✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

'विठोबा'

D — drsunilahirrao, Fri, 07/11/2014 - 10:20
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा जन्मभर होतीच आषाढी, विठोबा मोजली कोणी अशी ही पापपुण्ये चांगला तू आण मापारी, विठोबा पारखोनी घे जरासे भक्त आता हे तुला विकतील व्यापारी, विठोबा शेवटी आलास ना गोत्यात तूही माणसे असतात थापाडी, विठोबा सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
7084 वाचन

💬 प्रतिसाद (17)

सुंदर.

कवितानागेश
Fri, 07/11/2014 - 11:45 नवीन
सुंदर. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद लीमाउजेट,

drsunilahirrao
Sat, 07/12/2014 - 15:15 नवीन
धन्यवाद लीमाउजेट,
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/12/2014 - 22:53 नवीन
सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! खास...!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/13/2014 - 07:35 नवीन
*i-m_so_happy*
  • Log in or register to post comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, अतृप्त

drsunilahirrao
Sun, 07/13/2014 - 09:29 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, अतृप्त आत्मा मनापासून आभार !
  • Log in or register to post comments

क्लासच

स्पा
Sun, 07/13/2014 - 09:34 नवीन
क्लासच
  • Log in or register to post comments

मस्तच

किसन शिंदे
Sun, 07/13/2014 - 10:05 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

मस्त!!

सूड
Tue, 07/15/2014 - 22:50 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा

यशोधरा
Tue, 07/15/2014 - 22:51 नवीन
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा जन्मभर होतीच आषाढी, विठोबा
सुरेख!
  • Log in or register to post comments

@सूड @यशोधरा मनापासून आभार

drsunilahirrao
Wed, 07/16/2014 - 10:04 नवीन
@सूड @यशोधरा मनापासून आभार
  • Log in or register to post comments

डॉ.सुनील अहिरराव साहेब, फार सुंदर कविता.

निश
गुरुवार, 07/17/2014 - 13:49 नवीन
डॉ.सुनील अहिरराव साहेब, फार सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता. आवडली.

धन्या
गुरुवार, 07/17/2014 - 17:56 नवीन
सुंदर कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

छान

पद्मश्री चित्रे
गुरुवार, 07/17/2014 - 18:45 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments

वा

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 07/17/2014 - 19:05 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments

देहभर पाण्यात तरला जन्म देवा

स्पंदना
Mon, 07/21/2014 - 07:26 नवीन
देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! व्वाह! क्या बात कही!
  • Log in or register to post comments

मोजली कोणी अशी ही पापपुण्ये

शैलेन्द्र
Mon, 07/21/2014 - 15:27 नवीन
मोजली कोणी अशी ही पापपुण्ये चांगला तू आण मापारी, विठोबा मस्तं आवडली..
  • Log in or register to post comments

@निश, धन्या, पद्मश्री चित्रे

drsunilahirrao
Sat, 08/02/2014 - 11:09 नवीन
@निश, धन्या, पद्मश्री चित्रे राजेंद्र मेहेंदळे, अपर्णा अक्षय, शैलेंद्र धन्यवाद मित्रहो,
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा