'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका
लेखनविषय:
काव्यरस
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका
'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥
म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥
ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
शेतकर्यांना स्मशानात थेट घेऊन गेली
कुणास पडलं सुतूक, जरी बदाबदा मेले? ....॥
दुष्काळाच्या वार्यापायी शेंगा नाही झोंबल्या
ज्या काही झोंबल्या त्या भावापायी लोंबल्या
चाळीस रुपये किलोवर कापूस रांगत नाही
सोयाबिनच्या इज्जतीले व्यापार हुंगत नाही
काय करू काय नाही, समजत नाही मले ....॥
कास्तकाराचे हाल भाऊ, कुत्रे पुसत नाही
काय पेरावं यंदा, काही मार्ग सुचत नाही
ना सुलतानाची हमी, ना कायदोबाचे ’अभय’
म्हणत असतो तरी आम्ही, “भारतमाता की जय”
आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ....॥
- गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------------

वाचने
4866
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
अप्रतिम ... नेमकी व्यथा ...
फार म्हणजे फार म्हणजे फारच
In reply to फार म्हणजे फार म्हणजे फारच by प्रसाद गोडबोले
तुम्हाला काय कळतंय शेतीतलं
In reply to तुम्हाला काय कळतंय शेतीतलं by काळा पहाड
:D
In reply to :D by प्रसाद गोडबोले
रुपयात काही उत्पन्न मिळत नाही
In reply to फार म्हणजे फार म्हणजे फारच by प्रसाद गोडबोले
+1
एकीचे पिक
छान
// म्हणत असतो तरी आम्ही,
म्हण काही श्यामराव
@आमच्यात एकी नाई म्हून, इथं
In reply to @आमच्यात एकी नाई म्हून, इथं by अत्रुप्त आत्मा
फक्त "इथ''च्या' ऐवजी "आमच्यात
मुटे कवितांची शेति छान करतात.
कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो by कॅप्टन जॅक स्पॅरो
या प्रश्नांची उत्तर कदाचित
In reply to या प्रश्नांची उत्तर कदाचित by सतिश गावडे
वेळ मिळाला की वाचुन काढेन.
आर् मर्दा.. काय कविता के़लीये