फणा
लेखनविषय:
काव्यरस
(कवि कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांची माफी मागून)
ओळखलत का सर मला, दारात आला कोणी
केस नव्हते विस्कटलेले, डोळ्यात नव्हते पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला छाती काढून,
‘इनकम टॅक्सची धाड आली, गेली मान वाढवून’
कैदाशिनीसारखी नुसती कागदी घोडी नाचली,
सारी खाती गोठविली, स्वीस बँक मात्र वाचली.
कॅश वेचली, लॉकर सील केली, दागिणेही नेले
गादीखाली म्हणून प्रॉपर्टीचे पेपर तेवढे वाचले
वकीलाला घेउन संगे सर आता लढतो आहे
एकेक मुद्दा काढतो आहे, चिखलफेक करतो आहे
फोनकडे हात जाताच हसत हसत उठला
‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला.
काढून घेतले पद, तरी अजूनही काढतोय फणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त चर म्हणा!
मित्रहो
https://mitraho.wordpress.com
वाचने
4132
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
:)
हाहाहा मस्तं !! फक्त चर म्हणा
एक नंबर फर्मास....
फर्मास....
;०;०
चर्र...... कन चटका लावून
मस्त!!
येंडिंग ल्यँडींगसाठी जोरदार
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त चर म्हणा!
शेवट एक नंबर. B-)
असा त्या फण्यान काळजावर चरा
मस्त!!...एक नंबर.
भारी!
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्
मस्त
धन्यवाद
जबराट
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Traiसंपली आहे दारू तरी, संपला
In reply to संपली आहे दारू तरी, संपला by संदीप डांगे
"पी" च्या एवजी "वढ" जास्त समर्पक वाटतंय!!!
झकास..
झकास..
झकास..
भारी !!
भारी एकच नंबर!!!!!!!!!!
हाहाहा!