्हंटले होते तसे.. या लेखनीतुन उतरलेल्या एका एका वाक्याची हत्यारे झाले पाहिजेत असे वाटते...
  • Log in or register to post comments

फार म्हणजे फार म्हणजे फारच

प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 11:49 नवीन
फार म्हणजे फार म्हणजे फारच निराशावादी कविता !!! मी काय म्हणतो एकदा शेती आम्हा कॉर्पोरेट लोकांच्या हातात चालवायला द्याच ... शेती किती प्रॉफीटेबल असु शकते ते आम्ही दाखवुन देवु !
  • Log in or register to post comments

तुम्हाला काय कळतंय शेतीतलं

काळा पहाड
Fri, 05/29/2015 - 12:23 नवीन
तुम्हाला काय कळतंय शेतीतलं तेव्हा तुम्ही त्यांच्या धाग्यावर कॉमेंट करताय? शहरातल्या लोकांनी शेतीवर बोलायला विरोध आहे त्यांचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

:D

प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 12:26 नवीन
:D आम्ही पैशाची शेती करतो :) सध्या रुअपे लावले आहेत , मागल्या वर्षी डॉलर लावले होते आणि त्या आधी एकदा रियाल लावले होते, भरघोस उत्पन्न आले , आता पुढच्या वर्षी पाऊंड किंव्वा युरो लावावेत असा विचार आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

रुपयात काही उत्पन्न मिळत नाही

काळा पहाड
Fri, 05/29/2015 - 12:34 नवीन
रुपयात काही उत्पन्न मिळत नाही. पाऊंड हे नगदी पीक आहे. पाऊंड लावलेलं शेत ५०-५० टक्क्यानं चालवायला द्यायचं असल्यास कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+1

धनावडे
Sat, 05/30/2015 - 17:04 नवीन
+1 आमची काही फार शेती नाही पण जी आहे ती आईच बघते आणि ती नेहमी म्हणते मनापासून कष्ट(सगळेच करतात) केलेतर शेतसरी कधी उपाशी नाही मारत ,गरजेपुरत देतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

एकीचे पिक

मार्मिक गोडसे
Fri, 05/29/2015 - 11:54 नवीन
आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ....॥
हे ही खरेच आहे. एकीचे पिक कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यास समर्थ असते.
  • Log in or register to post comments

छान

hitesh
Fri, 05/29/2015 - 12:35 नवीन
.
  • Log in or register to post comments

// म्हणत असतो तरी आम्ही,

जयंत कुलकर्णी
Fri, 05/29/2015 - 12:53 नवीन
// म्हणत असतो तरी आम्ही, “भारतमाता की जय” //// याचा अर्थ कोणी सांगू शकेल काय ?
  • Log in or register to post comments

म्हण काही श्यामराव

होबासराव
Fri, 05/29/2015 - 13:52 नवीन
हे श्यामराव कोण ?
  • Log in or register to post comments

@आमच्यात एकी नाई म्हून, इथं

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 14:05 नवीन
@आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ....॥>> हे वळायला लागलं,तरच काहितरी अपेक्षित असं व्यथीतांना प्राप्त होइल.
  • Log in or register to post comments

फक्त "इथ''च्या' ऐवजी "आमच्यात

जयंत कुलकर्णी
Fri, 05/29/2015 - 19:39 नवीन
फक्त "इथ''च्या' ऐवजी "आमच्यात" हा शब्द जास्त समर्पक झाला असता.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मुटे कवितांची शेति छान करतात.

अविनाशकुलकर्णी
Sat, 05/30/2015 - 08:07 नवीन
मुटे कवितांची शेति छान करतात...........
  • Log in or register to post comments

कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/30/2015 - 22:42 नवीन
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 23/03/2015 - 11:51 शेतकरी साहित्यसंमेलन वगैरे ऐकायला ठिक आहे. काय निष्पन्न होतं हो शेतकरी संमेलनामधुन? तुमच्या लेखामधुन सरळ सरळ एंड मार्केट वाल्या शहरी लोकांना टारगेट करताय तुम्ही तर. म्हणजे शेतकर्‍याला भाव नं मिळायला शहरी लोक कसे जबाबदार त्याच्यावर एखादी जिलबी येउ द्या की आकडेवारीसहित. कारण आमच्या दृष्टीनी रोजचं अन्न-भाजीपाला जो लागतो तो आम्ही शेतकर्‍याकडे जाउन आणत नाही तर मधल्या दुकानदार-भाजीवाला आणि त्यामागच्या दलालांच्या माध्यमातुन मागवत असतो. मग आम्ही थेट जबाबदार कसे म्हणे? मग तुमच्या शेतकर्‍यांनी एकत्र येउन मधले दलाल काढा की मोडुन. का शहरी भागातल्या लोकांना शिव्या दिल्या जबाबदार धरलं की संपली तुमची जबाबदारी? जो पिकवेल तो दर ठरवेल असं का नाही करत तुम्ही मग? तुमचेच नेते आहेत ना बसलेले वरपर्यंत? ज्या शहरी लोकांना तुम्ही शिव्या घालता ना त्यांच्याच भरलेल्या करामधुन पॅकेज मिळत असतात एवढं तरी ध्यानात घ्या. तुमचा शेतकरी काही सुतासारखा सरळ वगैरे काही नसतो लै बाराची जमात असते ती. सालं कृषीकर्ज घेउन घरामधे पैसे गुंतवणारे दाखवु का शेतकरी तुम्हाला? कृषीकर्ज घ्यायचं, बुडवायचं किंवा माफी मिळवायची एवढचं फक्त माहितीये बहुतांश शेतकरी वर्गाला. तुमच्या शेतकर्‍यामधेच काही अपवाद आहेत त्यांच्याकडुन काही शिकत का नाही? वेगळ्या पद्धतीने शेती करुन पार कोरडवाहु जमिनीत सुद्धा सोनं पिकवणारे काही शेतकरी आहेत की. पण त्याला कष्टाची तयारी लागते ती आहे का तुमच्या शेतकर्‍याकडे? विष प्यायला पैसा नाही म्हणतात तुमचे शेतकरी आणि लग्नात कर्ज काढुन खार्‍या-गोडाचं गावकी जेवण घालणं शहाणपणाच आहे होय? आत्ताच्या तुमच्या त्या शरद जोशींच्या भाषणामधे सुद्धा काही ठिकाणी ब्राम्हण आणि ब्राम्हणी पद्धतीच्या लेखनाचा अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख आलाय. चायला वर्षानुवर्ष सत्ताधरी वर्ग कुठल्या समाजाचा आहे तो बघा जरा डोळे उघडुन म्हणावं. उठलं की ब्राम्हणाचा उद्धार करायला बसायचं हे बरं नव्हे.
ह्याला उत्तर अजुन आल/ं नाही मुटेसर.
  • Log in or register to post comments

या प्रश्नांची उत्तर कदाचित

सतिश गावडे
Sat, 05/30/2015 - 22:59 नवीन
या प्रश्नांची उत्तर कदाचित Who is killing our farmers? या विदर्भातील शेतकरी कुटुंबातील मुलाने लिहिलेल्या ब्लॉगवर मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वेळ मिळाला की वाचुन काढेन.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/30/2015 - 23:00 नवीन
वेळ मिळाला की वाचुन काढेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आर् मर्दा.. काय कविता के़लीये

निराकार गाढव
गुरुवार, 06/04/2015 - 00:23 नवीन
आर् मर्दा.. काय कविता के़लीये! व्वा . ! भले शाबास पठ्ठे !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा