मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चैन

अनिरुद्ध अभ्यंकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
शब्द हल्ली सारखे छळतात मजला आणि ओळी चार मग सुचतात मजला बोलली नाहीस तू काही तरीपण अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला चांदण्यांना रोजची का रात्रपाळी? प्रश्न हे आता असे पडतात मजला कायदे काही शहाण्यांचे असू द्या फायदे वेडात हे दिसतात मजला मी भरवसा माणसांचा काय द्यावा? सावल्याही जर अशा गिळतात मजला देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला

वाचने 10676 वाचनखूण प्रतिक्रिया 27

मिसळपाव Wed, 07/30/2008 - 17:09
काय छान रचना आहे, व्वा! ...एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला...... 'छद्मीपणे'' शब्द काय चपखल बसलाय !

नारदाचार्य Wed, 07/30/2008 - 17:17
'ती' निवृत्ती सार्थकी लागतेय म्हणायचे. सुरेख रचना. कोणत्याही द्विपदीचा वेगळा उल्लेख नकोच. पण -
चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला
ही खास. रडणे आणि सुखे... दाद देतो. माणसांचा भरवसा आणि सावल्या हेही खूप भावले.

स्वाती दिनेश Wed, 07/30/2008 - 17:24
चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला फार छान ! स्वाती

मी भरवसा माणसांचा काय द्यावा? सावल्याही जर अशा गिळतात मजला देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला माणसांवरील विश्वास हरवल्याची जाणीव सावल्यातून व्यक्त होतांना सावल्याही तशाच, सोपी झालेली देवभक्ती ( देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे ची आठवण झाली. ) , आणि सुखाचे ठिकाण शोधता आलीच नाही ,असा वेगवेगळा आशय व्यक्त करणारी रचना आवडली !!!

पारिजातक Wed, 07/30/2008 - 17:35
फारच छान आहे कविता भयंकरराव!!!! अश्याच कविता लिहित जा. आमच्या मनापासून शुभेच्छा !!!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

इनोबा म्हणे Wed, 07/30/2008 - 17:45
फारच सुंदर रचना... चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला या ओळी तर अप्रतिम... 'ती' निवृत्ती सार्थकी लागतेय म्हणायचे. अगदी बरोबर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्राजु Wed, 07/30/2008 - 19:08
देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला हे खासच... आवांतर : निलकांता, सुरेश भट . इन सारखे आता अनिरूद्ध अभ्यंकर .इन सुरू करण्याचे मनावर घे बाबा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत Wed, 07/30/2008 - 19:16
अनिरुद्ध , उत्तम , सुरेख रचना. आणि मार्मिक, भावसंपृक्त आशय. एकेक द्विपदी आस्वाद घेण्यासारखी. तुमच्या काव्याच्या झाडाचा बहर असाच बारोमास टिकू दे.

चतुरंग Wed, 07/30/2008 - 19:24
शब्दांचं तुला छळणं सार्थकी लागतंय रे बाबा! एकाहून एक सुरेख गजल देणारी तुझी प्रतिभा आता मुक्त संचार करते आहे. :) अतिशय गोटीबंद रचना! फारच आवडली. चतुरंग

मनीषा Wed, 07/30/2008 - 21:27
गझल... कायदे काही शहाण्यांचे असू द्या फायदे वेडात हे दिसतात मजला मी भरवसा माणसांचा काय द्यावा? सावल्याही जर अशा गिळतात मजला .....खुप छान

मदनबाण Fri, 08/01/2008 - 11:26
बोलली नाहीस तू काही तरीपण अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला क्या बात है.. देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला फारच सुंदर !!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मनस्वी Fri, 08/01/2008 - 18:30
देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला
सुंदर! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *