✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फणा

म — मित्रहो, Wed, 04/15/2015 - 11:32
(कवि कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांची माफी मागून) ओळखलत का सर मला, दारात आला कोणी केस नव्हते विस्कटलेले, डोळ्यात नव्हते पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला छाती काढून, ‘इनकम टॅक्सची धाड आली, गेली मान वाढवून’ कैदाशिनीसारखी नुसती कागदी घोडी नाचली, सारी खाती गोठविली, स्वीस बँक मात्र वाचली. कॅश वेचली, लॉकर सील केली, दागिणेही नेले गादीखाली म्हणून प्रॉपर्टीचे पेपर तेवढे वाचले वकीलाला घेउन संगे सर आता लढतो आहे एकेक मुद्दा काढतो आहे, चिखलफेक करतो आहे फोनकडे हात जाताच हसत हसत उठला ‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला. काढून घेतले पद, तरी अजूनही काढतोय फणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त चर म्हणा! मित्रहो https://mitraho.wordpress.com

प्रतिक्रिया द्या
4121 वाचन

💬 प्रतिसाद (26)

:)

टवाळ कार्टा
Wed, 04/15/2015 - 11:35 नवीन
:)
  • Log in or register to post comments

हाहाहा मस्तं !! फक्त चर म्हणा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/15/2015 - 12:22 नवीन
हाहाहा मस्तं !! फक्त चर म्हणा हे भारीये.
  • Log in or register to post comments

एक नंबर फर्मास....

संदीप डांगे
Wed, 04/15/2015 - 12:38 नवीन
एक नंबर फर्मास....
  • Log in or register to post comments

फर्मास....

अविनाश पांढरकर
Wed, 04/15/2015 - 13:03 नवीन
:)
  • Log in or register to post comments

;०;०

चुकलामाकला
Wed, 04/15/2015 - 13:08 नवीन
;०;०
  • Log in or register to post comments

चर्र...... कन चटका लावून

वेल्लाभट
Wed, 04/15/2015 - 14:11 नवीन
चर्र...... कन चटका लावून जाणारी कविता....
  • Log in or register to post comments

मस्त!!

सूड
Wed, 04/15/2015 - 15:18 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

येंडिंग ल्यँडींगसाठी जोरदार

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/15/2015 - 15:35 नवीन
येंडिंग ल्यँडींगसाठी जोरदार टाळ्या!
  • Log in or register to post comments

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त चर म्हणा!

होबासराव
Wed, 04/15/2015 - 16:00 नवीन
खतरा लिहिलयस मित्रा.
  • Log in or register to post comments

शेवट एक नंबर. B-)

जयराज
Wed, 04/15/2015 - 16:34 नवीन
शेवट एक नंबर. B-)
  • Log in or register to post comments

असा त्या फण्यान काळजावर चरा

स्पंदना
Wed, 04/15/2015 - 16:57 नवीन
असा त्या फण्यान काळजावर चरा ओढला बघा!! मस्त!!
  • Log in or register to post comments

मस्त!!...एक नंबर.

चिनार
Wed, 04/15/2015 - 18:00 नवीन
मस्त!!...एक नंबर.
  • Log in or register to post comments

भारी!

अनुप ढेरे
Wed, 04/15/2015 - 18:01 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्

विवेकपटाईत
Wed, 04/15/2015 - 21:40 नवीन
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त चर म्हणा! हे आवडलं
  • Log in or register to post comments

मस्त

रुपी
Wed, 04/15/2015 - 23:14 नवीन
भारीच..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मित्रहो
गुरुवार, 04/16/2015 - 10:33 नवीन
मनापासून धन्यवाद जी ओळ सुचल्यामुळे ही कविता लिहायला घेतली ती म्हणजे "तुम्ही फक्त चर म्हणा" कुसुमाग्रजांची मूळ कविता माझीही आवडती कविता आहे आणि त्याला हात लावायची हिंमत होत नव्हती. तरीही प्रयत्न केला. कुसुमाग्रजांच्या कवितेत एक गोष्ट होती तेंव्हा या विडंबनात पण मग गोष्टच असायला हवी हा विचार करीत इतर ओळी लिहील्या. शेवटी सुचलेली ओळ "‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला"
  • Log in or register to post comments

जबराट

नाखु
गुरुवार, 04/16/2015 - 10:52 नवीन
अशी कोडगे मंडळी पाहायला मिळाली आहेत. (फक्त काय मीच खातो का माझ्या खात्यात बघ किती खातात त्यामानाने मी स्वस्तात काम करतो असे कोड्गे समर्थनही अनुभवले आहे. === कंपनी कामाने सर्कारी दफ्तरकिड्यांशी संबंध ठेवावे लागणारा नाखु
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
गुरुवार, 04/16/2015 - 10:55 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Trai
  • Log in or register to post comments

संपली आहे दारू तरी, संपला

संदीप डांगे
Fri, 04/17/2015 - 21:57 नवीन
संपली आहे दारू तरी, संपला नाही चना, ग्लासात ओतुन पुन्हा थोडी, फक्त पी म्हणा... पुढे काही सुचतंय का कुणाला...?
  • Log in or register to post comments

"पी" च्या एवजी "वढ" जास्त समर्पक वाटतंय!!!

अविनाश पांढरकर
Tue, 04/21/2015 - 09:07 नवीन
संपली आहे दारू तरी, संपला नाही चना, ग्लासात ओतुन पुन्हा थोडी, फक्त वढ म्हणा... जास्त समर्पक वाटतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

झकास..

Vimodak
गुरुवार, 04/23/2015 - 12:34 नवीन
  • Log in or register to post comments

झकास..

Vimodak
गुरुवार, 04/23/2015 - 12:34 नवीन
  • Log in or register to post comments

झकास..

Vimodak
गुरुवार, 04/23/2015 - 12:35 नवीन
  • Log in or register to post comments

भारी !!

सस्नेह
गुरुवार, 04/23/2015 - 12:49 नवीन
भारी !!
  • Log in or register to post comments

भारी एकच नंबर!!!!!!!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 04/23/2015 - 12:53 नवीन
भारी एकच नंबर!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
गुरुवार, 04/23/2015 - 12:56 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा