मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)
यापूर्वीचा भाग: कुणी घडवून महाभारत? (भाग १)
नारदमुनी उवाच:
गंगेसारखी सर्वांगसुंदर, कामनिपुण भार्या आणि उत्तम लक्षणांनी युक्त असा एकुलता एक पुत्र देवव्रत यांच्या वियोगाने शंतनु फार कष्टी झाला. अशी काही वर्षे गेल्यावर एक दिवस गंगा देवव्रताला घेऊन शंतनुकडे आली, आणि मुलाला बापाचे स्वाधीन करून वनात परतली. देवव्रत आता चांगला सुदृढ, बुद्धीमान तरूण झालेला होता. त्याच्यावर राज्याची धुरा टाकून शंतनु पुन्हा मृगया आणि भोगविलासात रमला.
तिकडे वनवासी लोकांपैकी धीवर जातीच्या प्रमुखाची ‘काली’ नामक कन्या मासे विकण्यासाठी हस्तिनापुरात जात असे. तिला तेथील विलासी जीवनाचे फार आकर्षण वाटायचे, आणि आपणही तसेच भोगविलासाचे नागरी जीवन जगावे, असे वाटायचे. एकदा तिने मिरवणुकीतून थाटामाटात जात असलेली शंतनु राजाची स्वारी बघितली. त्याचा तो डामडौल, छत्रचामरे, सुवर्णाभूषणमंडित हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेली राजाची स्वारी वगैरे बघून ती थक्क झाली, आणि त्यानंतर दिवस-रात्र तिला हस्तिनापुराची राणी बनण्याचीच स्वप्ने दिसू लागली.
शंतनु राजा नजरेस पडावा, यासाठी ती घटका घटका राजप्रासादाबाहेर घुटमळू लागली. एकदा प्रासादात शिरण्याचा प्रयत्न करताना तेथील प्रहरींनी तिला हाकलून लावले, आणि तिच्या शरीरास येणार्या मासोळीच्या दुर्गंधीमुळे ‘मत्स्यगंधा’ म्हणून तिची कुचेष्टा केली.
या सर्व प्रकारामुळे काली फार अपमानित झाली आणि तिने प्रतिज्ञा केली, की एक दिवस मी शंतनु राजाची राणी म्हणून या प्रासादात वास्तव्य करेन … परंतु हे व्हावे कसे?
शंतनुची राणी झालेली गंगा ज्या किरात जातीची होती, त्या किरातांचे वर्चस्व कुरुराज्यात वाढत असलेले बघून धीवर आणि अन्य काही जातीचे लोक अस्वस्थ झाले. वन्यसंघाची आवळ्या-भोपळ्याची मोट खिळखिळी होऊ लागली. धीवरांना सुद्धा आपल्यातली एकादी युवती शंतनुची राणी व्हायला हवी, असे वाटू लागले. ही गोष्ट कालीला समजताच तिने आपली प्रतिज्ञा धीवरांच्या सभेत सांगितली. ते ऐकून सर्व धीवर प्रसन्न झाले, आणि त्यांनी अप्सरांकडून शिक्षण घेण्यासाठी कालीला पाठवले. अप्सरांकडून नृत्य, कामकला इ. बरोबरच तिने सुंदर कसे दिसावे, सुवासिक उटणी, लेप, पुष्पमाला इत्यादिंच्या योगाने आपले शरीर सदोदित सुवासाने दरवळत कसे ठेवायचे, वगैरे विद्याही आत्मसात केली. प्रासादात जाणे तर तिला शक्य नव्हते, मृगयेसाठी कधीतरी शंतनु इकडे येईल, आणि नदी पार करण्यासाठी आपल्या नौकेत स्वार होईल, या आशेने ती दररोज नौका चालवू लागली.
अप्सरांकडून शिकलेल्या विद्येचे प्रात्यक्षिक करून बघावे, म्हणून एक दिवस पाराशर नामक ऋषी नदी पार करण्यासाठी आलेले असता कालीने त्यांच्यावर आपले मोहजाल पसरले. पाराशरांपासून तिला जे अपत्य झाले, तेच पुढे कृष्णद्वैपायन व्यास म्हणून विख्यात ऋषि झाले.
शेवटी एक दिवस शंतनुचे आगमान झाले. नाना प्रकारची सुगंधी उटणी, कस्तुरी, चंदनादिचे सुवासिक लेप आणि पुष्पमाला यांच्या योगाने दूरवर कालीच्या शरीराचा सुगंध पसरला होता. त्या सुवासाने, आणि तिच्या सौंदर्याने धुंद झालेल्या शंतनुने काममोहित होऊन तिजकडे समागमाची मागणी केली.
तेवढ्यात तिचा धीवर पिता आणि त्याचे बलदंड सहकारी तिथे आले. त्यांनी शंतनुला अट घातली, की या संबंधातून जन्मणार्या मुलाला जर शंतनु आपला उत्तराधिकारी करणार असेल, तरच त्याने तिचे विधिवत पाणिग्रहण करून तिला राणी बनवावे, मगच समागम करावा. त्यावेळी शंतनुसोबत चारदोनच सैनिक होते, आणि पंधरा - वीस धटिंगण धीवरांपुढे त्यांची काहीच मात्रा चालणार नाही, असे बघून तो नाइलाजाने प्रासादात परतला. मात्र त्याला जळी काष्ठी पाषाणी केवळ ती सुंदर धीवरकन्याच दिसू लागून तो अगदी वेडापिसा झाला. त्याची ही स्थिती बघून देवव्रताने चवकशी केली, शंतनुला एकीकडे या सर्व प्रकाराची लज्जाही वाटत असल्याने, तो काही बोलेना. शेवटी शंतनुबरोबर वनात गेलेल्या सैनिकांकडून त्याला सर्व घटना समजल्यावर तो स्वत: धीवर वस्तीत गेला. तिथे कालीच्या पित्याने आपल्या सर्व अटी तर सांगितल्याच, शिवाय पुढे शंतनुपासून कालीला होणार्या संततीला, देवव्रताच्या भावी संततीकडून धोका निर्माण होण्याची भिती पण त्याने व्यक्त केली. देवव्रत मुळातच आपल्या उतारवयीन पित्याच्या कामांधतेमुळे वैतागलेला होता, त्यातून या सर्व प्रकारामुळे त्याच्या मनात फार घृणा दाटून आली. मुळातच स्त्रीसंगाविषयी असलेली त्याची वितृष्णा आणखीनच प्रखर झाली, आणि त्याने स्वत: आमरण अविवाहित राहण्याचे ठरवले. एवढेच नव्हे, तर त्याने आर्य आर्यांना त्यांची कामांधता, वृथा अभिमान, द्यूताचे व्यसन, मद्यपान, अन्य जमातीच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांना दासी बनवणे, वगैरे विषयी त्यांची समजूत घालून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन, आणि तरीही त्यांनी हे उद्योग सोडले नाहीत, तर समस्त आर्यांचा विनाश घडवून आणेन, अशी भीषण प्रतिज्ञा केली. या प्रसंगामुळे त्याचे भीषण, वा भीषम, भीष्म असेही नाव पडले.
धीवर मंडळींसह कालीला घेऊन भीष्म हस्तिनापुरास आला. लवकरच शंतनुचा विवाह कालीशी होऊन त्याने तिचे ‘सत्यवती’ असे नामकरण केले. यथावकाश सत्यवतीला दोन मुलगे झाले, त्यानंतर शंतनु मृत्यू पावला. चित्रांगद आणि चित्रवीर्य या दोन्ही मुलांची जबाबदारी सत्यवतीवर येऊन पडली. सत्यवतीने जरी आर्यांची जीवनपद्धती स्वीकारलेली असली, तरी तिचे स्वत:चे पूर्वायुष्य मात्र मासेमारी आणि नौका चालवणे, यातच गेलेले असल्याने आपल्या मुलांना ती चांगले संस्कार देऊ शकली नाही म्हणून म्हणा, किंवा उपजत गुणांमुळे म्हणा, ही दोन्ही मुलेही शंतनुप्रमाणेच फार हट्टी, दुराग्रही, तापट आणि कामासक्त अशी झाली. …
वयात आल्यावर चित्रांगदास स्त्रियांचा फार नाद लागला, नित्य नवीन स्त्रीच्या शोधात तो राहू लागला. मृगयेच्या मिषाने तो नेहमी ससैन्य फिरत राहून नवनवीन स्त्रिया मिळवण्याच्या खटपटीत असे. एकदा वनात काही अप्सरा त्याच्या नजरेस पडल्या.
चित्रांगद व त्याचे सैन्य बघून त्या घाबरून तातडीने गंधर्व वस्तीत परतल्या, परंतु चित्रांगदाने तिकडे ससैन्य प्रवेश करून त्या अप्सरांना बळजबरीने पकडून नेण्याचा प्रयत्न चालवला. गंधर्व प्रमुख चित्रसेनाला हे कळताच त्याने आपल्या सैन्यासह येऊन चित्रांगदावर हल्ला केला. चित्रांगद घाबरून पळत सुटला, परंतु गंधर्वांनी त्याचा पाठलाग करून हस्तिनापूरच्या बाहेरील अरण्यात त्याला ठार केले, आणि आपल्या अप्सरांची सुटका केली.
चित्रवीर्य देखील आपल्या भावाच्या वळणावरच गेला, परंतु चित्रांगदाच्या उदाहरणामुळे तो फार घाबरला, आणि त्याने प्रासादाबाहेर जाणेच सोडले. अर्थातच स्त्रिया पळवून आणणे वगैरे उद्योग त्याने केले नाहीत, मात्र प्रासादातच विपुल दासी असल्याने तो सदैव त्यांच्यातच रमू लागला.
(क्रमश:)

Book traversal links for मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान, आता ....
....मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)
चित्रवीर्य
अगदी हाच प्रश्न पडला ! पुढील
हल्लीच्या अप्सरा
हा.हा.हा... सध्या तरी या
(No subject)
शीवा ट्रिलोजी
मनोरंजक कथा
काही प्रश्न
जरूर!
दृष्टिकोन अन शैली दोन्हीही
मस्त ! लगे रहो !!
+१००
मस्तच !!
या आणि अश्या प्रश्नांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
भारती युद्धाचा काळ इ.स. पूर्व ३१०१ ??
वैद्य साहेबांचा लेख मी
एक शंका
होय म्हणतात तसं.
वोक्के.
एतद्देशीय नक्कीच नाही. जंगली
जर महाभारत काळात भारतात घोडे
उत्खननात घोड्यांची हाडे
आँ??? मी कधी म्हणालो महाभारत
रथांना बैल जुंपण्याची देखिल
आतापर्यंतच्या
वैद्यांचा लेख
बाकी आमची रुचि आपल्या
विंटरेष्टिंग !
त्यापेक्षा रोमँटिक महाभारत म्हणूया!
ओक कुलातील व्यक्तीचा या विषयावर सहभाग...
मग कोणता काळ ठरतो म्हणे ,अहाभारत युद्धाचा?
लिंक दिलीय .
बावीस हजार वर्षे जुना!
५ तासांपूर्वी निलेश ओक यांचा
३ तासांपूर्वी निलेश ओक यांचा
निलेश ओक हे केमिकल इंजिनिअर.
अप्रतिम!
झक्कास...
वाह अशी कल्पना करून वास्तव वादी लिहायचे
पुढचा भाग कधी???
पुढचा भाग
पुढील विचित्र कहाणीच्या प्रतीक्षेत
या कथेसाठी आज हे रमलचित्र बनवता आले- शंतनु आणि काली
कवी ग्रेस यांची कवीता आठवली.
वाह !
6 पॅक यष्टी.... अनवाणी
निलेश ओक हे केमिकल इंजिनिअर.
आज ३ रा भाग प्रसिध्द झाला.