'बाळाची शर्यत-' (बालकविता)
'
एक दोन एक दोन
बाळाची पावलं
मोजणार कोण . .
तीन चार तीन चार
बाळाच्या पैंजणाचा
नादच फार . .
पाच सहा पाच सहा
बाळाची दुडुदुडु
ऐट किती पहा . .
सात आठ सात आठ
बाळाने धरली
ताईची पाठ . .
नऊ दहा नऊ दहा
बाळाने शर्यत
जिंकली पहा . .
.
आवडली
लीलाधराची कविता आठवलीhttp:/
मस्तच