स्वातीताईंची 'एक क्षण निसटू गेला..' ही कविता वाचून आमच्या मनातला विचारांचा कल्लोळ थांबेना! ;)
लांबलचक विचारांच्या तोंडाशी..
थांबून राहिलेली कविता,
पांढर्या शुभ्र कागदावर..
थेंबभर शाईसारखी,
टप्पकन पडली...
एक लाट उंच उसळली..
कागदावर आणि मनात!
एकाच वेळी!!
क्या बात है!!!
भावनेचा आविष्कार
अजून एक काव्य
लगोलग आत गेलो..
वाट बघत बसलेले ताव गोंजारले..
हळूच खिडकीची झापे उघडी केली..
आणि गेलो..
पांढर्यावर काळे करण्यापुरतं पेन आणायला..
ते 'पेन' तो क्षण!!!
येव्हढ्यात येऊन गेला..
छ्या!!!
जाऊदे!
जमतं नाही आज!
म्हणताच विरस झाला...
अजून एक कवी संपून गेला..
चतुरंग
Taxonomy upgrade extras
वाचने
4547
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
@
हाहाहा
मस्त!
जमतं नाही
:)
हा हा हा !!
वा
मस्त !!!
हे आवडल
व्वा