प्रेम …. ???
खरंच हे प्रेम असतं …. ?
एक अनामिक हुरहूर दाटलेली
केवळ तिच्या ओढीसाठी
नकळत …
आपल्याच नकळत
मी तिला Follow करू पाहतो
मी तिच्याच गोष्टी Follow करू लागतो
ह्याला काय म्हणावे ….
जितका मी दूर जाईन जाईल
तितकंच माझ्या विचारे गुंती तिचं मन
तिच्यातच का अडकत जातो मी … ???
नकळत माझाच मी ……
समोर काय होणारय
हे माहीत असूनही
परत माझ मन
तिच्यातच नकळत
हळूहळू गुंतत जातं …
असं कसं असतं हे प्रेम …
नकळत … झालेलं …
तिच्याच आठवणीचा साठा असलेलं .....
पुन्हा एकदा प्रेमात मी …
नकळत …
...
प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत
आपलाच अनामिक …
प्रतिक्रिया
23 Apr 2015 - 10:30 pm | पैसा
कविता चांगली आहे, पण अधे मधे इंग्लिश शब्द का वापरलेत?
25 Apr 2015 - 7:00 pm | रवीराज
त्यांच्या नावात सुद्धा आधी THE इंग्लिश आहे.
त्यांना इंग्लिशची भारी THE हौस आहे.( ह. घे.)
24 Apr 2015 - 7:36 am | अनामिक२४१०
धन्यावद…
मराठी शब्द मिळेल का ?
24 Apr 2015 - 7:56 am | श्रीरंग_जोशी
Follow करतो म्हणजे अनुसरतो.
:-)
24 Apr 2015 - 1:38 pm | अनामिक२४१०
धन्यवाद दादा …
24 Apr 2015 - 10:07 am | पॉइंट ब्लँक
छान लिहिली आहे.
24 Apr 2015 - 1:38 pm | अनामिक२४१०
धन्यवाद...