✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मरायचं नाय बे...!!

आ — आयुर्हित, गुरुवार, 12/11/2014 - 18:32
मरायचं नाय बे...!! कुणब्याचं पोरं सालं भित्रच हाय , फासावर जाय नाहीतर औषध खाय , लय बेनं इपितर बायलच हाय.. सालं.. मरायचं नाय बे , मरायचं नाय ||धृ|| गेलं खरीप गेलं रब्बी सारं गेलं जाऊ दे , धट्टा-कट्टा पिळदार शरीर मागं राहू दे | चिलं-पिलं गोड कशी पिवळी हाय बाय ... मरायचं नाय बे , मरायचं नाय ||१|| दारू पेऊन भैतानं शिव्या लय दे S तं , गांजाचा धूर सालं बका-बका घे S तं | या परीस कुठतरी मजुरीनं जाय... मरायचं नाय बे , मरायचं नाय || २ || लिडरायच्या मागं सालं शेपटीगत फिरतं , दारू मटणासाठी त्याचा जयजयकार करतं | घाम गाळ रताळ्या कष्टाचं खाय ... मरायचं नाय बे , मरायचं नाय || ३ || तुही-मही काळीमाय लई मया करते , खंडीभर माणसाचं पोट कसं भरते..? एकट्याच्या जीवासाठी लागतच काय ..? मरायचं नाय बे , मरायचं नाय || ४ || बँकेचं रिन काढलं , आता भरू नको, इमान नगं सोडू सालं तसा मरू नको | कष्टाची भाकर-भाजी ठेशासंग खाय ... मरायचं नाय बे , मरायचं नाय || ५ || * * *दिलीप वि. चारठाणकर, सेलू [ परभणी ] Dilip Charthankar धन्यवाद...विनंती की व्यथित कषटकरयापर्यंत पोचवावी...!! (श्री दिलीप वि. चारठाणकर यांच्या विनंतीला मान देवून, त्यांच्या पूर्व परवानगीने मिपावर प्रकाशित)

प्रतिक्रिया द्या
2306 वाचन

💬 प्रतिसाद (3)

चरचरीत वास्तव! .......

चुकलामाकला
गुरुवार, 12/11/2014 - 18:51 नवीन
चरचरीत वास्तव! .......
  • Log in or register to post comments

सुरेख ! मरून काय होतंय बे !

वेल्लाभट
Fri, 12/12/2014 - 12:06 नवीन
सुरेख ! मरून काय होतंय बे ! वाह ! वास्तव आहे; दाहक आहे; पण तरीही मरायचं नाय बे !
  • Log in or register to post comments

समाज प्रबोधनपर गीत

सिरुसेरि
Fri, 12/12/2014 - 16:25 नवीन
असाच काहीसा संदेश पूर्वी एका समाज प्रबोधनपर गीतामध्ये ऐकला होता . त्यातील काही ओळी अशा होत्या - " जमीन , जुमला , गोठ्यातली गाय , विना कारण कधी विकायची नाय . मौजेत सुदधा ताडी न माडी , आल्या गेल्या संगे प्यायाची नाय . गावकीत आपल्या ठरलच हाय रे ठरलच हाय "
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा