मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'विठोबा'

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा जन्मभर होतीच आषाढी, विठोबा मोजली कोणी अशी ही पापपुण्ये चांगला तू आण मापारी, विठोबा पारखोनी घे जरासे भक्त आता हे तुला विकतील व्यापारी, विठोबा शेवटी आलास ना गोत्यात तूही माणसे असतात थापाडी, विठोबा सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! डॉ.सुनील अहिरराव

वाचने 7141 वाचनखूण प्रतिक्रिया 17

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 12/07/2014 - 22:53
सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! खास...!!! -दिलीप बिरुटे

पद्मश्री चित्रे 17/07/2014 - 18:45
आवडली कविता

राजेंद्र मेहेंदळे 17/07/2014 - 19:05
आवडली कविता